Join us  

वजन कमी करायचं म्हणून नवरात्रात उपवास करत असाल तर विसरु नका ४ गोष्टी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2023 4:02 PM

If You are doing fasting in Navratri for weight loss keep 4 thinngs in mind : वजन कमी करण्यासाठी उपवास करताना आरोग्याची हेळसांड नको...

नवरात्रात देवीची भक्ती म्हणून अनेक जण ९ दिवसांचे निरंकारी, एक वेळ जेवण करुन, उपवासाचे पदार्थ खाऊन असे विविध प्रकारे उपवास केले जातात. देवावर असलेली भक्ती हे महत्त्वाचे कारण असले तरी स्वत:वर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वजन कमी करायचं म्हणूनही काही जण हे ९ दिवसांचे उपवास करतात. आता केवळ उपवास केल्याने वजन कमी होते असा जर कोणाचा समज असेल तर ते चुकीचे आहे. कारण कमी खाल्ल्याने शरीरावरची चरबी काही प्रमाणात कमी व्हायला मदत होत असली तरी त्याबरोबरीने जीवनशैलीतील इतर गोष्टींकडेही लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे. कारण वजन कमी करायचं म्हणून कमी खाल्लं आणि त्यामुळे शरीराचे कुपोषण झाले किंवा वजन कमी न होता उलट जास्तच वाढले तर आरोग्यासाठी ते घातक ठरु शकते. त्यामुळे नवरात्रात उपवास करताना आहाराबरोबरच इतर गोष्टींकडे कशापद्धतीने लक्ष द्यायला हवे याविषयी समजून घेऊया (If You are doing fasting in Navratri for weight loss keep 4 thinngs in mind)...

१. हायड्रेशन महत्त्वाचं

नवरात्राचे उपवास साधारण ऑक्टोबर महिन्याच्या कालावधीत येतात. या काळात तापमान खूप वाढलेले असल्याने आधीच शरीराला पाण्याची जास्त प्रमाणात आवश्यकता असेत. त्यामुळे पाणी आणि द्रव पदार्थांचा आहारात जास्तीत जास्त समावेश ठेवायला हवा. यामध्ये सरबतं, ताक, नारळ पाणी यांसारखी पेय आपण आवर्जून घेऊ शकतो. 

२. दर काही वेळाने खावे

उपवास म्हटल्यावर २ वेळेला किंवा एकाच वेळेला खायचे असा नियम काही जण करतात. पण एरवी आपल्याला दर काही वेळाने काहीतरी खाण्याची सवय असेल आणि एकाएकी असे काही केले तर यामुळे डोकेदुखी, अॅसिडीटी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे दर काही वेळाने पोष्टीक आणि शरीराला ताकद देणारे असे काही ना काही आवर्जून खायला हवे. 

३. प्रमाणाबाहेर ताणू नये

उपवास म्हटल्यावर लोक विविध प्रकारचे उपवास करतात. फक्त फळं खाऊन, एक दिवस फक्त भाज्या किंवा सॅलेड खाऊन किंवा एकावेळीच उपवासाचे पदार्थ खाऊन हे उपवास केले जातात. पण आपले शारीरिक आणि मानसिक कष्ट जास्त प्रमाणात असतील तर अशाप्रकारच्या उपवासांचा शरीराला त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टरांचा किंवा आहारतज्ज्ञांचा योग्य तो सल्ला घेऊनच उपवास करायला हवेत.    

(Image : Google )

४. ताणतणाव घेऊ नये

आपल्याला नेहमीच विविध गोष्टींचे ताण असतात ज्याचा आपल्या आरोग्यावर परीणाम होत असतो. पण अशाप्रकारचे ताण घेणे आरोग्यासाठी चांगले नसते. कारण त्याचा मानसिकतेवर तर परीणाम होतोच पण शरीरावरही परीणाम होतो. त्यामुळे फक्त कमी खाण्याने वजन कमी होत नाही तर ताणतणावांपासूनही दूर राहायला हवं.  

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव 2023नवरात्री उपवास आणि पदार्थ २०२३नवरात्रीवेट लॉस टिप्स