Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > फिट राहण्याचा आणि वजन कमी करण्याचा टेस्टी फाॅर्म्युला हवा तर पनीर खा, कसे ते वाचा

फिट राहण्याचा आणि वजन कमी करण्याचा टेस्टी फाॅर्म्युला हवा तर पनीर खा, कसे ते वाचा

फिट राहण्याचा आणि वजन कमी करण्याचा टेस्टी फाॅर्म्युला... पनीर खाल्ल्यानं मिळतो दुहेरी फायदा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2022 06:44 PM2022-06-08T18:44:54+5:302022-06-08T18:46:07+5:30

फिट राहण्याचा आणि वजन कमी करण्याचा टेस्टी फाॅर्म्युला... पनीर खाल्ल्यानं मिळतो दुहेरी फायदा 

If you want a tasty formula to stay fit and lose weight, eat Paneer, read how | फिट राहण्याचा आणि वजन कमी करण्याचा टेस्टी फाॅर्म्युला हवा तर पनीर खा, कसे ते वाचा

फिट राहण्याचा आणि वजन कमी करण्याचा टेस्टी फाॅर्म्युला हवा तर पनीर खा, कसे ते वाचा

Highlightsपनीर खाल्ल्यानं अनेक आजारांचा धोका टळतो. तसेच पनीर खाल्ल्यानं मनाला आनंद आणि शरीराला भरपूर ऊर्जा मिळते.


निरोगी राहाण्यासाठी आहार हेच उत्तम औषध आहे. आहारात जाणीवपूर्वक पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्यास फिटनेस राखणं हे अवघड वाटणारं काम सुलभ होतं. फिटनेस म्हणजे वजन नियंत्रित ठेवणं आणि आरोग्य सुदृढ राखणं. असा फिटनेस कमावण्यासाठी आहारतज्ज्ञांच्या मते आहारात पनीरचा समावेश असणं आवश्यक आहे.  पनीर खाल्ल्यानं अनेक आजारांचा धोका टळतो. तसेच पनीर खाल्ल्यानं मनाला आनंद आणि शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. 

Image: Google

पनीर खाण्याचे फायदे

1. आहार तज्ज्ञांच्या मते नाश्त्याला कच्चं पनीर खाल्ल्यास त्यातून लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे पोषक घटक मिळून शरीराचं पोषण होतं. पनीरमध्ये हेल्दी फॅट्स असतात. हे हेल्दी फॅटस शरीरातील गुड कोलेस्टेराॅलची पातळी वाढवतात. नेहमीच्या आहारात वरचेवर पनीरचा समावेश असल्यास ह्दयविकाराचचाधोका कमी होतो. 

2. पनीरमध्ये ड जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतं.  ड जीवनसत्व शरीरातील कोलेस्टेराॅल आणि रक्तदाबाची पातळी नियंत्रित ठेवतं. आहारतज्ज्ञ गरोदर महिलांना पनीर खाण्याचा सल्ला देतात. मधुमेह रुग्णांनाही पनीर खाण्याचा सल्ला दिला जातो.

Image: Google

3.पनीरमध्ये कॅल्शियम आणि फाॅस्फरस हे घटक असतात. या दोन घटकांमुळे हाडं आणि दात मजबूत होतात. कच्चं पनीर खाल्ल्यानं सांधेदुखी कमी होते. 

4. अशक्तपणा जाणवत असल्यास पनीर अवश्य खावं. पनीर खाल्ल्याने शरीरास त्वरित ऊर्जा मिळते. पनीरमध्ये डायटरी फायबरचं प्रमाण जास्त असल्यानं पचनव्यवस्था मजबूत होते. 

5. गायीच्या दुधाचं पनीर खाल्ल्यास आरोग्यास जास्त फायदेशीर ठरतं. त्यासाठी घरी गायीच्या दुधाचं पनीर करावं. गायीच्या दुधाच्या पनीरमध्ये फॅट्सचं प्रमाण कमी असतं. दुधापेक्षा पनीर खाणं जास्त फायदेशीर असतं असं आहर तज्ज्ञ म्हणतात. नियमित पनीर खाल्ल्यानं वजन झपाट्यानं कमी होतं. आहार तज्ज्ञ वजन कमी करण्यासाठी रोज सकाळी 100 ग्रॅम कच्चं पनीर खावं. घरी तयार केलेलं पनीर तसंच खाल्लं तरी चालतं. पण बाहेरुन आणलेलं पनीर खाण्याआधी थोडा वेळ कोमट पाण्यात भिजवून ठेवावं. पनीर शिजवून खाण्याऐवजी ते कच्चं खाणं जास्त फायदेशीर असतं. पनीर शिजवून खाल्ल्यास त्यातील पोषणमुल्यांचा थोड्या प्रमाणात का होईना ऱ्हास होतो. 


 

Web Title: If you want a tasty formula to stay fit and lose weight, eat Paneer, read how

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.