Join us  

इम्युनिटी बुस्टर शॉट! सेलिब्रिटी डाएटिशियन पूजा माखिजाची खास रेसिपी, थंडीत ठणठणीत रहायचं तर.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2022 12:56 PM

How To Boost Energy In Winter: जामून शॉट, लेमन शॉट ऐकले असणारच... आता थंडीमध्ये ठणठणीत रहायचं तर हा एक जबरदस्त इम्युनिटी बुस्टर शॉट (Immunity booster shot) घेऊन बघा. 

ठळक मुद्देहा इम्युनिटी बुस्टर शॉट नियमितपणे घेतल्यास तुमच्यावर आजारी पडून औषध घेण्याची वेळच येणार नाही, असं त्या सुचवत आहेत. 

थंडीचे दिवस सुरू झाले की आजारपणं वाढू लागतात. सर्दी- खोकला असे त्रास तर डोकं वर काढतातच पण जुनाट खोकला,  सांधेदूखी, अपचन, कॉन्स्टिपेशन असे वेगवेगळे त्रासही या दिवसांत सुरू होतात. हे सगळे त्रास कमी करण्याचा एक उत्तम  उपाय म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे. आता या दिवसांत सुकामेवा, पौष्टिक लाडू सगळेच खातात. हे उपाय एनर्जी  वाढविण्याच्या दृष्टीने निश्चितच फायदेशीर आहेत. पण रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी (How To Boost Energy In Winter) मात्र  काही खास उपाय करण्याची  गरज आहे. त्यासाठीच इम्युनिटी बुस्टर शॉट (Immunity booster shot for winter) पिण्याचा एक जबरदस्त उपाय सांगितला आहे सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ पूजा माखिजा यांनी ( Pooja Makhija). 

 

पूजा माखिजा यांनी याविषयीचा एक व्हिडिओ नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जर तुमचा आहार चुकीचा असेल तर कोणतंही औषध तुम्हाला लागू होणार नाही.

जेवण करताना पाणी प्यावं की नाही? काय नेमकं खरं- आरोग्यावर काय होतात परिणाम? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

पण जर तुमचा आहार अगदी बरोबर असेल तर मग औषध घेण्याची काही गरजच उरणार नाही. त्यांनी सांगितलेल्या रेसिपीसाठी हे वर्णन अगदी अचूक आहे. थोडक्यात हा इम्युनिटी बुस्टर शॉट नियमितपणे घेतल्यास तुमच्यावर आजारी पडून औषध घेण्याची वेळच येणार नाही, असं त्या सुचवत आहेत. 

 

कसा करायचा इम्युनिटी बुस्टर शॉट?१. हे पेय तयार करण्यासाठी पूजा माखिजा यांनी एक गाजर, चिमुटभर हळद, एक इंच आलं, १- २ लसूण पाकळ्या आणि लिंबाचा रस असं साहित्य वापरलं आहे.

२. सगळ्यात आधी गाजराची सालं काढून टाका आणि त्याच्या बारीक फोडी करून घ्या.

शिल्पा शेट्टीचं जबरदस्त 'कॅलरी किलर' वर्कआऊट! वजन पटकन कमी करायचं, तर हा व्यायाम करा..

३. त्यानंतर आल्याचंही साल काढून टाका आणि ते किसून घ्या.

४. लसूण पाकळ्या बारीक चिरून घ्या. 

५. हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्या. त्यात थोडं पाणी आणि लिंबाचा रस टाका.

६. इम्युनिटी बुस्टर शॉट झाला तयार.  

७. दररोज सकाळी हा शॉट घेतल्यास उत्तम. 

 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सथंडीत त्वचेची काळजी