वजन कमी (weight loss) करण्यासाठी आहाराच्या बाबतीत विविध प्रयोग केले जातात. त्याचाच एक भाग म्हणजे रात्रीच्या जेवणात केवळ सूप पिणं किंवा सॅलड खाणं.. ऋजूता दिवेकर सारखे आहार तज्ज्ञ रात्री सूप पिऊन आणि सॅलड खाऊन वजन कमी करण्याच्या पध्दतीवर चुकीची फुली मारतात. त्यांच्या मते वजन कमी करायचं तर आपला पारंपरिक आहार (traditional diet) महत्वाचा त्यासाठी रात्रीच्या जेवणात भात खाणं टाळण्याऐवजी आठवड्यातून किमान चार वेळा तरी वरण भात/ आमटी भात खाण्याचा (eating rice and pulses in dinner) प्रयत्न करावा. रात्रीच्या जेवणात वरण भात खाल्ल्यास वजन कमी होण्यास/ नियंत्रित राहाण्यास मदत तर होतेच सोबतच (benefits from eating daal chawal in dinner) आरोग्यास इतरही फायदे होतात.
Image: Google
वरण भात खाण्याचे फायदे
1. भातामधून शरीराल कर्बोदकं मिळतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. काम करण्याची ताकद मिळते. कर्बोदकातून मिळणारी ऊर्जा दैनंदिन कामं उरकण्यासाठी आवश्यक असते. भातातील कर्बोदकं एक प्रकारे इंधनासारखं काम करतात. रात्रीच्या जेवणात वरण भात खाल्ल्यानं शरीराला ऊर्जा आणि मनाला उत्साह मिळतो.
2. भात पचण्यासाठी लाभदायक असतो. पोटदुखी, अपचन यासारख्या समस्यांमध्ये भात खाण्याचे फायदे होतात. भात आरोग्यासाठी आणि पचनासाठी आणखी लाभदायक करण्यासाठी पांढऱ्या तांदळापेक्षा हातसडीचा तांदूळ वापरावा. वजन कमी करण्यासाठी हातसडीच्या तांदळाचा भात फायदेशीर असतो.
Image: Google
3. पचन क्रियेद्वारे अन्नातील सर्व पोषक तत्वं शरीरातील प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचवले जातात. शरीराला पोषक तत्त्वं मिळाली की शारीरिक क्रिया व्यवस्थित पार पडतात. रात्रीच्या जेवणात भात खाल्ल्याने पचन सुधारण्यास मदत होते. पचनाच्या विविध समस्या वरण भात खाल्ल्याने कमी होतात. वरण भाताला परिपूर्ण आहार असे म्हणतात. कारण भातातून शरीराला कर्बोदकं मिळतात. पचनास आणि पोषणास भात खाल्ल्याने मदत होते.
Image: Google
तसेच डाळींमधून शरीराला आवश्यक असलेली प्रथिनं, जीवनसत्वं, कॅल्शियम, लोह आणि फायबर मिळतात. वरण भात आठवड्यातून किमान चार वेळा खायला हवा. कधी भात खाण्याचा कंटाळा आला तर डाळीमध्ये विविध भाज्या घालून सांबार केल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. वरण भाताचा समावेश आहारात करताना वेगवेगळ्या डाळींचा वापर करावा. तुरीची डाळ पचण्यास जड जात असल्यास डाळ शिजवण्यापूर्वी अर्धा तास भिजत घालावी. ती पचनास हलकी होण्यासाठी डाळ हिंग आणि हळद घालून शिजवावी. वरण भात खाताना वरुन तूप आणि लिंबाचा रस घ्यावा. अशा पध्दतीनं वरण भात खाल्यास तो पोषक, पाचक होतो आणि वजनही नियंत्रित ठेवतो.