Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > बघा तुमचेही दह्याविषयीचे 'हे' गैरसमज आहेत का? आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात दही पौष्टिकच, पण खायचं तर..

बघा तुमचेही दह्याविषयीचे 'हे' गैरसमज आहेत का? आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात दही पौष्टिकच, पण खायचं तर..

Important Myths And Facts Related To Curd As Per Ayurveda: दही खाण्याविषयी अनेकांच्या मनात बरेच समज- गैरसमज असतात. ते दूर करण्याचा प्रयत्न आयुर्वेदतज्ज्ञांनी केला आहे. (who should avoid eating curd)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2024 12:54 PM2024-05-22T12:54:15+5:302024-05-22T15:20:44+5:30

Important Myths And Facts Related To Curd As Per Ayurveda: दही खाण्याविषयी अनेकांच्या मनात बरेच समज- गैरसमज असतात. ते दूर करण्याचा प्रयत्न आयुर्वेदतज्ज्ञांनी केला आहे. (who should avoid eating curd)

important myths and facts related to curd as per ayurveda, who should avoid eating curd, health benefits of curd | बघा तुमचेही दह्याविषयीचे 'हे' गैरसमज आहेत का? आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात दही पौष्टिकच, पण खायचं तर..

बघा तुमचेही दह्याविषयीचे 'हे' गैरसमज आहेत का? आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात दही पौष्टिकच, पण खायचं तर..

Highlightsदही नियमितपणे खाल्ल्यामुळे शरीरावरील चरबी वाढते. त्यामुळे जे लोक वजन वाढविण्यासाठी प्रयत्न करत असतात, अशा लोकांनी दही नियमितपणे खावं.

दही हा अनेकांच्या अतिशय आवडीचा पदार्थ. काही जणांना तर रोजच्या जेवणात दही लागतंच. पण काही जणांचं त्याच्या अगदी उलट असतं. त्यांना दह्याचं नाव जरी घेतली तरी सर्दी होते. त्यामुळे मग ते कोणताही ऋतू असला तरी दही खाणं टाळतात. एकंदरीतच दही कोणी खावं, कोणी खाऊ नये, कधी खावं, कोणत्या ऋतूमध्ये टाळावं, कसं खावं, केव्हा खावं याविषयी अनेकांच्या मनात अनेक प्रश्न असतात (who should avoid eating curd). शिवाय दह्याबद्दलचे अनेक गैरसमजही कित्येकांच्या मनात पाहायला मिळतात. म्हणूनच तुमच्याही मनात असे काही गैरसमज असतील तर ते दूर करा (health benefits of curd) आणि दही आरोग्यदायी पद्धतीने कसं खावं, ते पाहा... (important myths and facts related to curd as per ayurveda)

 

दही खाण्याविषयी सर्वसामान्यांच्या मनात असणारे गैरसमज

दह्याविषयी सर्वसामान्यांच्या मनात कोणकोणते गैरसमज आहेत याविषयी आयुर्वेदतज्ज्ञ दिक्षा भावसार यांनी दिलेली माहिती लाईव्ह हिंदुस्थान यांनी प्रकाशित केली आहे. 

१. दही थंड असतं.

२. दही वजन कमी करायला मदत करतं.

व्यायाम न करताही वजन उतरेल भराभर, रोज 'असं' डाएट करा, महिनाभरातच व्हाल फिट

३. रात्रीच्या वेळी दही खाल्ले तरी चालते.

४. दही पचायला हलकं असतं.

५. मधुमेह असणाऱ्यांसाठी दही उत्तम असतं.

६. दही उन्हाळ्याच्या दिवसांत खायलाच पाहिजे.

सर्वसामान्यांच्या मनात असणारे हे गैरसमज दूर करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला आहे.

 

आयुर्वेदाच्या दृष्टीने दही खाण्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी

१. लठ्ठपणा, कफ, शरीरावर सूज येणे असा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी दही खाणं टाळायला पाहिजे.

२. रात्रीच्यावेळी दही खाणं कटाक्षाने टाळायला पाहिजे.

गळणाऱ्या केसांना द्या बायोटीनचा सुपरडोस, ५ पदार्थ खा, मुळं पक्की होऊन केस होतील दाट- लांब

३. दह्यापासून तयार झालेले ताक दररोज प्यायले तरी चालते. पण दररोज दही खाणे मात्र टाळावे.

४. दही आणि फळं एकत्र करून कधीही खाऊ नये. कारण यातून चयापचय क्रियेत अडथळे निर्माण होतात. तसेच त्यातून ॲलर्जीसारखा त्रास होऊ शकतो.

थायरॉईडचा त्रास कमी करणारी ५ योगासनं, वाचा सेलिब्रिटी ट्रेनर अंशुका परवानी यांचा खास सल्ला...

५. दही खायचंच असेल तर एक छोटी वाटी एवढंच खावं. जास्त दही आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.

६. दिक्षा भावसार यांनी असं सांगितलं आहे की दही पचायला जड असतं. दही नियमितपणे खाल्ल्यामुळे शरीरावरील चरबी वाढते. त्यामुळे जे लोक वजन वाढविण्यासाठी प्रयत्न करत असतात, अशा लोकांनी दही नियमितपणे खावं. लठ्ठपणाचा त्रास असणाऱ्यांनी दही खाणं टाळावं.


 

Web Title: important myths and facts related to curd as per ayurveda, who should avoid eating curd, health benefits of curd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.