Join us  

रोज एक सफरचंद का खावं? यामुळे खरचं आजार टळतात की वाढतात? डॉक्टर सांगतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 9:37 AM

Impressive Health Benefits of Apples : रोज १ सफरचंद खाल्ल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. पचनक्रिया चांगली राहते.

सफरचंद (Apple) खाणं तब्येतीसाठी फायदेशीर  ठरतं कारण यात बरीच पोषक तत्व असतात. डॉक्टरही रोज १ सफरचंद खाण्याचा सल्ला देतात रोज १ सफरचंद खाल्ल्याने गंभीर आजारांपासून बचाव होतो. (Apple Eating Benefits) सफरचंदात प्रोटीन्स, आयर्न, फायबर्स, कॅल्शियम पोटॅशियम आणि एंटी ऑक्सिडंट्स  असतात. याचा आहारात समावेश केल्याने शरीराला पोषक तत्व सहज मिळतात. (Health benefits of apples)  रोज १ सफरचंद खाल्ल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. पचनक्रिया चांगली राहते. सकाळी रिकाम्यापोटी सफरचंद खाल्ल्याने काय फायदे मिळतात समजून घेऊ. (Impressive Health Benefits of Apples)

गॅसपासून सुटका

एक्सपर्ट्सच्या मते यात अनेक पोषक तत्व असतात. पोषक तत्वांनी परीपूर्ण सफरचंद खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्या कमी होता. सफरचंदातील फायबर्स अन्न पचवण्यास मदत करतात. रोज रिकाम्या पोटी १ सफरचंद खाल्ल्याने गॅस, अपचन समस्या कमी होतात.

वजन कमी होण्यास मदत होते

सकाळी नियमित १ सफरचंद खाल्ल्याने वाढतं वजन नियंत्रणात राहतं. सफरचंद फायबर्सचा एक चांगला स्त्रोत आहे. सफरचंदाच्या सेवनाने बराचवेळ पोट भरल्यासारखं वाटत आणि तुम्ही ओव्हर इटींग करत नाही. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 

प्रेग्नंसीनंतर पोट खूपच सुटलं? तज्ज्ञांचा सल्ला, पोट कमी करण्यासाठी करुन पाहा १ उपाय

हृदयाचे आरोग्य चांगले राहते

हद्याचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सफरचंदाचे सेवन फायदेशीर मानले जाते.  सफरचंदात फायबर्स आणि पोटॅशियम असल्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं आणि कोलेस्ट्रेरॉलही कमी होतं. ज्यामुळे हृदयाच्या समस्या टाळता येतात.

रक्तात सुधारणा होते

नियमित सकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्याने शरीरात रक्ताची कमतरता उद्भवत नाही. सफरचंद आयर्नचा एक चांगला स्त्रोत आहे. यामुळे हिमोग्लोबिन वाढतं. थकवा, अशक्तपणा कमी होतो.

रोज नाश्त्याला काय खाता? माधुरीचे पती डॉ. नेने सांगतात नाश्ता करण्याच्या ५ टिप्स- निरोगी राहाल

हाडं बळकट होतात

सफरचंद कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहे. यामुळे हाडं मजबूत होतात. नियमित सकाळी सफरचंद खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर होते. हाडं, सांधेदुखीच्या वेदनांपासून आराम मिळेल.

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स