Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > खूप उकडतं, प्रचंड ऊन म्हणून घटाघटा पाणी पीत असाल तर थांबा; तब्येतीवर होतात 4 दुष्परिणाम

खूप उकडतं, प्रचंड ऊन म्हणून घटाघटा पाणी पीत असाल तर थांबा; तब्येतीवर होतात 4 दुष्परिणाम

Side effects of Drinking Chilled Water: तुम्हीही अशी चूक करत असाल, तर वेळीच सावध व्हा.. कारण यामुळे तब्येतीवर अनेक वाईट परिणाम होतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2022 06:13 PM2022-05-31T18:13:19+5:302022-05-31T18:14:22+5:30

Side effects of Drinking Chilled Water: तुम्हीही अशी चूक करत असाल, तर वेळीच सावध व्हा.. कारण यामुळे तब्येतीवर अनेक वाईट परिणाम होतात..

In summer drinking chilled water hurriedly is harmful for health | खूप उकडतं, प्रचंड ऊन म्हणून घटाघटा पाणी पीत असाल तर थांबा; तब्येतीवर होतात 4 दुष्परिणाम

खूप उकडतं, प्रचंड ऊन म्हणून घटाघटा पाणी पीत असाल तर थांबा; तब्येतीवर होतात 4 दुष्परिणाम

Highlightsतुम्हीही असंच करत असाल तर ही सवय तात्काळ सोडा...

रणरणत्या उन्हातून अगदी थकून जेव्हा आपण घरी येतो तेव्हा बऱ्याचदा खूप तहान लागलेली असते. घरी येईपर्यंत आपण तहान कंट्रोल करतो, पण एकदा का घरी आलो की त्यानंतर मात्र कधी एकदा पाणी पिऊ असं होऊन जातं. आधीच खूप गरमी होत असते, प्रचंड उकडत असतं. त्यामुळे मग बऱ्याच जणांची एक सवय म्हणजे सरळ स्वयंपाक घरात जायचं आणि फ्रिजमधून थंड पाण्याची बाटली काढून घटाघटा पाणी प्यायचं. तुम्हीही असंच करत असाल तर ही सवय तात्काळ सोडा...(drinking chilled water hurriedly) 

 

थंडगार पाणी घटाघटा पित असाल तर...
१. हार्ट रेट कमी होतो (reduce heart rate)

खूप उन्हातून आल्यावर एकदम खूप थंड पाणी प्यायल्याने गळ्याच्या मागच्या भागात जी नस असते, तिच्यावर परिणाम होतो आणि ती नस हार्ट रेट कमी करते. हृदयाच्या गतीवर अशा पद्धतीने परिणाम होणे, अतिशय हानिकारक असते. त्यामुळेच तर उन्हातून येऊन थंड पाणी प्यायला आणि अचानक हार्टअटॅक येऊन मृत्यू झाला, अशा बातम्या उन्हाळ्यात वारंवार आपल्या कानावर येत असतात. 

 

२. उर्जा कमी होऊन वजन वाढते (low energy level)
बाहेरून जेव्हा आपण येतो, तेव्हा आपल्या शरीराचं तापमान वाढलेलं असतं. जेव्हा आपण खूप जास्त थंड पाणी भराभर पितो, तेव्हा शरीराचं तापमान एकदम कमी होऊ लागतं. यामुळे शरीराच्या मेटाबॉलिझमवर परिणाम होतो. मेटाबॉलिझम हळूवार झालं की मग शरीरातून फॅट मुक्त करण्याची प्रक्रिया मंदावते आणि त्यामुळे मग शरीरातील उर्जा कमी होऊन सुस्तपणा येतो. फॅट बाहेर पडले नाहीत तर वजन वाढण्यावर त्याचा परिणाम होतो.

 

३. पचनाच्या समस्या (indigestion)
मेटाबॉलिझम म्हणजेच शरीराची चयापचय क्रिया मंद झाली की तिचा थेट परिणाम पचन संस्थेवर होतो. पचन क्रियेतही अडथळे निर्माण होतात. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन न होणे, गॅसेस होणे, पोट फुगणे, ॲसिडीटी असा त्रासही होऊ लागतो. 

 

४. डोकेदुखीचा त्रास
उन्हातून आल्यावर एकदम थंड पाणी प्यायल्याने डोक्यामध्ये असणाऱ्या क्रॉनियल नसवर परिणाम होतो. तिच्या कामाचा वेग कमी होतो. त्यामुळे मग डोकेदुखीचा त्रास खूप जास्त वाढतो. बऱ्याचदा उन्हातून आल्यावर आपलं डोकं दुखतं. आपल्याला उन्हातून आल्यामुळे डोकं दुखत आहे, असं वाटतं, पण त्याचं खरं कारण ऊन नाही, तर उन्हातून आल्यानंतर घटाघटा प्यायलेलं थंड पाणी असतं. 

 

Web Title: In summer drinking chilled water hurriedly is harmful for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.