Join us  

व्हा इडलीसारखे हलके! नाश्त्याला खा ५ आंबवलेले पदा‌र्थ! वजन कधी घटलं कळणारही नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2024 2:54 PM

Indian breakfast fermented dishes to eat if you want to lose weight : नाश्त्याला आंबवलेले पदार्थ खाणं शरीरासाठी ठरतं लाभदायक! वाढलेलं वजन कमी करण्यासाठी उत्तम

फरमेण्टेड फूड म्हणजेच आंबवलेले पदार्थ (Indian Breakfast). इडली, डोसा, अप्पे, ढोकळा यासह इतर पदार्थ करताना बॅटर आधी ८ तासांसाठी फरमेण्ट करण्यासाठी ठेवायला लागतं (Weight loss breakfast). तेव्हाच पदार्थाची चव वाढते. शिवाय हे पदार्थ आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात. यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया पोटासाठी फायदेशीर ठरतात. ते साखर, कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने यांसारखे घटक ब्रेक करतात.

आंबवण्याच्या प्रक्रियेत चांगले जीवाणू वाढतात. या जीवाणूंना प्रोबायोटिक असं म्हणतात. पण आंबवलेले पदार्थ खाण्याचे फायदे किती? कोणते फरमेण्टेड पदार्थ खाल्ल्याने आरोग्याला फायदे मिळतात. पाहूयात(Indian breakfast fermented dishes to eat if you want to lose weight).

इडली खाण्याचे फायदे

द हेल्थ साईट. कॉमच्या वेबसाईटनुसार, लोक नाश्त्याला इडली आवर्जुन खातात. वाफवलेली इडली खाल्ल्याने आरोग्याला फायदे मिळतात. यात तांदूळ आणि उडीद डाळ असते. उडीदाची डाळ हा प्रोटीन्सचा उत्तम स्त्रोत आहे. याशिवाय तांदळातून कार्बोहायड्रेट्सही मिळतात. या दोन्हींच्या कॉम्बिनेशनमुळे शरीराला आवश्यक असलेले घटक मिळतात. यामुळे पचनक्रिया सुधारते. शिवाय वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

१० दिवसात तुळस दिसेल डेरेदार - हिरवीगार! फक्त कुंडीत चमचाभर 'ही' पांढरी गोष्ट नक्की घाला

डोसा म्हणजे प्रोबायोटिक्सचा उत्तम स्त्रोत

डोसा खाण्याचे अनेक फायदे आहेत. यात प्रोबायोटिक्सचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे चयापचय क्रिया बुस्ट होते, व खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचते. खरं तर, प्रोबायोटिक्स पोटात निरोगी बॅक्टेरियाच्या वाढीस मदत करतात. ज्यामुळे पचनसंस्था उत्तमरिता कार्य करते. ज्यामुळे पोटाचे विकार दूर राहतात.

ढोकळा मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम

मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी वजन कमी करणं आवश्यक आहे. यासाठी आपण ढोकळा खाऊ शकता. त्यात चणा डाळीचा वापर होतो. चणा डाळीमध्ये १० ग्रॅम प्रथिने, ४ ग्रॅम फायबर आणि निरोगी चरबी असतात. शिवाय त्यात प्रथिने, फायबर आणि इतर पौष्टीक घटक असतात. प्रोटीनमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. तर फायबरमुळे अन्नाची पचनक्रिया व्यवस्थित होते.

अप्पम आतड्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर

अप्पम आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यात डाळ आणि तांदुळाचा वापर होतो. त्यात प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स असतात. आपण हवं असल्यास त्यात भाज्या देखील मिक्स करू शकता. ज्यामध्ये भरपूर फायबर असते. जे आतड्यांचे आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त ठरते.

३० वर्षांपूर्वी मरण पावलेल्या मुलीसाठी आईबाबा आता शोधताहेत नवरा, लग्नाचं हे काय भलतंच प्रकरण?

मूग डाळ डोसा

मूग डाळीच्या डोश्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत करते. मूग डाळीमध्ये फोलेट, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी ६ सारख्या जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील भरपूर असतात. त्यात फायबरचे प्रमाणही जास्त असते. ज्यामुळे खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचते.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स