वजन कमी करणे कोणत्याही व्यक्तीसाठी इतके सोपे नाही, यासाठी योग्य शारीरिक हालचालींसोबतच योग्य खाणे देखील खूप महत्वाचे आहे, कारण निरोगी आहार ही चांगल्या आरोग्याची पहिली पायरी मानली जाते. फळं तर आपण रोजच खातो. वजन कमी करण्यासाठीही फळं तितकीच महत्वाची असतात. (Fat Lose Tips) जाणून घेऊया असे कोणते फळ आहे, जे खाल्ल्याने पोट आणि कंबरेभोवतीची चरबी कमी होऊ लागते आणि शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. (Instant Way To Lose Belly Fat)
ग्रेटर नोएडा येथील जीआयएमएस हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या प्रसिद्ध आहारतज्ञ डॉ. आयुषी यादव यांनी सांगितले की, संत्री या फळामध्ये प्रोटीन, फायबर, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन सी सारखे महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. (How To Lose Belly Fat) जे शरीराचे वजन कमी करण्यास मदत करतात. ज्यूस पिण्याऐवदी संपूर्ण फळ खाणे चांगले.(Orange as weight loss fruit burning belly fat vitamin c obesity flat tummy digestion sugar)
1) पचनक्रिया चांगली राहते (Digestion)
संत्र्यामध्ये भरपूर फायबर आढळते, जे पचन सुधारण्यास मदत करते. संत्री खाल्ल्याने जास्त वेळ भूक लागत नाही आणि पोट बिघडत नाही. पचनक्रिया बरोबर असेल तरच वजन नियंत्रणात राहते. (Easiest way to lose body fat quick)
अजिबात वाढणार नाही शुगर; जेवल्यानंतर करा फक्त १ काम , डायबिटीस राहील नियंत्रणात
2) शरीर हायड्रेट ठेवा (keep hydrated)
संत्र्यामध्ये पाण्याचे प्रमाण 80 टक्क्यांहून अधिक असते, म्हणूनच या फळाच्या सेवनाने तुमचे शरीर दीर्घकाळ हायड्रेट राहते. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत शरीरात पाण्याची कमतरता भासू नये म्हणून वजन कमी करण्यासाठी ते प्रभावी मानले जाते.
आयुष्यात कधीच वाढणार नाही घातक कॉलेस्टेरॉल; फक्त ४ पदार्थ खाणं सोडा CDC चा दावा
3) साखरेचे क्रेव्हिंग्स कमी होतात (Sugar Cravings)
साखरयुक्त पदार्थ खाणे हे लठ्ठपणा वाढण्याचे मोठे कारण आहे, जर तुम्ही दररोज एक संत्री खाल्ल्यास गोड खाण्याची लालसा कमी होऊ शकते. यासोबतच हे उच्च रक्तदाबापासून आराम मिळण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
4) शरीर डिटॉक्स होते (Body Detox)
संत्र्याला डिटॉक्स फूड असेही म्हणतात, ते खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सीचा भरपूर स्रोत असल्याने ते अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी प्रभावी आहे.