Join us  

International Coffee Day: कॉफी आणि खरंच असतं का 'बरंच काही'? कॉफी किती, कशी, केव्हा प्यावी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2021 2:36 PM

खूप दमून गेल्यानंतर मिळालेली एक कप गरमागरम कॉफी म्हणजे निव्वळ सूख.... म्हणूनच तर कॉफीसोबत येतं..'बरंच काही'

ठळक मुद्देकॉफीच्या अतिसेवनामुळे स्पर्म काऊंटवर देखील परिणाम होतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. र बाळासाठी प्लॅनिंग करत असाल, तरी देखील कॉफी घेणे टाळावे. त्यामुळे एकंदरीतच तरूण मुलांनी कॉफीचा अतिरेक करू नये. 

पुर्वी चहाच्या लोकप्रियतेखाली कॉफी बिचारी काहीशी झाकून गेलेली असायची. दबूनच रहायची. चहा अगदी दिवसातून तीनदा चारदा व्हायचा. पण कॉफी मात्र क्वचित कधीतरी. अगदी पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एकदा. किंवा ज्यांना दूध किंवा चहा चालायचा नाही, अशा पाहूण्यांसाठीच केवळ कॉफी राखून ठेवलेली असायची. पण अशी ही काही वर्षांपुर्वी एका कोपऱ्यात असणारी कॉफी आता मात्र चहाच्या बरोबरीने येऊन बसली आहे. खूप थकल्यावर जसा चहा प्यावा वाटतो ना, तसंच मन रिफ्रेश करायला कॉफीचीही गरज पडते. सर्वांच्या लाडक्या कॉफीसाठीच १ ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय कॉफी डे म्हणून साजरा केला जातो. 

 

कॉफीमध्ये कॅफेन नावाचा पदार्थ असतो. हा पदार्थ आपल्याला उत्साही देतो आणि त्यामुळेच कॉफी प्यायल्याने आपल्याला तरतरी येते. पण कॉफी खरोखरंच एनर्जेटीक ठरावी म्हणून कॉफी कधी आणि किती प्यावी तसेच कॉफी कशी बनवावी, याचे देखील काही नियम असतात. या नियमांमध्ये राहून काॅफी घेतली तर त्याचे नक्कीच चांगले परिणाम दिसून येतात. म्हणून तर कॉफी नक्की प्या पण त्याच्या आधी कॉफी पिण्याचं सूत्र जाणून घ्या.

 

कॉफीबद्दल महत्त्वाचं असं बरंच काही....१. सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी कधीही कॉफी पिऊ नका. पोटात काहीतरी गेल्यानंतरच कॉफी घ्यावी. त्यामुळेच सकाळी कॉफी घ्यायची असेल तर नाश्ता झाल्यावर घ्या, असे तज्ज्ञ सांगतात.२. दिवसातून दोन वेळा कॉफी घ्यायला हरकत नाही. पण कॉफी जर यापेक्षा जास्त प्रमाणात होत असेल तर त्यामुळे अनेक मानसिक त्रास होऊ शकतात. अस्वस्थता वाढू शकते तसेच आरोग्याच्या इतरही काही तक्रारी उद्भवू शकतात. ३. सकाळच्या वेळी आपल्या शरीरातील कार्टिसोल हा स्ट्रेस हार्मोन अतिशय ॲक्टीव्ह असतो. सकाळचा उत्साह, कामाचा उरक, चयापचय क्रिया या सगळ्या गोष्टी या हार्मोनद्वारे नियंत्रित केल्या जातात. जर सकाळी उठून आधी कॉफी घेतली, तर या हार्मोनच्या कामात अडथळा येतो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर तीन तास तरी कॉफी घेऊ नये, असेही एका अभ्यासात सांगण्यात आले आहे.

४. अतिप्रमाणात कॉफी घेतल्यामुळे वारंवार लघवीला जावे लागते. यामुळे शरीरातील कॅल्शियम, सोडीयम या घटकांवर परिणाम होतो. सोडीयमचा चढउतार थेट किडनीच्या कार्याशी संबंधित असतो. त्यामुळे अतिकॉफी टाळावी.५. ज्याप्रमाणे सकाळी उठल्यानंतर लगेचच कॉफी पिऊ नये, त्याचप्रमाणे रात्री झोपण्याआधी देखील कॉफी पिऊ नये. रात्री झोपताना कॉफी घेतल्यास झोपेवर परिणाम होतो. शांत झोप लागत नाही. जर झोप चांगली झाली नाही, तर मानसिक अस्वस्थता, नैराश्य येते. त्यामुळे रात्री कॉफी घेणे टाळावे. ६. ज्या व्यक्तींना टाईप २ मधूमेह असतो, अशा व्यक्तींनी साखर न घालता कॉफी घ्यावी.

७. कॉफीच्या अतिसेवनामुळे स्पर्म काऊंटवर देखील परिणाम होतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. तसेच जर बाळासाठी प्लॅनिंग करत असाल, तरी देखील कॉफी घेणे टाळावे. त्यामुळे एकंदरीतच तरूण मुलांनी कॉफीचा अतिरेक करू नये. ८. कॅफेनद्वारे शरीराला उत्तेजना मिळते. यामुळे कॉफी घेण्याची सवय आपल्याला लागू शकते. कॉफी मिळाली नाही तर डोकेदुखी, थकवा, निराशा असा त्रासही होऊ शकतो.  

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यपौष्टिक आहारहेल्थ टिप्स