वजन कमी करण्याासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या डाएट्स करतात तर काहीजण फिजिकल एक्टिव्हीटीजचा आपल्या रूटीनमध्ये समावेश करतात. (Weight Loss Tips) पोर्शन कंट्रोलसाठी तुम्हाला काही पदार्थ खाणं टाळावंसुद्धा लागते. वजन कमी करण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतो. काहीजण रात्रीच्यावेळी भात खाणं सोडतात तर काहीजण रात्री भूक असतानाही जेवत नाहीत. याबाबत आहारातज्ज्ञ नुपूर पाटील यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. (Is Avoiding Dinner a Healthy Way to Lose Weight Expert Explains)
डाएट एक्सपर्ट नुपूर यांच्यामते वजन कमी करण्याचा योग्य उपाय हा नाही. कारण यामुळे शरीरात कॅलरीजची कमतरता उद्भवू शकते. याशिवाय आरोग्याच्या समस्याही उद्भवू शकतात. वजन कमी करण्यासाठी शरीरात कॅलरीज मेंटेन करणं गरजेचं असतं. याचा अर्थ असा की कॅलरीज योग्य प्रमाणात घेत नाही आहात. यामुळे मेटाबॉलिझ्म कमी होतो ज्यामुळे वजन कमी होतं. ( Is Skipping Dinner For Weight Loss Healthy)
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन्सच्या रिपोर्टनुसार २ आठवडे लोकांवर करण्यात आलेल्या अभ्यास दिसून आले की जेवणाच्या वेळा आणि पद्धत याचा तब्येतीवर परिणाम दिसून येतो. (Ref) अन्नाचे सेवन आणि वेळेचा विचार करणंही तितकंच महत्वाचे आहे. या अभ्यासात जेवणाच्या वेळा, प्रमाण आणि वेट लॉस यातील संबंध तपासण्यात आला.
रात्री जेवण सोडल्यामुळे ब्लड शुगर लेव्हलवर परिणाम होतो (Side Effects Of Skipping Dinner)
रात्रीचं जेवण सोडण्याच्या सवयीमुळे तुमची ब्लड शुगल लेव्हल डाऊन होऊ शकते. यामुळे थकवा येणं, सुस्ती येणं, अशा ससम्या उद्भवतात. दिवसभर चिडचिड होते. याशिवाय जेवण स्किप करताना तुम्ही इच्छा नसताना अन्हेल्दी पदार्थांचे सेवन करता. ज्यामुळे वजन अधिकच वाढते.
वजन कमी करण्यााचा योग्य मार्ग कोणता? (Tips For Weight Loss)
एक्सपर्टच्यामते वजन कमी करण्यासाठी पोर्शन कंट्रोल आणि बँलेन्स फूडवर लक्ष द्या. डिनरमध्ये लीन प्रोटीन भाज्या, या पदार्थांचा समावेश करा. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. तुम्ही झोपण्याच्या २ ते ३ तास आधी रात्रीचे जेवण करू शकता. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. डाएट फॉलो करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.