वजन वाढणं ही जागतिक समस्या बनली आहे. काहींचे वजन लवकर वाढते. पण कमी करताना नाकीनऊ येते. वजन वाढलं की कमी कसं करावं? असा प्रश्न निर्माण होतो. सध्या मार्केटमध्ये वेट लॉस करण्याचे अनेक फंडे उपलब्ध आहे. बरेच औषधं देखील बाजारात सर्रास विकले जातात. पण बऱ्याचशा औषधांमुळे वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते, किंवा त्याचे साईड इफेक्ट्स शरीरात दिसून येतात. त्यामुळे हे उपाय करण्यापेक्षा आपण फळं म्हणजेच चिकू खाऊन देखील वजन कमी करू शकता(Is Chiku Good For Weight Loss).
आता तुम्ही म्हणाल चिकू खाल्ल्याने वजन कमी कसे होऊ शकते? पोषक तत्वांनी परिपूर्ण चिकू आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामध्ये प्रथिने, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, सी, पोटॅशियम आणि फायबर आढळतात. याच्या सेवनाने इतर आजारांचा धोका कमी होतो, शिवाय पोटही निरोगी राहते. चिकूमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट वजन कमी करण्यास मदत करते. जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर, कशा पद्धतीने चिकू खावे? पाहा.
चिकू खाण्याचे फायदे
वजन कमी करण्यास मदत
ऑन्ली माय हेल्थ या वेबसाईटनुसार, जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर, चिकू खा. चिकूमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. अशा वेळी उलट सुलट पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. शिवाय चयापचयाची क्रिया गतिमान होते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
गुडघ्यातून करकर आवाज, ऐन तारुण्यात हाडं ठणकतात? कपभर दूधात ‘हा’ सुकामेवा घाला, हाडं होतील दणकट
उर्जेने परिपूर्ण
चिकू हे फळ उर्जेने परिपूर्ण असते. यामध्ये कार्बोहायड्रेट्स मुबलक प्रमाणात आढळते. शिवाय थकवाही दूर होतो. वजन कमी करताना आपली एनर्जी लेव्हल कमी होते. ज्यामुळे इतर कामे करताना थकवा जाणवतो. त्यामुळे चिकू खा. चिकू खाल्ल्याने वजन कमी होईल, शिवाय उर्जाही प्राप्त होईल.
पचनसंस्थेसाठी फायदेशीर
चिकूमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. यामधील फायबर बद्धकोष्ठता, गॅस, अपचन आणि अॅसिडिटीच्या समस्यांपासून आराम देते. चिकूमधील दाहक-विरोधी गुणधर्म अन्न पचवण्यासाठी मदत करते. ज्यामुळे पोटाचे विकार आपल्याला छळत नाही.
रसायनयुक्त गुळ कसा ओळखायचा? ३ टिप्स, गुळात भेसळ नाही हे सहज ओळखा..
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त
चिकूमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती तर मजबूत होतेच, शिवाय इतर आजारही दूर राहतात. चिकूमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीराला दीर्घकाळ निरोगी ठेवतात. शिवाय सर्दी, खोकला आणि फ्लूपासून सरंक्षण करते.