Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > नारळाच्या दुधानं मिळतं पोषण आणि घटतं वजन! वजन कमी करण्याचा हा घ्या पौष्टिक मार्ग

नारळाच्या दुधानं मिळतं पोषण आणि घटतं वजन! वजन कमी करण्याचा हा घ्या पौष्टिक मार्ग

सध्या आहारात नारळाच्या दुधाचं (coconut milk in diet) महत्व वाढलं आहे. नारळाच्या दुधातल्या पोषक घटकांमुळे शरीराला पोषण मिळतं आणि वजन कमी होतं (coconut milk for weight loss) हा दुहेरी फायदा होतो. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2022 06:39 PM2022-09-06T18:39:22+5:302022-09-06T18:48:51+5:30

सध्या आहारात नारळाच्या दुधाचं (coconut milk in diet) महत्व वाढलं आहे. नारळाच्या दुधातल्या पोषक घटकांमुळे शरीराला पोषण मिळतं आणि वजन कमी होतं (coconut milk for weight loss) हा दुहेरी फायदा होतो. 

Is coconut milk helps to weight loss? | नारळाच्या दुधानं मिळतं पोषण आणि घटतं वजन! वजन कमी करण्याचा हा घ्या पौष्टिक मार्ग

नारळाच्या दुधानं मिळतं पोषण आणि घटतं वजन! वजन कमी करण्याचा हा घ्या पौष्टिक मार्ग

Highlightsनारळाच्या दुधात कॅलरीजचं प्रमाण कमी असतं.सकाळी नाश्त्याच्या वेळेस नारळाचं दूध घेतल्यास दिवसभर भूक नियंत्रणात राहाते.मिठाई, खीर करताना नारळाच्या दुधाचा वापर करता येतो. 

वेगन डाएटच्या (vegan diet)   निमित्तानं आहारात नारळाच्या दुधाचं महत्व वाढलं आहे. गायी म्हशीच्या दुधाप्रमाणेच नारळाच्या दुधातून शरीराला आवश्यक ते पोषक घटक (nutrition in coconut milk)  मिळतात. तसेच नारळाच्या दुधातून पोषण मिळण्यासोबतच वजन कमी होण्यासही मदत होते. नारळाच्या दुधामुळे चयापचय क्रियेचा वेग वाढतो आणि वजन कमी (coconut milk for weight loss)  होण्यास मदत होते.

नारळाच्या दुधात ब1, ब3, ब5 , ब6 आणि क ही जीवनसत्वं असतात. नारळाच्या दुधात कॅल्शियम, मॅग्नेशियम, सेलेनियम, फाॅस्फरस हे महत्वाचे घटकही असतात. ज्यांना गायी- म्हशीच्या/ बकरीच्या दुधाची ॲलर्जी आहे त्यांच्यासाठी नारळाचं दूध सुरक्षित आणि पोषक मानलं जात.

Image: Google

नारळाचं दूध आणि वेट लाॅस

नारळाच्या दुधात उष्मांकाचं प्रमाण कमी असतं. त्यामुळेच गायी-म्हशीच्या दुधाऐवजी नारळाचं दूध प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत होते. नारळाच्या दुधानं चयापचय क्रियेचा वेगही वाढतो त्यामुळे नारळाचं दूध वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतं. 
2. नारळाच्या दुधात सॅच्युरेट फॅट्स असतात. सकाळी नाश्त्याला नारळाचं दूध सेवन केल्यास दिवसभर भूक नियंत्रणात राहाते.
3. नारळाच्या दुधानं पचनासंबंधीच्या समस्या दूर होण्यास मदत होते तसेच इरिटेबल बाउल सिंड्रोम सारख्या आजारातही नारळाचं दूध सेवन करणं फायदेशीर ठरतं.  नारळाच्या दुधात जठराला फायदेशीर असे अतिसूक्ष्मजीव विरोधी गुणधर्म असतात. 

Image: Google

नारळाचं दूध कसं घ्यावं?

गायी म्हशीच्या दुधाप्रमाणे नारळाचं दूधही सेवन करता येतं. तसेच चहा करतानाही नारळाचं दूध वापरता येतं.  मिठाई आणि खीर बनवताना नारळाच्या दुधाचा उपयोग करता येतो. वजन कमी करण्यासाठी नारळाचं दूध घ्यायचं असेल तर त्यात साखर टाकून पिऊ नये. नारळाचं दूध दिवसा विशेषत: सकाळी नाश्त्याच्या वेळेस घेणं फायदेशीर मानलं जातं. नारळाचं दूध सकाळच्या वेळेत घेतलं तर चयापचयाचा वेग वाढतो त्याचा पचन योग्य होण्यासाठी आणि वजन कमी होण्यासाठी फायदा होतो. नारळाच्या दुधाचा आहारात समावेश करताना शारीरिक हालचाली, शारीरिक व्यायाम वाढवण्यावरही भर द्यायला हवा. व्यायाम जर पुरेसा केला नाही तर केवळ नारळाच्या दुधानं वजन कमी होण्यासाठी वेळ लागतो. 

Web Title: Is coconut milk helps to weight loss?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.