Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > कोण म्हणतं चपाती खाल्ल्यानं वजन वाढतं? ५ नियम लक्षात ठेवा; कायम राहाल परफेक्ट फीट

कोण म्हणतं चपाती खाल्ल्यानं वजन वाढतं? ५ नियम लक्षात ठेवा; कायम राहाल परफेक्ट फीट

Is eating chapati daily good for health : चपाती खाण्याचे फायदे, चपाती खाणं कोणी टाळावं कोणी टाळू नये याबाबत सांगितले आहे. (Should you have rice or roti for dinner)

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 01:48 PM2023-04-03T13:48:01+5:302023-04-03T14:46:26+5:30

Is eating chapati daily good for health : चपाती खाण्याचे फायदे, चपाती खाणं कोणी टाळावं कोणी टाळू नये याबाबत सांगितले आहे. (Should you have rice or roti for dinner)

Is eating chapati daily good for health : Here's how eating chapati everyday is good for your health | कोण म्हणतं चपाती खाल्ल्यानं वजन वाढतं? ५ नियम लक्षात ठेवा; कायम राहाल परफेक्ट फीट

कोण म्हणतं चपाती खाल्ल्यानं वजन वाढतं? ५ नियम लक्षात ठेवा; कायम राहाल परफेक्ट फीट

वजन घटवण्यासाठी अनेकजण चपाती खाणं टाळतात तर काहीजण भात खाणं टाळतात. चपातीमध्ये ग्लूटेन असतं चपाती खाल्यानं वजन वाढतं तर चपाती पचायला जड असते असे अनेक समज गैरसमज लोकांच्या मनात असतात. (Is eating chapati daily good for health) ग्लुटेन फ्री आहार घेणारे बरेच लोक आहारात चपातीचा समावेश करत नाहीत.  डॉ. चैताली राठोड यांनी चपाती खाण्याचे फायदे, चपाती खाणं कोणी टाळावं कोणी टाळू नये याबाबत आपल्या इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे. (Should you have rice or roti for dinner) 

दुपारच्या जेवणासाठी तर काहीजण नाश्त्याला चपाती खातात. तर नॉनव्हेज किंवा खास बेत असेल तेव्हा चपाती न खाता वडे, भाकरी, नान अशा पदार्थांची निवड केली जाते.  पण रोज ऑफिसला टिफीनमध्ये खाण्यासाठी लोकांची पहिली पसंती चपातीलाच असते. भाकरी कडक होतात त्यामुळे गरमागरम चांगल्या लागतात. याऊलट चपाती एकदा केल्यानंतर दिवसभर मऊ लागते त्यामुळे सहज खाल्ली जाते. 

गहू खाणं कोणी टाळावं?

ज्या लोकांचे वजन जास्त आहे, लठ्ठपणा आणि बैठ्या जीवनशैलीचे त्रास आहेत त्यांनी गव्हाचं सेवन टाळावं. ज्या लोकांना पोट फुगणं आणि जठरासंबंधी, पचनाच्या समस्या आहेत त्यांनी  गव्हाचं सेवन टाळावं कारण गहू पचायला जड असतो.
गव्हाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो आणि चवीला गोड असतो म्हणून ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी गव्हाचं सेवन टाळायला हवं.  गव्हाच्या सेवनानं कफ दोष  वाढतो त्यामुळे तुम्हाला ताप, खोकला,सर्दी- फ्लू अशा कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत असेल तर  गव्हाचं सेवन टाळावं.

शरीरातलं बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारी भाजी, रोज खा-बीपी वाढण्याचा त्रासही होईल कमी

गहू कोणी खावेत

शरीरात युरिक एसिड जास्त असल्यास  गव्हाचे सेवन करावे. ज्या व्यक्तीला जळजळ होत असेल किंवा जास्त पित्ताचा त्रास असेल, स्तनपान करणाऱ्या स्त्रीला ते चांगल्या स्तनपानासाठी चपाती फायदेशीर असू शकते. वजन वाढवण्यासाठी किंवा स्नायूंच्या ताकदीसाठी गव्हाचे सेवन फायदेशीर ठरते. शरीराच्या योग्य पोषणासाठी तुम्ही गव्हाचा आहारात  समावेश करू शकता.

Web Title: Is eating chapati daily good for health : Here's how eating chapati everyday is good for your health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.