Join us  

पोट सुटलंय-व्यायाम शक्यच होत नाही? रोज सकाळी चमचाभर या बीया खा, महिन्याभरात व्हाल बारीक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 1:58 PM

Is It Chia Seeds Lose Weight : या बीया एंटी ऑक्सिडेंट्सनी परिपूर्ण असतात. ज्यामुळे ऑक्सिडेटिव्ह ताण-तणाव कमी होतो आणि वजन कमी करण्यासही मदत होते.

चिया सिड्स (Chia Seeds) खाण्याचं मुख्य कारण असं की त्या खूपच पौष्टीक असतात. यात फायबर्स, प्रोटीन्स, गुड फॅट्स सुक्ष्म पोषक तत्व चांगल्या प्रमाणात असतात. छोट्याश्या दिसणाऱ्या या बीया फायबर, फॉस्फरस, मॅग्नशियम, कॅल्शियम आणि ओमेगा ३ फॅटी एसिड्सचा चांगला स्त्रोत आहेत. (Is It Chia Seeds Lose Weight)

या बीया एंटी ऑक्सिडेंट्सनी परिपूर्ण असतात. ज्यामुळे ऑक्सिडेटिव्ह ताण-तणाव कमी होतो आणि वजन कमी करण्यासही मदत होते.  जर तुम्ही चिया सिड्सच्या ड्रिंकचे सेवन केले तर बेली फॅट सहज कमी होण्यास मदत होईल. हे हेल्दी ड्रिंक तयार करण्यासाठी कृती आणि साहित्य माहित  करून घ्या. (Chia Seeds For Weight Loss Weight Loss Tips)

चिया सिड्सचे ड्रिंक तयार करण्याची योग्य पद्धत

हे हेल्दी ड्रिंक तयार करण्यासाठी दालचिनीचे तुकडे एक जग पाण्यात भिजवायला ठेवा नंतर यात चिया सिड्स मिक्स करा. सकाळी रिकाम्यापोटी या पाण्याचे सेवन करा. दुसरी पद्धत अशी की चिया सिड्सचे ड्रिंक तयार करण्यासाठी तुम्ही पाण्यात दालचिनी पावडर घालून १० मिनिटं उकळवूनन घ्या नंतर गाळून घ्या यात चिया सिड्स मिळून प्या. 

केस पांढरे झालेत? ना डाय ना हेअर कलर; 3 घरगुती उपाय करा, दाट-काळे होतील केस

चिया सिड्सचे ड्रिंक पिण्याचे फायदे

चिया सिड्समध्ये डाएटरी फायबर्स असतात. २ मोठे चमचे चिया सिड्समध्ये १० ग्राम फायबर्स असतात. अभ्यासातून असे दिसून येते की फायबर्सचे नियमित सेवन केल्याने मल त्याग करण्यास मदत होते. रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते. आतड्यांचे आरोग्यही चांगले राहते. 

हार्वर्ड हेल्थच्या रिपोर्टनुसार चिया सिड्समध्ये ओमेगा ३ फॅटी एसिड्स असतात. यात अल्फा लिनोलेनिकक एसिड असते. ज्यामुळे सूजविरोधी गुण कमी होण्यास मदत होते. चिया सिड्स एंटीऑक्सिडेंट्सनी परिपूर्ण असतात. ज्यामुळे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो (Ref). याव्यतिरिक्त संशोधनात असे दिसून आले की या बीयांमुळे रक्तदाब कमी होऊन हृदयाचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते.

चिया सिड्स शाकाहारी लोकांमधील प्रोटीनची कमतरता दूर करण्यास मदत करतात. प्रोटीन एक आवश्यक मायक्रोन्युट्रिएंट आहे. ज्यामुळे मासंपेशी निरोगी राहण्यास आणि शारीरिक प्रक्रिया चांगल्या राहण्यास मदत होते. जेव्हा तुम्ही चिया सिड्स खाता तेव्हा तुम्हाला कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जिंक, सेलेनिययम, फॉलेट, व्हिटामीन ए, व्हिटामीन बी, मिळते. यातील सुक्ष्म पोषक तत्व चयापचन, हाडांचे आरोग्य आणि प्रजनन संस्था चांगली ठेवण्यास मदत करतात. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्स