Join us  

नाश्ता करायलाच हवा, पोटभर नाश्ता करुनच घराबाहेर पडा-हे कितपत खरं? आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2024 6:02 PM

Diet Plan As Per Ayurveda: नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण कसं असावं, याविषयी आयुर्वेदानुसार देण्यात आलेली ही माहिती एकदा बघाच...

ठळक मुद्देनाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण किती प्रमाणात असावं, किती वाजता करावं, याविषयी आयुर्वेदतज्ज्ञांनी दिलेली माहिती....

आपण हल्ली बऱ्याच जणांकडून असं ऐकतो की सकाळचा नाश्ता अगदी पोटभर असला पाहिजे. नाश्ता कसा राजासारखा करावा.. म्हणजेच भरपूर करावा. त्यामुळे आताच्या भाषेत सांगायचं तर अनेक जण अगदी 'हेवी' नाश्ता करून घराबाहेर पडतात. पण अशा पद्धतीने पोटभर नाश्ता करणं योग्य आहे का? त्याचा तब्येतीवर काय परिणाम होतो? किंवा मग नाश्ता हेवी असेल तर दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाचं काय? ते किती प्रमाणात असावं? असे प्रश्न तुमच्या मनात आले असतील तर आयुर्वेदतज्ज्ञांनी दिलेली ही माहिती एकदा वाचायलाच पाहिजे..(Diet Plan As Per Ayurveda)

 

आयुर्वेदानुसार कसा असावा रोजचा आहार?

नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण किती प्रमाणात असावं, किती वाजता करावं, याविषयी आयुर्वेदतज्ज्ञांनी दिलेली माहिती योग अभ्यासकांनी gree_yogabhyasi या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की आयुर्वेदानुसार तुमचा दिवसभराचा आहार सुर्याच्या आकारमानानुसार ठरवण्यात आला आहे.

जुन्या भरजरी साड्या वापरून कंटाळा आला? दिवाळीत त्याच साड्यांपासून मुलींसाठी शिवा ७ सुंदर पॅटर्नचे ड्रेस

१. म्हणजेच सकाळी सुर्य आकाराने लहान असतो. त्यामुळे तुम्ही नाश्ता पोटभरच करा. पण तो कधीही तुमच्या दुपारच्या जेवणापेक्षा जास्त असू देऊ नका. अनेक जण नाश्ता भरपूर करतात आणि त्या तुलनेत दुपारचं जेवण मात्र खूप कमी घेतात. असं करू नका. नाश्ता हा नाश्त्यासारखाच करा. तो जेवणासारखा पोटभर व्हायला नको. कारण सकाळी उठल्यावर सुरुवातीच्या काही तासांत तुमच्या शरीराला एवढ्या जास्त प्रमाणात अन्नाची आवश्यकता नसते. त्यामुळे पचनसंस्था, चयापचय संस्था यावर विनाकारण ताण येऊ शकतो.

 

२. दुपारचं जेवण हे दु. १२ ते २ यादरम्यान व्हायला पाहिजे. हे जेवण पोटभर करा. त्यामध्ये सॅलाड, भाज्या, वरण, चपाती, भात असं सगळं घ्या. दुपारच्या जेवणात थोडं गोड खाल्लं तरी हरकत नाही. पण प्रत्येक पदार्थ प्रमाणात असावा.

उत्तपा खावा वाटल्यास १० मिनिटांत करा खमंग बेत, डाळ-तांदूळ भिजत घालण्याची- वाटण्याची गरजच नाही

३. ७: ३० किंवा जास्तीतजास्त ८ वाजेच्या आधी तुमचं रात्रीचं जेवण व्हायलाच हवं. त्यानंतर तुम्ही जे काही खात असाल ते वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देणारं ठरू शकतं. रात्रीच्या जेवणात उकडलेल्या भाज्या, सूप, धीरडं, पराठे असं हलकं- फुलकं खा. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सआहार योजनाघरगुती उपाय