Join us  

सकाळी पोट साफ होत नाही, जोर लावावा लागतो? उपाशी पोटी ‘हा’ पदार्थ घ्या, कोठा साफ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 8:39 AM

Turmeric Water Everyday Best For Constipation : जर तुम्हाला सकाळी फ्रेश वाटत नसेल  तर दिवसाच्या सुरूवातीला एक ग्लास पाणी प्या.

हेल्थ तुमच्या ओव्हरऑल आरोग्यावर परिणाम करते. (Health Tips) यासाठी स्वत:ला फिट ठेवणं फार महत्वाचे असते. जर सकाळी पोट साफ होत नसेल किंवा तुम्हाला अडचणी येत असतील तर काही घरगुती उपाय करून सकाळी पोट साफ करू शकता. ज्यामुळे सकाळच्यावेळी त्रास होणार नाही. (Constipation Home Remedies)

जर  सकाळी फ्रेश वाटत नसेल  तर दिवसाच्या सुरूवातीला एक ग्लास पाणी प्या. सकाळी उठल्यानंतर पोट साफ होत नसेल तर हा उपाय परिणामकारक ठरू शकतो. एक ग्लास पाणी हलकं गरम करून घ्या. हिवाळ्याच्या  दिवसांत सकाळी उठताच गरम पाणी प्यायल्याने भरपूर फायदे होतील. (Turmeric Water Everyday Best For Constipation)

कोमट पाण्यात हळद घाऊन प्या नंतर टॉयलेटमध्ये जा तुमचं पोट व्यवस्थित साफ होईल. ज्यामुळे गट हेल्थ चांगली राहील. जर  वारंवार कॉन्स्टीपेशनचा त्रास होत असेल तर तुम्ही पूर्वापार वापरात असलेला एक उपाय करू शकता. हा उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. यासाठी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्या. ज्यामुळे मल त्याग होणं सोपं होईल. सकाळी सकाळी कोमट पाणी प्यायल्याने पोटाशी संबंधित समस्या उद्भवणार नाही आणि पोट साफ होईल.

पोट साफ होण्यासाठी हळदीचं पाणी फायदेशीर

पोट साफ होण्यासठी हळद फायदेशीर ठरते. हळदीत करम्यूमिन असते. यात एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात. हळदीत एंटी ऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे फ्री रेडिकल्सपासून लढण्यास आणि शरीराची इम्यून सिस्टीम मजबूत होण्यास मदत होते. गरम पाणी पचनक्रिया चांगली ठेवते हळदीत सूजविरोधी गुण असतात. ज्यामुळे सूज कमी होते. सूजेमुळे ब्लॉटींगच्या समस्येपासून आराम मिळतो आणि पचनक्रिया चांगली राहते. 

८०० किलो नकली पनीर जप्त, भेसळयुक्त पनीरमुळे कॅन्सरचा धोका; FSSI सांगते ३ सेकंदात ओळखा पनीरमधली भेसळ

हळदीतील करक्यूमिन मेटबाॉलिझ्म वाढवते आणि वजन कमी करण्यास मदत करते. वेट मॅनेजमेंटसाठी हळदीच्या पाण्यासोबत तुम्ही डाएट आणि वर्कआऊट रूटिन फॉलो करायला हवं. हळदीत एंटी ऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे एजिंग साईन्सशी लढण्यास मदत होते. त्वचेची चमक वाढते.

घरात कितीजण राहतात-कोणतं तेल वापरता? आहारतज्ज्ञ सांगतात या 3 प्रकारचे तेल वापरा-फिट राहाल

स्किन हेल्दी राहण्यासाठी १ ग्लास पाण्यात पाव चमचा हळद घालून रोज सकाळी प्या. गरम पाणी विषारी पदार्थांना बाहेर काढण्यास मदत करते. हळदीच्या पाण्याने शरीर डिटॉक्स राहते. आजारांपासून सुटका मिळते. आठवड्यातून कमीत कमी २ वेळा हळदीचं पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य