Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन कमी करण्यासाठी जेवणच सोडलं, कमी खाताय? थांबा, तज्ज्ञ सांगतात भयंकर परिणाम...

वजन कमी करण्यासाठी जेवणच सोडलं, कमी खाताय? थांबा, तज्ज्ञ सांगतात भयंकर परिणाम...

Is It Good To Skip Meals For Weight Loss Dietitian Explains : Is Skipping Meals A Good Idea For Your Health And Weight Loss Expert Explains : Can Skipping Meals Help You Lose Weight Expert Explains : वजन कमी करण्यासाठी कमी खाणं किंवा खाणं बंद करणं कितपत योग्य की अयोग्य ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2025 18:39 IST2025-01-03T18:38:31+5:302025-01-03T18:39:29+5:30

Is It Good To Skip Meals For Weight Loss Dietitian Explains : Is Skipping Meals A Good Idea For Your Health And Weight Loss Expert Explains : Can Skipping Meals Help You Lose Weight Expert Explains : वजन कमी करण्यासाठी कमी खाणं किंवा खाणं बंद करणं कितपत योग्य की अयोग्य ?

Is It Good To Skip Meals For Weight Loss Dietitian Explains Can Skipping Meals Help You Lose Weight Expert Explains | वजन कमी करण्यासाठी जेवणच सोडलं, कमी खाताय? थांबा, तज्ज्ञ सांगतात भयंकर परिणाम...

वजन कमी करण्यासाठी जेवणच सोडलं, कमी खाताय? थांबा, तज्ज्ञ सांगतात भयंकर परिणाम...

वाढलेल वजन कमी करण्यासाठी प्रत्येकजण खूप प्रयत्न करत असतात. मांड्यांवरची चरबी, वाढलेलं पोट आणि एकूणच वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट व एक्सरसाइज फॉलो (Is It Good To Skip Meals For Weight Loss Dietitian Explains) केले जातात. सततचे बैठे काम, आहाराच्या चुकीच्या पद्धती, व्यायामाचा अभाव आणि कामाचे ताण यांसारख्या जीवनशैलीविषयक गोष्टींमुळे वजन वाढत राहतं आणि ते कमी करण्यासाठी नेमकं काय करायचं ( Is Skipping Meals A Good Idea For Your Health And Weight Loss Expert Explains) हे अनेकदा आपल्याला समजत नाही. मग कधी आहारात बदल करुन, जेवणाच्या वेळा आणि पद्धती बदलून पाहिल्या जातात. सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे उपाय केले जातात किंवा मित्रमंडळींनी सांगितलेल्या गोष्टी ट्रायल आणि एरर बेसिसवर केल्या जातात. पण काही वेळा यामुळे वजन कमी होण्याबरोबरच आणखी वाढण्याचीही शक्यता असते(Can Skipping Meals Help You Lose Weight Expert Explains).

वजन कमी करण्यासाठी कमी खाल्लं पाहिजे असा काहींचा समज असतो. यासाठीच काहीजण झटपट वजन कमी करण्यासाठी कमी खातात, जेवण कमी करतात किंवा एकवेळचे जेवण स्किप करतात. वजन कमी करायचे म्हणून योग्य आणि हलका आहार घ्यावा किंवा खाण्याच्या योग्य वेळा पाळाव्यात इथपर्यंत ठिक आहे. पण म्हणून कमी खाणे किंवा खाणे बंदच करणे, जेवण स्किप करणे असे बरेच प्रयोग अनेकजण  मनानेच करतात. मात्र याचा शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. वजन कमी करण्यासाठी कमी खाणं किंवा खाणं बंद करणं योग्य आहे की अयोग्य याबाबत, डाएटिशियन सिल्की महाजन हिने तिच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. वजन कमी करण्यासाठी कमी खाणं किंवा खाणं बंद करणं याबाबत डाएटिशियन नेमकं काय सांगतात ते पाहूयात. 

वजन घटवण्यासाठी कमी खाणे योग्य की अयोग्य ?

जेव्हा निरोगी मार्गाने वजन कमी करायचे असते तेव्हा तुम्हाला कधीही कमी खाण्याचा किंवा जेवण पूर्णपणे स्किप करण्याचा सल्ला दिला जात नाही. तुम्ही कदाचित असा विचार करत असाल की वजन कमी करण्यासाठी आहारतज्ज्ञ अनेकदा अमुक एका ठराविक वेळेनंतर थोडं थोडं खाण्याचा सल्ला देतात. पोर्शन कंट्रोलमध्ये, कमी अन्न खाल्ले जाते, परंतु अशावेळी शरीराच्या गरजा लक्षात घेऊन अन्न खाल्ले जाते. जर तुम्ही पोर्शन कंट्रोल करत असाल, तर  तुमच्या प्लेटमध्ये पौष्टिक पदार्थांचाच समावेश करावा. वजन कमी करण्यासाठी तुम्ही दिवसभरात कोणतेही जेवण स्किप करत असाल तर त्याचे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. एकूणच, वजन कमी करण्यासाठी जेवण वगळणे किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय खाण्याचे प्रमाण कमी करणे आरोग्यासाठी योग्य नाही.

वजन कमी करण्यासाठी खात राहा ! झटपट वजन उतरवण्याचा अनोखा फंडा, दिसाल स्लिमट्रिम...

वजन घटवण्यासाठी कमी खाल्ल्याने किंवा जेवण स्किप केल्याने नेमकं होत काय ? 

आहारतज्ज्ञ सिल्की महाजन यांच्यामते, जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी कमी खाल्ले किंवा जेवणे सोडले तर वजन कमी होण्याऐवजी मसल्स लॉस होऊ लागतात. खरंतर, शरीराच्या गरजेपेक्षा कमी कॅलरीज घेतल्यास वजन कमी होण्याऐवजी मसल्स कमी होऊ शकतात. शरीराला आवश्यक ऊर्जा मिळत नसल्याने असे घडते. जेव्हा तुम्ही खात नाही किंवा कमी खात नाही, तेव्हा शरीर ऊर्जा निर्माण करण्यासाठी मसल्सना जाळू लागते. यामुळे मसल्सचे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत वजन कमी करण्यासाठी खाणे कमी करणे किंवा थांबवण्याऐवजी तुम्ही संतुलित आहार घेणे सुरू करू शकता. 

बाळंतपणात वाढलेलं २३ किलो वजन नेहा धुपियाने चटकन केलं कमी! ते कसं, वाचा...

कमी खाल्ल्याने किंवा जेवण स्किप केल्याने आरोग्यावर त्याचे नेमके कोणते परिणाम होतात ? 

१. पचनसंस्थेत बिघाड :- जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी कमी खाल्ले किंवा खाणे बंद केले तर तुम्हाला पोटाशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशा स्थितीत बद्धकोष्ठता, गॅस, पोटात सूज येणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात.

२. प्रतिकारशक्ती कमकुवत होते :- जर तुम्ही कमी खाल्ले किंवा जास्त वेळ उपाशी राहिल्यास तुमच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता होऊ शकते. प्रतिकारशक्ती कमी झाल्याने तुम्ही अशक्त होऊन खूप लवकर आजारी पडू शकता. 

हिवाळ्यात टाचांना भेगा पडल्या, कोरडी त्वचा? बस्स वाटीभर दही काफी है! पाहा खास उपाय...

३. हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम :- जर तुम्ही जेवण कमी केले किंवा स्किप केले तर शरीरातील साखरेची पातळी कमी होते, ज्यामुळे रक्तातील साखर वाढते. यामुळे इन्सुलिनची पातळी वाढू शकते. यामुळे रक्तदाब वाढू शकतो, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात. 

४. मानसिक आरोग्यावर परिणाम :- कमी खाणे किंवा जेवण वगळल्याने व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत, व्यक्तीला चिंता, तणाव आणि नैराश्य यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

निरोगी पद्धतीने वजन कमी करण्यासाठी तुम्ही व्यायाम आणि आहार यामध्ये संतुलन राखले पाहिजे. जर तुम्ही कोणत्याही एका गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित केले तर वजन कमी करण्यात अडचण येऊ शकते. तसेच, कमी खाणे किंवा जेवण स्किप केल्याने वजन कमी होऊ शकते, परंतु यामुळे तुम्हाला अशक्तपणा आणि थकवा जाणवेल. या स्थितीत रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते आणि तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.


Web Title: Is It Good To Skip Meals For Weight Loss Dietitian Explains Can Skipping Meals Help You Lose Weight Expert Explains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.