Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन कमी करायचं म्हणून ताजा भात बंद करुन शिळा भात खावा, हे खरं की खोटं?

वजन कमी करायचं म्हणून ताजा भात बंद करुन शिळा भात खावा, हे खरं की खोटं?

Is leftover rice healthier than freshly cooked rice :शिळा भात जास्त पोषक असतो असं म्हणतात ते कितपत खरं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2024 05:22 PM2024-01-12T17:22:58+5:302024-01-12T17:30:23+5:30

Is leftover rice healthier than freshly cooked rice :शिळा भात जास्त पोषक असतो असं म्हणतात ते कितपत खरं?

Is leftover rice healthier than freshly cooked rice? | वजन कमी करायचं म्हणून ताजा भात बंद करुन शिळा भात खावा, हे खरं की खोटं?

वजन कमी करायचं म्हणून ताजा भात बंद करुन शिळा भात खावा, हे खरं की खोटं?

भारतीय थाळी भाताशिवाय (Stale Rice) अपूर्ण आहे. काहींना भात खाल्ल्याशिवाय आपण जेवलो आहोत, असे वाटत नाही. काहींना भाताशिवाय झोपही लागत नाही. भारतीय घरांमध्ये दररोज भात तयार केला जातो. भातामध्ये देखील विविध प्रकार आहेत. प्रत्येकाची भात तयार करण्याची शैली वेगळी आहे. बहुतांश वेळी भात जास्त प्रमाणात तयार केला जातो. ज्यामुळे भात तर उरतोच, शिवाय उरलेल्या भाताचं करायचं काय? असा प्रश्न निर्माण होतो (Health Tips).

उरलेला भात कोणी जास्त प्रमाणात खात नाहीत. पण उरलेला भात खाण्याचे अनेक फायदे आहेत. उरलेला भात खाताना जर आपण नाक मुरडत असाल तर, एकदा शिळा भात खाण्याचे फायदेही पाहा(Is leftover rice healthier than freshly cooked rice).

यासंदर्भात, पोषणतज्ज्ञ पूजा मखिजा सांगतात, शिजवलेला भात थंड झाल्याने त्यात स्टार्च रेट्रोग्रेडेशन नावाची प्रक्रिया सुरु होते. ज्यामुळे पचण्यायोग्य स्टार्चचे प्रतिरोधक स्टार्चमध्ये रुपांतरीत होते. पचण्याजोगे स्टार्च हे शरीराचे विघटन करते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते. ज्यामुळे आरोग्य निरोगी राहते.'

कोण म्हणतं फक्त डाएट- वर्कआउट केल्यानेच वजन घटतं? ५ सोपे बदल, सहज घटेल वजन

उरलेला भात खाण्याचे फायदे

वजन कमी करण्यास मदत

बरेच जण वजन वाढेल या भीतीने भात खाणं टाळतात. पण उरलेला भात खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. शिळ्या भातात ताज्या भातापेक्षा कमी कॅलरीज असतात. शिवाय त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. भात तयार करताना त्यात जिरे किंवा मिरपूड घाला, यामुळे देखील वेट लॉससाठी मदत होईल.

पोटाचे विकार होतील दूर

बिघडलेल्या जीवनशैलीमुळे पोटाचे विकार वाढतात. गॅस, अपचन, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करायचं असेल तर, शिळा भात खा. शिळ्या भातामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. फायबरचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. शिवाय पोटाचे इतर विकारही छळणार नाही.

शरीराचे तापमान नियंत्रित राहते

तांदूळ शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. याचे नियमित सेवन केल्याने शरीरात उष्णता वाढत नाही. शिवाय पचायला देखील हलके असते.

वजन कमी करताना चहा पिणं किती योग्य? चहा पिऊनही वजन कमी होऊ शकते? तज्ज्ञ सांगतात

इतर पौष्टीक घटकांनी परिपूर्ण

उरलेल्या भातामध्ये आयर्न, पोटॅशियम आणि कॅल्शियमसारखे पौष्टीक घटक असतात. ज्यामुळे निरोगी राहण्यास मदत होते. शिवाय गंभीर आजारांचा धोकाही कमी होतो. 

Web Title: Is leftover rice healthier than freshly cooked rice?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.