Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > भात खाल्ल्यानं खरंच वजन वाढतं? फक्त भात खाताना १ गोष्ट लक्षात ठेवा, आहारतज्ज्ञांचा सल्ला...

भात खाल्ल्यानं खरंच वजन वाढतं? फक्त भात खाताना १ गोष्ट लक्षात ठेवा, आहारतज्ज्ञांचा सल्ला...

Is Rice Good for Weight Loss Or Is It Fattening You : तांदुळावर प्रक्रिया जितक्या कमी केलेल्या असतील तितके त्यामधील फायबरचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे कमी भात खाऊन देखील पोट भरते व वजन नियंत्रणात ठेवण्यात मदत मिळते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 09:30 AM2023-04-15T09:30:00+5:302023-04-15T12:50:17+5:30

Is Rice Good for Weight Loss Or Is It Fattening You : तांदुळावर प्रक्रिया जितक्या कमी केलेल्या असतील तितके त्यामधील फायबरचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे कमी भात खाऊन देखील पोट भरते व वजन नियंत्रणात ठेवण्यात मदत मिळते.

Is Rice Good for Weight Loss Or Is It Fattening You : Here's How To Eat White Rice On A Weight Loss Diet! | भात खाल्ल्यानं खरंच वजन वाढतं? फक्त भात खाताना १ गोष्ट लक्षात ठेवा, आहारतज्ज्ञांचा सल्ला...

भात खाल्ल्यानं खरंच वजन वाढतं? फक्त भात खाताना १ गोष्ट लक्षात ठेवा, आहारतज्ज्ञांचा सल्ला...

वजन कमी करण्यसाठी अनेकजण भात खाणं सोडतात  तर काहीजण ब्राऊन राईस खातात. भात आणि वजनवाढ याबाबत लोकांमध्ये अनेक भेद मतभेद आहेत. वजन कमी करण्यासाठी भात कसा शिजवायचा, कोणत्या प्रकारच्या भाताचा आहारात समावेश करावा याबाबत क्लिनिकल डाएटिशियन नियती नाईक (कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई) यांनी अधिक माहिती दिली आहे. (Is Rice Good for Weight Loss Or Is It Fattening You)

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारचा तांदूळ खावा?

भारतीय आहारातील एक प्रमुख पदार्थ आहे भात. देशभरातील जवळपास सर्व घरांमध्ये रोजच्या आहारात भात खाल्ला जातो.  असे असून देखील खूप जास्त भात खाल्ल्याने वजन वाढते अशी टीका तांदुळावर केली जाते. प्रत्येक आहारामध्ये भात योग्य प्रमाणात खाल्ला जात असेल आणि ताटातील उर्वरित पदार्थ संतुलित असतील तर तुम्ही कोणत्या प्रकारचा तांदूळ वापरता याने फारसा फरक पडत नाही. पण तरीही निवड करायचीच असेल तर, कमीत कमी प्रक्रिया केलेला किंवा अनपॉलिश्ड तांदूळ वापरणे हितावह आहे.

रोज चालायला जाऊनही पोट-मांड्या कमीच होईना? उन्हाळ्यात ५ पदार्थ खा; फिगर दिसेल मेंटेन

तांदुळावर प्रक्रिया जितक्या कमी केलेल्या असतील तितके त्यामधील फायबरचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे कमी भात खाऊन देखील पोट भरते व वजन नियंत्रणात ठेवण्यात मदत मिळते. ब्राऊन राईस, लाल तांदूळ, काळा तांदूळ हे असे काही पर्याय आहेत जे अनपॉलिश्ड असतात आणि त्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तांदूळ कोणत्या प्रकारचा आहे यापेक्षा ताटामधील भाताचे प्रमाण व ताटातील इतर पदार्थ संतुलित आहेत की नाही याला जास्त महत्त्व असते.

2. कोणत्या प्रकारचा तांदूळ खाणे टाळावे?

संतुलित आहारामध्ये जर भाताचा समावेश असेल आणि त्याचे प्रमाण नियंत्रणात असेल तर भात खाणे टाळण्याची अजिबात गरज नाही. पण तरीही जर भात खाणे टाळायचे असेल तर पॉलिश्ड तांदूळ खाणे टाळावे. तांदुळाचा प्रकार कोणताही असला तरी चालेल, पण तो जास्तीत जास्त नैसर्गिक स्वरूपात असेल तर तब्येतीसाठी चांगला असतो.

रोज किती पाऊलं चालल्यानं वजन पटापट कमी होतं? सुडौल, फिट राहण्यासाठी तज्ज्ञ सांगतात...

फॅड डाएट्सचा जमाना आहे, कॉलीफ्लॉवर राईस किंवा ब्रोकोली राईस असे पर्याय मोठ्या प्रमाणावर येत आहेत. पारंपरिक तांदुळापेक्षा त्यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण कमी असते पण या तांदुळांवर देखील खूप जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेली असते त्यामुळे हे पर्याय आरोग्यास हानिकारक आहेत.

Web Title: Is Rice Good for Weight Loss Or Is It Fattening You : Here's How To Eat White Rice On A Weight Loss Diet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.