Join us  

भाताने खरंच वजन वाढतं? 'या' पद्धतीने शिजवून भात खा, पोटभर खाल्ला तरी वजन वाढणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2024 5:53 PM

Is Rice High in Calories or Weight-Loss-Friendly? : वजन कमी करतानाही भात आनंदाने खाऊ शकता, फक्त भात खाण्याची 'ही' पद्धत जाणून घ्या

भात (Rice) खाल्ल्यानं वजन वाढतं अशी एक समाज आहे (Weight Loss). पण खरंच भात खाल्ल्यानं वजन वाढतं का? भारतीयांचं भात खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही. भाताचे अनेक पदार्थ केले जातात (Rice). जे आवडीने खाल्ले जातात. भात खाण्याचे अनेक फायदे आहेत (Fitness). त्यात फायबर, कॅल्शियम, लोह आणि इतर खनिजे आढळतात.

पण भात सोडल्यानं शरीराला पुरेशा प्रमाणात कार्ब्स मिळत नाही (Rice for Weight loss). अशावेळी शरीर उर्जा निर्माण करण्यासाठी स्नायूंमधील प्रथिने वापरण्यास सुरवात करते. शरीराच्या अन्य गरजांसाठी लागणारी जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता देखील जाणवते. त्यामुळे भात सोडू नका, आपण वेगळ्या पद्धतीने भात खाऊ शकता(Is Rice High in Calories or Weight-Loss-Friendly?).

फ्लॉवर भात

MUSC हेल्थ फ्लॉवर खाण्याचे अनेक फायदे आहेत. यात अँटिऑक्सिडंट्स, विशेषत: व्हिटॅमिन सी आणि मॅंगनीज आढळते. फ्लॉवर भातामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. त्यामुळे आपल्या आवडीने त्यात मसाले घालून फ्लॉवर भात तयार करू शकता.

चपाती खाऊन वजन वाढतं? 'या' पिठाच्या चपात्या खा; वेट लॉस होईल - भुकेवरही राहील कंट्रोल

सोया पुलाव

सोया चंक्स हे प्रोटीनचे उत्तम सोर्स आहे. या व्यतिरिक्त त्यात फायबर, ओमेगा -3 फॅटी ऍसिड आणि इतर अनेक घटक आढळतात. त्यामुळे आपण सोया चंक्स घालून चमचमीत पुलाव तयार करू शकता. प्रोटीनमुळे वेट लॉस तर होतेच, शिवाय खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासही मदत होते.

क्विनोआ

क्विनोआमध्ये लोह आणि फायबर चांगल्या प्रमाणात आढळतात. याशिवाय यामध्ये अँटीसेप्टिक, अँटी कॅन्सर आणि अँटी एजिंग गुणधर्मही आहेत. वेट लॉससोबतच पचनसंस्थाही सुधारते. मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी क्विनोआ फायदेशीर ठरते. यामुळे रक्तातील साखरेची पातळीही कमी होते. यासह हृदयासाठीही फायदेशीर मानले जाते. ते ग्लूटेन मुक्त आहे.

कितीही खाल्लं तरी शरीर हाडकुळं? रोज खा ४ पैकी १ पदार्थ; निरोगी वजन वाढवण्यासाठी सोपा उपाय

ब्रोकोली पुलाव

आपण ब्रोकोलीचे छोटे तुकडे करून त्याचा पुलाव तयार करू शकता. या भातामध्ये जीवनसत्त्वे आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. ब्रोकोलीमध्ये प्रथिनांचे प्रमाणही जास्त असते. जे वजन कमी करण्यास मदत करते. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स