Join us  

श्रावणात फुटाणे खाण्याची खास परंपरा, फुटाणे सालांसह खावेत की नाही? तब्येतीसाठी पाहा फायदेशीर काय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 5:21 PM

Is Roasted Gram Better With Or Without Skin Chana : आरोग्याच्या दृष्टीने पाहायचं झालं तर भाजलेले चणे खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात कारण यात फायबर्स, एंटीऑक्सिडेंट्सचे प्रमाण भरपूर असते.

चणे (Chane) हा भारतातील प्रसिद्ध पदार्थ आहे. लोक वेगवेगळ्या प्रकारे आपल्या आहारात चण्यांचा समावेश करतात. चण्यांमध्ये प्रोटीन्स, फायबर्स आणि इतर पोषक तत्व  असतात. पण अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो की चणे सालीसकट खावेत की साल काढून खावेत. डायटिशियन आयुषी यादव यांनी उत्तम पर्याय सांगितला आहे. (Is Roasted Gram Better With Or Without Skin Chana) 

भाजलेल्या चण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात. जे पचनक्रियेसाठी उत्तम ठरतात. फायबर्सचे सेवन केल्याने गॅसच्या समस्या उद्भवत नाहीत.  फायबर्स खाल्ल्याने दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं. ज्यामुळे तुम्ही ओव्हर इटींग करत नाही. खासकरून अशा लोकांसाठी हे फायदेशीर ठरते  जे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत. यातील एंटी ऑक्सिडेंट्स शरीरासाठी लाभदायक ठरते.  यातील एंटीऑक्सिडेंट्स शरीरातील फ्री रेडिकल्सशी लढण्यास मदत करतात. ज्यामुळे सेल्सचे नुकसान होत नाही आणि वय वाढण्याची प्रक्रिया संथ होते. 

बिना सालीचे चणे खाण्याचे फायदे

बिना सालीचे चणे खाण्याचा खास फायदा असा की यामुळे पचन चांगले होते. काही लोक सालीसकट या चण्यांचे सेवन करतात. गॅसमुळे जड वाटणं या समस्या यामुळे उद्भवत नाहीत. ज्या लोकांची पचनक्रिया कमजोर असते त्यांनी साली नसलेल्या चण्याचे सेवन करा. याव्यतिरिक्त चण्यांमध्ये इतर पोषक तत्व असतात. यातील प्रोटीन्स, मिनरल्स आणि फायबर्सचे प्रमाण कमी असते. अन्य पोषक तत्व शरीराला आवश्यक उर्जा आणि पोषण देतात.

आरोग्याच्या दृष्टीने पाहायचं झालं तर भाजलेले चणे खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात कारण यात फायबर्स, एंटीऑक्सिडेंट्सचे प्रमाण भरपूर असते. या चण्यांच्या सेवनाने पचनक्रिया चांगली राहते. वजन नियंत्रणात  ठेवण्यास मदत होते. पचनक्रियेशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत. सालं नसलेले चणे खाणं तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो. चणे आवश्यक पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात. जे शरीरासाठी फायदेशीर ठरते. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सफिटनेस टिप्स