Join us  

रात्री जेवल्यानंतर फक्त १० मिनिटं चाला; आजार दूर होतील-फिट दिसाल, वाचा आश्चर्यकारक फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 1:59 PM

Is walking after dinner really good for health know facts : खासकरून जेवल्यानंतर चालल्याने वजन कमी होण्यास मदत होते असा लोकांचा समज असतो. म्हणूनच रात्रीच्या जेवणानंतर बरेचजण चालायला जातात.

हेल्दी राहण्यासाठी बॅलेंस लाईफस्टाईल फार गरजेची असते. फिजिकल एक्टिव्हीटीज आणि योग्य डाएट घ्यायला हवं.  बॅलेंस डाएट आणि रोज व्यायाम केल्यानं फिट राहण्यास मदत होते. फिजिकल एक्टिव्हीजसमध्ये व्यायाम नाही तर वॉकिंगचाही समावेश असतो. खासकरून जेवल्यानंतर चालल्याने वजन कमी होण्यास मदत होते असा लोकांचा समज असतो. म्हणूनच रात्रीच्या जेवणानंतर बरेचजण चालायला जातात. (Is walking after dinner really good for health know facts)

जर तुम्ही रात्री जेवल्यानंतर लगेच झोपत असाल किंवा वॉक करत नसाल तर खाल्लेलं अन्न पचण्यासाठी बराचवेळ लागू शकतो.  याचे साईड इफेक्ट्सही उद्भवू शकतात. जर तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर वॉक केलं तर याचे अनेक फायदे मिळतात. न्यूट्रिशनिस्ट फलक हनीफ यांनी  एका हिंदी वेबसाईटशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. 

अन्न पचण्यास मदत होते

जेव्हा आपण जेवतो तेव्हा डायजेस्टिव्ह ज्यूसचे सिक्रेशन होते आणि अन्न पचण्यास मदत होते. तुम्ही जेवल्यानंतर तुम्ही एक्टिव्ह राहता तेव्हा पोटावर अतिरिक्त दबाव पडतो आणि जेवण डायजेस्टिव्ह ट्रॅक्टमध्ये सहज मुव्ह होते आणि पचते.  जेवल्यानंतर गॅस, एसिडिटीचा त्रास होत नाही. जेवल्यानंतर ब्लोटींग किंवा एसिडिटी होण्याचा त्रास टळतो. 

वय कमी पण केस पिकलेत? मेहेंदीत 'हा' सिक्रेट पदार्थ मिसळून लावा; काळे-शायनी होतील केस

ब्लड शुगर नियंत्रणात राहते

रात्रीच्या जेवणानंतर वॉक केल्यानं ब्लड शुगर लेव्हल कमी होते. म्हणून एक्सपर्ट्स जेवणानंतर चालण्याचा सल्ला देतात. टाईप १ आणि टाईप २ डायबिटीस असलेल्या लोकांनी जेवणानंतर वॉक केल्यास ब्लड शुगर लेव्हल मॅनेज होण्यास मदत होते.  म्हणून शुगर लेव्हल मॅनेज करण्यासाठी जवळपास ३० मिनिटं चालायला हवं.

वजन नियंत्रणात राहतं

रात्री जेवल्यानंतर चालायला गेल्यास वजन कमी होण्यास मदत होते. याशिवाय कॅलरी काऊंट आणि व्यायामाकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. लोक फक्त जीमला गेल्यानं वजन कमी होतं असं समजतात. पण वेट लॉससाठी  रेग्लुलर वॉक करणंही गरजेचं आहे.

पोटावर मोठ्ठे टायर्स दिसतात, शरीर बेढब झालं? फक्त 'हे' छोटा बदल करा, लवकर व्हाल फिट

वॉक करताना हे लक्षात ठेवा

जेवल्यानंतर वॉक करताना तुम्ही हे लक्षात ठेवायला हवं की आपल्या क्षमतेनुससार वॉक करा. क्षमतेपेक्षा जास्त चालल्याने नसांमध्ये तणाव, मसल्स क्रॅम्प्स, थकवा येणं अशा समस्या उद्भवतात. जेवणानंतर लगेच न चालता थोडा गॅप ठेवून चाला. जेवल्यानंतर एकदम वेगाने नं चालता थोडा गॅप ठेवून चाला.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स