तांदूळ भारतातील सगळ्यात महत्वपूर्ण अन्नपदार्थांपैकी आहे. भात खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. जास्त प्रमाणात भात खाल्ल्यामुळे शरीराचं नुकसानही होऊ शकतं. यात आर्सेनिक नावाचे घातक तत्व असते. ज्यामुळे किडनी आणि लिव्हरच्या आरोग्याला धोका पोहोचतो. (Bhat khanyache tote in marathi)
याशिवाय भाताचा ग्लासेमिक इंडेक्स हा उच्च असतो ज्यामुळे ब्लड शुगर वाढू शकते. तांदळातील फायटेट्स आणि प्युरीनयुक्त पदार्थ शरीराला नुकसान पोहोचवतात. यामुळे डायबिटीस, लठ्ठपणा यांसारख्या समस्या उद्भवतात. भात खाण्याचे फायदे आणि नुकसान समजून घेऊ. (What Happens to Your Body When You Eat Rice Every Day)
१) तांदळात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. जेव्हा तुम्ही जास्त प्रमाणात भात खाता तेव्हा शरीरात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण वाढते. यामुळे ब्लड स्ट्रीममध्ये ट्रायग्लिसराईडस म्हणजेच फॅट्सयुक्त पदार्थांचा स्तर वाढतो.
ओटीपोट सुटलंय, व्यायामाचा कंटाळा येतो? अंथरुणात पडून रोज १ योगासन करा; स्लिम होईल पोट
२) ट्रायग्लिसराईड्स वाढल्यामुळे कोलेस्टेरॉलचा स्तरही वाढतो. ट्रायग्लिसराईड वाढल्यामुळे कोलेस्टेरॉल वाढण्याचाही धोका असतो. म्हणून हाय कोलेस्टेरॉलचा त्रास असल्यास कमीत कमी प्रमाणात भाताचे सेवन करावे.
५४ वर्षीय भाग्यश्रीच्या दाट-शायनी केसाचं सिक्रेट; सुंदर केसांसाठी २ प्रकारच्या तेलाने करते मालिश
३) दिवसरात्र भात खाल्ल्याने मेटाबॉलिझ्मवरही परिणाम होतो. भातात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असतो. अधिक प्रमाणात ग्लुकोज सेवन इंसुलिनच्या स्तरावर परिणाम करते. यामुळे शुगर लेव्हल वाढते आणि डायबिटीसचा धोकाही वाढतो.
४) तांदळात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्यामुळे वजनही वाढू शकतं. लठ्ठपणामुळे मेटाबॉलिझ्मवर वाईट परिणाम होतो. डॉक्टराच्यामते रोज भात खाल्ल्याने हृदयाच्या आजारांचाही धोका वाढतो.
५) भातात फायबर्ससारख्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका वाढतो. म्हणूनच डॉक्टर रोज सकाळी पांढरा भात खाण्याचा सल्ला जेतात. यात पोषक तत्व जास्त असतात जे हृदयाच्या आजारांवर फायदेशीर ठरतात.
रात्रीच्या जेवणात चपाती खावी की भात? वजन कमी करण्यासाठी काय उत्तम, तज्ज्ञ सांगतात...
६) भात जेव्हा शिळा होतो तेव्हा त्यात बॅक्टेरीयाजची वाढ होते. यामुळे पोटात इन्फेक्शन होऊ शकतं. यामुळे पचनासंबंधित समस्या जसं की पोटदुखी, डायरिया, उलट्या असे त्रास होऊ शकतात. शिळ्या भातात पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने तो कोरडा होतो. असा भात खाल्ल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.