काही लोक जेवताना पाण्याचा अख्खा तांब्या संपवतात. अशी लोकं जेवण करताना पाणी पित आहेत की पाणी पिता पिता जेवत आहेत, हेच समजत नाही. अशी सवय बहुसंख्य जणांना असते. कुणाकुणाला जेवणाचा पहिला घास घेताच गटागटा पाणी पिण्याची सवय असते. पण अशी कोणतीही सवय आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे जेवताना पाणी प्या, पण त्याचे प्रमाण मात्र अत्यंत नियंत्रित ठेवा, असा सल्ला आहारतज्ज्ञ देत आहेत.
जेवताना पाणी प्यायले तर..१. पचन व्यवस्थित होत नाहीआपण जेव्हा अन्न तोंडात घालतो, तेव्हापासूनच आपली पचनक्रिया सुरू होते. जर आपण जेवताना वारंवार अगदी प्रत्येक घासाला पाणी पित असलो, तर पोटात पाण्याचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढते आणि ते पचन क्रियेस अडथळा निर्माण करते. अतिपाण्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होऊ शकत नाही आणि पचनासंबंधी वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात.
२. स्थूलता वाढतेज्या व्यक्ती जेवताना खूप पाणी पितात, त्या व्यक्ती लवकरच स्थूल होतात. याचे सगळ्यात मुख्य कारण म्हणजे जेवताना जर खूप पाणी प्यायले, तर आपल्या चयापचय क्रियेत अडथळा निर्माण होतो. व्यवस्थित पचन होत नाही आणि त्यामुळे मग शरीरात मेद निर्माण होण्याचे प्रमाण वाढते. मेद म्हणजे अतिरिक्त चरबी. शरीरावर सगळीकडे अतिरिक्त चरबी साठते आणि शरीर स्थूल होते. त्यामुळे जेवताना कमीतकमी पाणी प्यावे.
३. रक्तातील साखर वाढतेजेवताना जास्त पाणी प्यायल्याने खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही. त्यामुळे अन्नाचा काही भाग ग्लूकोजमध्ये रूपांतरीत होतो. अशी क्रिया वारंवार होत राहिल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत जाते. असे झाले तर त्याचे परिणाम मधुमेह आणि इतर आजारांच्या स्वरूपात दिसू लागतात.
पाणी पिण्याची योग्य वेळआयुर्वेदानुसार असे सांगण्यात आले आहे की, जेवताना अजिबात पाणी पिऊ नये. जर ठसका लागला, उचकी लागली तरच पाणी प्यावे. किंवा एखाद्या क्षणी अगदीच असह्य झाले तर एक- दोन घोट पाणी घ्यावे. जेवण संपल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यावे. यामुळे खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होते आणि अन्न अंगी लागते.