Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > थंडीतलं इम्युनिटी बुस्टर, हिवाळ्यात दररोज खावा गुळ.. पण कधी, कसा आणि किती?

थंडीतलं इम्युनिटी बुस्टर, हिवाळ्यात दररोज खावा गुळ.. पण कधी, कसा आणि किती?

Benefits of eating jaggery in winter: हिवाळ्यात होणाऱ्या अनेक आजारांवर गुळ खूपच गुणकारी ठरतो. पण गुळ कसा, कधी आणि कशासोबत खावा, याचेही काही नियम आहेत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2021 07:28 PM2021-12-06T19:28:38+5:302021-12-06T19:29:25+5:30

Benefits of eating jaggery in winter: हिवाळ्यात होणाऱ्या अनेक आजारांवर गुळ खूपच गुणकारी ठरतो. पण गुळ कसा, कधी आणि कशासोबत खावा, याचेही काही नियम आहेत..

Jaggery is the natural immunity booster in winter, Benefits of eating jaggery in winter | थंडीतलं इम्युनिटी बुस्टर, हिवाळ्यात दररोज खावा गुळ.. पण कधी, कसा आणि किती?

थंडीतलं इम्युनिटी बुस्टर, हिवाळ्यात दररोज खावा गुळ.. पण कधी, कसा आणि किती?

Highlightsगुळाचे सेवन हा आपल्यासाठी थंडीतला सगळ्यात उत्तम इम्युनिटी बुस्टर डोस ठरतो. 

गुळ हा उष्ण असतो. त्यामुळे हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी (winter care) थंडीच्या चार महिन्यांमध्ये गुळाचे सेवन योग्य प्रमाणात केले पाहिजे. हिवाळा म्हणजे सर्दी, खोकला, शिंका, नाक गळणे या सगळ्या आजारांचे वाढते प्रमाण. या सगळ्या आजारांपासून दूर रहायचे असेल तर हिवाळ्यात आपण आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवली पाहिजे. गुळ त्यासाठीच तर हिवाळ्यात खायचा असतो. गुळाचे नियमित सेवन आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि अनेक संसर्गजन्य आजारांपासून आपले रक्षण करते. त्यामुळेच तर गुळाचे सेवन हा आपल्यासाठी थंडीतला सगळ्यात उत्तम इम्युनिटी बुस्टर (immunity booster) डोस ठरतो. 

 

हिवाळ्यात अशा पद्धतीने खावा गुळ
Proper way of eating jaggery in winter
१. गुळ आणि लसूण (jaggery and garlic)

खोकला खूप झाला असेल आणि सर्दी होऊन घशात कफ साचून राहिला असेल, जुनाट कफ मोकळा होत नसेल, तर गुळाचा एक मध्यम आकाराचा खडा आणि दोन ते तीन लसणाच्या कच्च्या पाकळ्या खलबत्त्यात घालून ठेचाव्या आणि त्याच्या गोळ्या करून खाव्या. खोकला आणि कफ लगेचच बरा होतो. 

 

२. गुळ आणि पाणी (jaggery and warm water)
हिवाळ्यात शरीर गारठवून टाकणारी थंडी असते. म्हणूनच हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी गुळ नियमित खावा. कोमट पाणी आणि गुळ हे मिश्रण एकत्र करून सकाळी किंवा रात्री झोपताना प्यावे. तसेच गुळाचा चहा देखील या दिवसात गुणकारी ठरतो. 

३. काळे मिरे आणि गुळ (Black Mire and jaggery)
जुनाट खोकला बरा होत नसेल तर गुळाचा मध्यम आकाराचा खडा आणि त्यात अर्धा टी स्पून काळ्या मिऱ्यांची पावडर असं मिश्रण एकत्र करावं आणि खावं. खोकला तर बरा होतोच पण घसा खवखवणेही थांबते.

४. गुळ आणि तीळ (jaggery and Sesame)
गुळ आणि तीळ हे दोन्हीही उष्ण पदार्थ आहेत. गुळ आणि तीळ एकत्र करून खाल्ल्यास सर्दी, खोकला, शिंका येणे, बारीक ताप अशा अनेक समस्या दूर होतात आणि हे मिश्रण शरीर उबदार ठेवण्यास मदत करते. 

 

५. गुळ आणि हळद (jaggery and termeric)
गुळ आणि हळद हे मिश्रण दुधात एकत्र करून प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हिवाळ्यात रोज रात्री असे दूध प्यायल्यास अनेक संसर्गजन्य आजारांपासून स्वत:चा बचाव करता येतो. हिवाळ्यात सांधेदुखीचे जुनाट दुखणे उफाळून येते. गुळ अशा पद्धतीने खाल्ल्यास हिवाळ्यातले हाडांचे दुखणेही कमी होते. 
 

Web Title: Jaggery is the natural immunity booster in winter, Benefits of eating jaggery in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.