Join us  

Jaggery Tea : चांगल्या आरोग्यासाठी गुळाचा चहा प्यायचा की टाळायचा? आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात.... 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 11:44 AM

Fitness benefits and side effects of drinking jaggery tea :

शुगर लेव्हल (Health Tips) वाढल्यानं होणारे गंभीर आजार टाळण्यासठी तज्ज्ञ गुळाचा चहा पिण्याचा सल्ला देतात. चहामध्ये साखरेऐवजी  गुळाचा वापर केल्यानं शरीराचे बरेच त्रास टळू शकतात. गुळाचा चहा प्यायल्यानं इम्यूनिटी वाढते. दिवसभरातून कधीही तुम्ही या चहाचे सेवन करू शकता. साखरेऐवजी गुळाचा वापर केल्यानं वजनही नियंत्रणा राहतं. गुळाचा चहा पिण्याचे फायदे,तोटे आणि हा चहा बनवण्याची योग्य पद्धत पाहूया. (Fitness benefits and side effects of drinking jaggery tea)

१) गुळामध्ये आयर्न मुबलक प्रमाणात आढळते, जे अॅनिमियाच्या समस्येवर मात करण्यास मदत करते. रोज गुळाचा चहा प्यायल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होतो. गुळाचा चहा प्यायल्याने शरीरातील कमजोरी दूर होण्यासही मदत होते.

२) गुळाचा चहा प्यायल्याने मायग्रेनच्या समस्येपासून आराम मिळतो. जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर गुळाचा चहा पिण्याचा प्रयत्न करा. डोकेदुखीपासून आराम मिळेल. गुळाचा चहा मायग्रेन बरा करतो आणि मूड फ्रेश करतो.

३) गुळाचा चहा पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतो. जर तुम्ही गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त असाल तर गुळाचा चहा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. गुळाचा चहा अन्न पचण्यास आणि छातीत जळजळ कमी करण्यास देखील मदत करतो.

४) गुळाचा चहा प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. साखरेचा चहा शरीरातील चरबी वाढवतो. अशा परिस्थितीत वजन कमी करण्यासाठी गुळाचा चहा हा एक चांगला पर्याय आहे. गुळाचा चहा नियमित प्यायल्याने पोटावरील चरबी नियंत्रित राहण्यास मदत होते.

गुळाचा चहा बनवण्याची योग्य पद्धत

गुळाचा चहा बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका  पातेलीत दीड कप पाणी उकळून घ्या.  पाणी व्यवस्थित उकळल्यानंतर त्यात वेलची, आलं, दालचीन आणि चहा पावडर  घाला. पाणी उकळल्यानंतर त्यात दूध घालून चहा बनवून घ्या. त्यात आपल्या चवीनुसार गुळ मिसळा आणि चाळणीनं गाळून चहाचं सेवन करा.  आधी गूळ घालून नंतर चहा उकळू नका अन्यथा चहा फुटू शकतो. 

हे सुद्धा लक्षात घ्या

१) गुळाच्या चहाचे अधिक प्रमाणात सेवन केल्यानं वजन वाढू शकतं. कारण गुळात कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. म्हणून एकदा किंवा दोनदा या चहाचे सेवन करा.

२) गुळाच्या चहाचे सेवन अधिक प्रमाणात केल्यानं शुगर लेव्हल वाढू शकते. 

३) जास्त चहा प्यायल्यानं पोटात उष्णता वाढल्याची तक्रार उद्भवते. 

४) आयुर्वेदानुसार खाद्यपदार्थांचं चुकीचं संयोजन तब्येत खराब होण्याचं कारण ठरू शकतं. दूध गरम आणि गूळ थंड असतो. जेव्हा तुम्ही थंड अन्नामध्ये गरम अन्न मिसळता तेव्हा ते विसंगत असल्याचे म्हटले जाते. गूळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये जीवनसत्त्वे, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारख्या पोषक तत्वांचा भरपूर प्रमाणात समावेश असतो, परंतु हे दुधासोबत मिसळणे आरोग्यासाठी हानिकारक ठरते.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.हेल्थ टिप्सआरोग्य