Join us  

जया किशोरींनी कसं केलं वेट लॉस ट्रांस्फॉर्मेशन; 'हा' पदार्थ खाणं सोडलं, पाहा साधं पौष्टिक डाएट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 11:07 AM

Jaya Kishori Weight Loss Transformation : एका चॅनेलवर त्यांनी आपल्या वेट लॉस जर्नीबद्दल माहिती दिली आहे.

आजकाल प्रत्येकजण वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतो वजन कमी केले नाही आरोग्याच्या वेगवेगळ्या तक्रारी उद्भवतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही लाईफस्टाईल बदलायला हवी. (Jaya Kishori Shares Weight Loss Diet) आपलं शरीर हे एक मंदिर आहे त्यामुळे शरीराची काळजी घेणं हे एखाद्या पूजेप्रमाणेच आहे.  मोटिव्हेशनल आणि स्पिरिच्युअल स्पिकर जया किशोरी या नेहमीच स्वत:ला हेल्दी आणि मेंटेन ठेवत असतात. पण या दरम्यान अनेक चुकासुद्धा होतात. ज्यामुळे वजन कमी करण्यास अडथळे येतात. (Jaya Kishori Weight Loss Transformation)

वजन कसे कमी करायचे (How To Loss Weight Easily)

आपली फिटनेस जर्नी आणि वेट लॉसबाबत जया किशोरी यांनी एका मुलाखतीत माहिती दिली आहे.  युट्यूबवर  गुंजन शाऊंट्स नावाच्या एका चॅनेलवर त्यांनी आपल्या वेट लॉस जर्नीबद्दल माहिती दिली आहे. यात त्यांनी वजन कमी करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे होणारं नुकसान कसे टाळता येईल ते सांगितले आहेत.

वजन कमी  करण्याची चुकीची पद्धत कोणती

जया किशोरी यांनी सांगितले की वेट लॉससाठी सगळ्यात महत्वपूर्ण आहे ती म्हणजे लाईफस्टाईल. वजन कमी करण्यासाठ क्रॅश डाएट करण्याचा त्यांना पश्चाताप होतो. त्यांना त्यावेळी जाणवलं की वेट लॉस हा संपूर्ण आयुष्याचा प्रवास आहे. फॅन्सी किंवा क्रॅश डाएट केल्याने जास्त नुकसान होऊ शकते. 

क्रॅश डाएटमध्ये जया किशोरी यांना अनेक वस्तू खाणं बंद करावं लागलं. ज्यामुळे त्यांचे वजन तर कमी झाले पण यामुळे त्यांचे मेंदूचे फंक्शन कमी झाले. त्यांना वाटलं की काही पदार्थ इमोशन्स आणि एनर्जी फूड्स असतात. ज्याचे योग्य प्रमाणात सेवन करणं फायदेशीर ठरतं. 

पोट लटकतंय, मांड्यांचा आकार वाढला? किचनमधले २ पदार्थ पाण्यात घालून घ्या-भराभर कमी होईल वजन

जया किशोरी यांचे एक्सरसाईज रूटीन

जया किशोरी यांनी सांगितले की ज्यादरम्यान व्यायाम करू शकत नाही त्यादरम्यान  डाएटवर  नियंत्रण ठेवतात. व्यायामात थोडी योगासनं, जिम व्यायाम आणि कार्डिओ यांचा समावेश आहे. काही वेळासाठी त्यांनी पूर्ण वर्कआऊट रुटीन फॉलो केलं. 

जया किशोरी यांना बेसन आणि भात खायला फार आवडते. बेसन तुम्हाला प्रोटीन्स, कार्ब्स, फायबर्स, आयर्न, फॉलेट, फॉस्फरस देतो. तांदळातून कार्ब्स, फायबर्स, मॅन्गनीज, सेलेनियम, व्हिटामीन बी मिळते. 

व्हिटामिन बी -१२ ची कमतरता तुमचं शरीर पोखरते, ४ पदार्थ खा- बी १२ कमी असल्याने होणारे गंभीर आजार टळतील

आधीच्या तुलनेत त्यांनी आता साखरेचे सेवन कमी केले होते. जय दिवसभरातून एकदाच चहा पितात. साखर कमी केली आहे. याव्यतिरिक्त रिफाईंड शुगर घेत नाहीत. हेल्दी राहण्यासाठी क्रेव्हिंग कंट्रोल करणं महत्वाचे आहे. 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स