Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > भात कमी खाता तरी पोट सुटलंय? अनिरूद्धाचार्य सांगतात 'ही' डाळ खा, वजन भराभर होईल कमी

भात कमी खाता तरी पोट सुटलंय? अनिरूद्धाचार्य सांगतात 'ही' डाळ खा, वजन भराभर होईल कमी

Easy Way To How To Lose Weight Foods : वजन वाढण्याचं मुख्य कारण आहे खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 15:19 IST2024-11-30T13:32:08+5:302024-11-30T15:19:23+5:30

Easy Way To How To Lose Weight Foods : वजन वाढण्याचं मुख्य कारण आहे खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती.

Katha Vachak Aniruddhacharya Told Easy Way To How To Lose Weight Foods | भात कमी खाता तरी पोट सुटलंय? अनिरूद्धाचार्य सांगतात 'ही' डाळ खा, वजन भराभर होईल कमी

भात कमी खाता तरी पोट सुटलंय? अनिरूद्धाचार्य सांगतात 'ही' डाळ खा, वजन भराभर होईल कमी

लठ्ठपणा (Weight Loss Tips) ही  एक गंभीर समस्या असून लोकांमध्ये वजन वाढण्याचं प्रमाण वेगानं वाढत  आहे. यामुळे तब्येतीचं नुकसानही होऊ शकतं. लठ्ठपणा, डायबिटीस, कॅन्सर यांसारखे जीवघेणे आजारही उद्भवू शकतात. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहाराची काळजी घेणं फार महत्वाचे आहे. वजन वाढल्यामुळे गंभीर समस्याही निर्माण होऊ शकतात. कथावाचक अनिरूद्धाचार्य सांगतात की वजन वाढण्याचं मुख्य कारण आहे खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती. त्यांनी सांगितलं की वजन वाढण्याचं मुख्य कारण जास्त चपात्या खाणं हे आहे. लोक एकावेळी दहा-दहा चपात्या खातात. (Katha Vachak Aniruddhacharya Told Easy Way To How To Lose Weight Foods)

त्यांनी सांगितलं की डाळी आणि भाज्यांचे अधिकाधिक सेवन करायला हवे. खासकरून महिला डाळ, भाज्यांसोबत ५ ते ६ चपात्या खातात ज्यामुळे वजन वाढतं (Ref). जर तुम्हाला वजन वाढ रोखायची असेल तर तुम्ही सहा चपात्या खाण्याऐवजी डाळीचं पाणी प्या आणि फक्त १ किंवा दोन चपात्या खा.

डाळ प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे

अनिरूद्धाचार्यांनी सांगितले की डाळ वजन कमी करण्यासाठी एक चांगला स्त्रोत आहे. पोट भरण्यासाठी चपाती, भात खाण्यापेक्षा डाळ खाण्यावर जास्त भर द्यायला हवा. डाळ प्रोटीनचा एक चांगला स्त्रोत आहे. प्रोटीन  वजन कमी करण्यासाठी आणि मांसपेशींच्या विकासासाठी आवश्यक पोषक तत्वांपैकी एक आहे.

पांढरे केस कमीच होत नाही? डॉक्टर सांगतात हा घरगुती डाय केसांना लावा, ६ महिने काळे राहतील केस

भरपूर भात खाणं बंद करा

अनिरूद्धाचार्य सांगतात की लठ्ठपणा भात खाल्ल्यानं उद्भवू शकतो. अनेकजण भरभरून भात खातात. जास्त भात खाल्ल्यानं लठ्ठपणा वाढू शकतो. भात कमी खाऊन थोडी डाळ आणि भाज्यांचे आहारात  प्रमाण वाढवा.

मुलांना मूग डाळ खाऊ घाला

वजन नियंत्रणात  ठेवण्यासाठी आणि शरीर ताकदवान बनवण्यासाठी मुलांना २ वाटी डाळ प्यायला द्या. डाळींची शरीराची ताकद वाढते. भात आणि चपातीमुळे लठ्ठपणा येतो. डाळ आणि भाज्यांचे जास्त सेवन केल्यानं एनर्जी मिळते. 

चहा गाळण्याच्या गाळणीमुळे होऊ शकतो कॅन्सर; चहा करताना १ चूक करणं टाळा, सुरक्षित राहाल

डाळीचं पाणी फायदेशीर

अनिरूद्धचार्य सांगतात की डाळीसोबतच डाळीचं पाणी तब्येतीसाठी चांगले ठरते. डॉक्टर डाळीचं पाणी पिण्याचा सल्ला देतात. यामुळे लठ्ठपणाची समस्या उद्भवत नाही.

Web Title: Katha Vachak Aniruddhacharya Told Easy Way To How To Lose Weight Foods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.