Join us  

कतरिना कैफही डाएटमध्ये आवडीने खाते लाल रंगाचे हे सूपरफूड, स्वस्तात मस्त-वजनही घटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2024 4:34 PM

Katrina Kaif Breakfast | Sweet Potato Benefits; helps for weight loss : पारंपरिक कंदमुळं आहारात हवीतच, त्यालाच नवीन काळात म्हणतात सुपरफूड

उपवास असल्यावर आपण रताळे खाल्लेच असतील (Sweet Potato). हे चवीला रुचकर, शिवाय आपण उकडूनही खाऊ शकता. गोडसर चव आणि मलईदार गर असं रताळं नारंगी, तपकिरी आणि जांभळ्या रंगाचं असतं (Health benefits). उकडलेले रताळे खाल्ल्याने शरीराला पोटॅशियम, फायबर, खनिजे आणि विविध प्रकारचे जीवनसत्त्वे मिळतात (Weight loss).

रताळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील कमी असतो. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. यामुळे मधुमेहाचा धोका टळतो. शिवाय यातील फायबर वेट लॉससाठी मदत करते. रताळे खाण्याचे फायदे किती? पाहूयात(Katrina Kaif Breakfast | Sweet Potato Benefits; helps for weight loss).

पोषक तत्वांचे भंडार

रताळ्यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीन जास्त प्रमाणात असते. हे पोषण रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात. शिवाय डोळ्यांसाठीही फायदेशीर ठरते.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत

रताळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आढळते. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. यासह मेंदूच्या आरोग्यासाठी देखील फादेशीर आहे. यातील पोटॅशियम शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे योग्य प्रमाण राखण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंच्या जेवणात सोयाबीन असल्याची चर्चा, पाहा भरपूर प्रोटीनसाठी सोयाबीन खाण्याचे फायदे

फायबरचे उत्तम स्त्रोत

वजन कमी ते पोटाचे विकार दूर करण्यासाठी रताळे मदत करते. रताळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि  बद्धकोष्ठतेचा त्रास आपल्याला होत नाही. यासह रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

ग्लायसेमिक इंडेक्स कमी

रताळ्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, याचा अर्थ रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढत नाही. मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी रताळे फायदेशीर ठरते.

वाढीच्या वयात मुलं फिट व्हावी असं वाटत असेल तर खाऊ घाला ५ पदार्थ, आजीपणजीच्या काळातला सोपा उपाय

अँटिऑक्सिडंट्स

रताळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स अधिक प्रमाणात असतात. जे शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सकतरिना कैफ