Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन कमी करायचं असेल तरी बिनधास्त खा पांढरा भात; तज्ज्ञ सांगतात भात खाण्याचे ३ नियम, भाताची भीती नको

वजन कमी करायचं असेल तरी बिनधास्त खा पांढरा भात; तज्ज्ञ सांगतात भात खाण्याचे ३ नियम, भाताची भीती नको

Know How White Rice Work For Weight Loss : थोडा तरी भात खाल्ल्याशिवाय अनेकांना जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2023 03:00 PM2023-08-11T15:00:37+5:302023-08-11T18:11:43+5:30

Know How White Rice Work For Weight Loss : थोडा तरी भात खाल्ल्याशिवाय अनेकांना जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही.

Know How White Rice Work For Weight Loss : If you want to lose weight, eat white rice freely; Experts say 3 rules for eating rice... | वजन कमी करायचं असेल तरी बिनधास्त खा पांढरा भात; तज्ज्ञ सांगतात भात खाण्याचे ३ नियम, भाताची भीती नको

वजन कमी करायचं असेल तरी बिनधास्त खा पांढरा भात; तज्ज्ञ सांगतात भात खाण्याचे ३ नियम, भाताची भीती नको

वजन कमी करायचं म्हटलं की आपण सगळ्यात आधी आहारातून भात, गोड पदार्थ, जंक फूड, स्निग्ध पदार्थ हे सगळे कमी करतो. वजन कमी करण्यासाठी हे सगळं गरजेचं असतं असं आपल्याला वारंवार सांगितलं जातं. बाकी सगळं ठिक आहे पण भात न खाणे ही अनेकांसाठी मोठी शिक्षा ठरु शकते. कारण भात हा अनेकांच्या अतिशय आवडीची गोष्ट असते. जेवणाच्या सुरुवातीला किंवा शेवटी थोडा तरी भात खाल्ल्याशिवाय अनेकांना जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. दुपारच्या जेवणात एकवेळ भात नसेल तर ठिक आहे पण रात्रीच्या जेवणात तरी आपल्याला गरमागरम भात लागतोच लागतो (Know How White Rice Work For Weight Loss). 


गहू-ज्वारी-बाजरी बंद करुन ओट्सची पोळी खाल्ली तर खरंच वजन कमी होतं?

मग या भातावर तूपाची धार, वरण आणि लिंबू सोबत लोणचं किंवा सॅलेड नाहीतर पापड असं असलं की आपल्याला बाकी जेवणात काहीही नसेल तरी चालते. पण या भातावरच बंधन आलं तर, आपला मूडच ऑफ होतो. मात्र वजन कमी करण्यासाठी तुम्ही बिनधास्त भात खाऊ शकता असं आहारतज्ज्ञ रिचा गंगाणी यांचे म्हणणे आहे. पण हा भात खाताना कोणत्या ३ गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायचे याविषयी त्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतात, त्या कोणत्या ते पाहूया...

(Image : Google)
(Image : Google)

पांढरा तांदूळ एक ग्लूटेन-मुक्त धान्य आहे, ज्यामध्ये फॅटस कमी असते आणि ते पचण्यास सोपे असते. हे चयापचयाचा दर वाढविण्यासाठी उत्कृष्ट धान्य आहे, ज्यामुळे वजन कमी करण्याची प्रक्रिया गतिमान होते. 

१. प्रमाण नियंत्रणात ठेवण्याची सवय करा

जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे, आपण किती खातो याकडे लक्ष द्या. इतर कोणत्याही प्रकारचे कार्बोहायड्रेटस किंवा फॅटस भातासोबत जोडू नका. 

२. सोबत भरपूर भाज्या खा

इतर कार्बोदकांच्या तुलनेत भाताने आपल्याला लगेच भूक लागू शकते. त्यामुळे भात भरपूर फायबर आणि प्रथिने असलेल्या विविध प्रकारच्या भाज्यांसोबत खायला हवा. त्यामुळे तुम्हाला लगेच भूक लागणार नाही. 

३. भात शिजवण्याची पद्धत बदला

तांदूळ शिजवण्यापूर्वी काही तास भिजवून ठेवा. त्यानंतर तो चांगला उकळा आणि त्याच्या वर आलेले पाणी टाकून द्या. तांदूळ तळणे टाळा किंवा तेल, तूप यांसारखे जास्त फॅटस असलेल्या गोष्टी त्यावर जास्त प्रमाणात घालणे टाळा. त्यामुळे विनाकारण कॅलरीज वाढू शकतात. 

Web Title: Know How White Rice Work For Weight Loss : If you want to lose weight, eat white rice freely; Experts say 3 rules for eating rice...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.