Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > थंडीत चालण्याची योग्य पद्धत कोणती? 'या' पद्धतीनं चाला, मेंटेन फिट राहाल, वजनही होईल कमी

थंडीत चालण्याची योग्य पद्धत कोणती? 'या' पद्धतीनं चाला, मेंटेन फिट राहाल, वजनही होईल कमी

Morning Walk Time In Winter : ऊन्हाळ्याच्या दिवसांत सकाळी वॉक केल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 18:12 IST2024-12-27T17:39:24+5:302024-12-27T18:12:06+5:30

Morning Walk Time In Winter : ऊन्हाळ्याच्या दिवसांत सकाळी वॉक केल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात.

Know Perfect Morning Walk Time In Winter How Much Walk Is Good For Health | थंडीत चालण्याची योग्य पद्धत कोणती? 'या' पद्धतीनं चाला, मेंटेन फिट राहाल, वजनही होईल कमी

थंडीत चालण्याची योग्य पद्धत कोणती? 'या' पद्धतीनं चाला, मेंटेन फिट राहाल, वजनही होईल कमी

निरोगी राहण्यासाठी वॉक (Walking) करणं फार महत्वाचं असतं. हेल्थ एक्सपर्ट्स (Health Tips) दिवसातून कमीत कमी अर्धा तास चालण्याचा सल्ला देतात. वॉक केल्यानं फक्त शरीर निरोगी राहत नाही तर लठ्ठपणाही उद्भवत नाही आणि मेंदू फ्रेश राहतो. ऊन्हाळ्याच्या दिवसांत सकाळी वॉक केल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात. (Morning Walk Time In Winter)

हिवाळ्याच्या दिवसांत सकाळी चालायला अनेकांना आवडत नाही. अशा स्थितीत डॉक्टर सकाळी लवकर वॉक करण्याचा सल्ला देतात. डॉक्टर सांगतात की हिवाळ्याच्या दिवसांत वॉक केल्यानं तब्येत चांगली राहते आणि तब्येतीला फायदे मिळतात. (Know Perfect Morning Walk Time In Winter How Much Walk Is Good For Health)

वॉक करण्यासाठी योग्य वेळ कोणती?

चालणं तब्येतीसाठी चागलं असतं. डॉक्टर सांगतात की थंडीच्या वातावरणात चालल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात.जे लोक थंडीच्या दिवसांत  ४ ते ५ दिवसांत वॉक करतात त्यांच्या आरोग्याला धोका असतो. थंडीच्या दिवसांत वॉक केल्यानं शरीरातील ब्लड फ्लो संथ होतो. याशिवाय प्रदूषण जास्त असल्यामुळे हृदयाच्या आरोग्याला धोका उद्भवू शकतो. बीपी वाढल्यास हृदयाच्या आजारांचा धोका उद्भवतो. अशा स्थितीत थंडीच्या दिवसांतच चार किंवा पाच वाजता उठून वॉक करू नये. 

केस पिकलेत-डाय कमी वयात लावण्याची भिती वाटते? १ उपाय, काळेभोर-दाट होतील केस

ऊन्हाळ्यात चार पाच वाजता वॉक करणं उत्तम ठरतं. हिवाळ्याच्या दिवसांत वॉक करण्याची योग्य वेळ  लक्षात घ्यायला हवी. हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की वॉक केल्यानं शरीराला आवश्यक व्हिटामीन डी मिळते. या वेळी ऊन निघाल्यास हाय बी.पी चा धोका नसतो. प्रदूषणाचा स्तर कमी होतो.

सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान वॉक करणं फायदेशीर ठरतं. वॉक केल्यानं शरीराला व्हिटामीन डी मिळते. या वेळी ऊन निघाल्यास हाय बीपीचा धोका नसतो. प्रदूषणाचा स्तरही कमी असतो. म्हणून याच वेळी वॉक करायला हवं.

किती वेळ वॉक केल्यानं शरीर फिट राहतं

हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की कमीत कमी अर्धा  तास वॉक करायला हवं. निरोगी राहण्यासाठी जवळपास ४५ मिनिटं वॉक करायला हवं. एका व्यक्तीनं निरोगी राहण्यासाठी कमीत कमी १० हजार पाऊलं चालायला हवं. यामुळे कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. एक्स्ट्रा फॅट वाढत नाही.

सकाळी पोट साफच  होत नाही? रात्री झोपण्याआधी १ काम करा, सकाळी सुटलेलं पोट जाईल आत

डॉक्टर सांगतात की वॉक करण्याआधी थोडावेळा वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग करा.  ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळेल. जर तुम्ही हिवाळ्यात वॉक करत असाल तर काहीवेळ ऊन्हात फिरा. यामुळे शरीरात उष्णता तयार होईल.
 

Web Title: Know Perfect Morning Walk Time In Winter How Much Walk Is Good For Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.