Join us  

कोण म्हणतं वजन कमीच होत नाही? ४ साधे-सोपे उपाय-वजन कमी होणारच....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2023 7:02 PM

Trying To Lose Weight? Nutritionist Rujuta Diwekar Shares 4 Tips To Lose Weight : ऋजुता दिवेकर सांगतात वजन कमी करण्याचे ४ नियम, तेवढं केलं तरी वजन येईल आटोक्यात

"वजन दिवसेंदिवस वाढत जातंय... कमी होतच नाही." "डाएट, जिम सगळं केलं तरीही वजन कमी होत नाही..." असे अनेक संवाद आजकाल आपल्या कानांवर सर्रास पडतात. मुळातच आपल्या सगळ्यांना आपलं वजन मापात असावं, आपण परफेक्ट दिसावं, वयोमानाप्रमाणे फिट राहावं अशी इच्छा असते. परंतु हे सगळं करण्यासाठी आपल्याकडे व्यायामासाठी पुरेसा वेळ नसतो, योग्य आहार घेण्याचं काहीच वेळापत्रक नसत. अशा परिस्थितीत कितीही प्रयत्न केले तरीही वजन कमी होणारच नाही. मुळातच वजन कमी करणे हे अनेकांना खूप मोठं कष्टाचं काम वाटत. 

वजन कमी करणे म्हणजे स्वतःला एका प्रकारच्या बंधनात बांधून घेणे... असा काही लोकांचा समज असतो. वजन कमी होत नाही, वजन कमी करणे, यांसारख्या प्रश्नांकडे काही लोक खूप मोठं संकट किंवा त्रास आहे या दृष्टिकोनातून बघतात. वजन कमी करण्याच्या प्रश्नाकडे आपण एक मोठी गंभीर समस्या म्हणून पाहिले तर आपण नकारात्मक विचार करतो. वजन कमी करायचं म्हणजे खाण्या - पिण्यावर बंदी येणार, रोज व्यायाम करावा लागणार, लग्न - पार्टी समारंभ यात मोजूनच खावे लागणार, वजन कमी करणे म्हणजे कष्ट, वजन कमी करताना आपल्याला बरंच काही गमवावं लागतं, ही भावनाच मुळात चुकीची आहे. वजन कमी करणे म्हणजे चमचमीत, मसालेदार खायचे सोडून मोजकेच पदार्थ खाणे , रोज सकाळी उठून व्यायाम करणे, आपल्या आवडत्या सगळ्या गोष्टी सोडून देणे, गोड न खाणे  यांसारख्या चुकीच्या समजुती आपण स्वतःच करून घेतो. यावर लोकप्रिय न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी वजन कमी करण्यासाठी ४ सोपे नियम सांगितले आहेत(Trying To Lose Weight? Nutritionist Rujuta Diwekar Shares 4 Tips To Lose Weight).  

वजन कमी करण्याचे ४ सोपे नियम कोणते ? 

१. जेवणाचे प्रमाण योग्य ठेवणे :- वजन कमी करणे हे काही रॉकेट सायन्स नाही. तर ही एक सवय आहे. दिनक्रमातील चांगल्या गोष्टींपैकी ही एक गोष्ट अंगवळणी पाडून घ्या. दररोज योग्य प्रमाणात जेवणे हा एक नित्य नियमाचा भाग करून घ्या. योग्य प्रमाणात घरचं जेवणे हे तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाला नक्कीच मदत करेल. जेवताना पोटाचे अदृश्य चार भाग करा. एका भागात अन्न, एका भागात पाणी आणि उरलेल्या दोन भागात हवा. आहाराला इतकंच महत्व द्या पोटभरून जेऊ नका.

 २. जेवणाच्या वेळा काटेकोरपणे पाळणे :- अनेकदा कामाच्या गडबडीत आपण कधीही जेवतो. बराच काळ उपाशी राहतो. यामुळे जेव्हा भूक लागते तेव्हा जंक फूड किंवा हातात जे मिळेल ते खातो. असं न करता योग्य वेळेत जेवण्याची सवय लावून घ्या. नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळा निश्चित करा. शक्य असल्यास रात्री ७ नंतर काही खाऊ नका. कारण वेळेत जेवणे हे वजन कमी करण्याचे एक गुपित आहे. 

जास्वंद-मोगरा घालून केलेलं तेल लावा, विसरा केसाच्या समस्या! ऋजुता दिवेकरच्या आईने शेअर केला खास उपाय...

३. जेवण्याची योग्य पद्धत पाळा :- जेवण योग्य प्रमाणात तसं योग्य पद्धतीत असणे देखील तितकेच महत्वाचे आहे. जंक फूड पूर्ण टाळून फक्त घरचं जेवण घ्या. अति तेल आणि मांसाहार टाळा. जेवण तयार करताना प्रोटीन, फायबर या सगळ्याचा विचार करा. त्यामुळे बाहेरचं जेवण टाळून घरचा आहार घ्या.

वजन कमी करण्याचा ५० - ३५ - १५ फॉर्म्युला, ऋजुता दिवेकर सांगतात लठ्ठपणा कमी करण्याची खास ट्रिक...

उन्हाळ्यात प्या कुळथाचे कळण, अस्सल कोकणी पदार्थ, ऋजुता दिवेकर सांगते ऊन बाधणार नाही...

४. स्वतःवर आणि स्वतःच्या शरीरावर प्रेम करा :- स्वतःच शरीर हे जगातील सुंदर गोष्ट आहे. त्याकडे सकारात्मक पद्धतीने पाहा. वजन कमी करायला लागणे यापेक्षा आपल्याला आपल्या शरीराची काळजी घ्यायची आहे, असा विचार केल्यास तुमचा दृष्टीकोन बदलेल आणि वजन कमी करणे हा खडतर प्रवास वाटणार नाही. या वरील चार गोष्टी केल्यामुळे तुमच्या शरीराचा हेल्थ पॅरामिटर आपोआप सुधारणार आहे. यामुळे तुमचं वजन सहज कमी होणार आहे.

टॅग्स :वेट लॉस टिप्स