आजकाल वजन कमी करण्याबद्दल सर्वत्र चर्चा आहे. लठ्ठपणा एका साथीच्या आजारासारखा वाढत आहे आणि आरोग्य तज्ज्ञ या वाढत्या समस्येबद्दल चिंतेत आहेत. लठ्ठपणाची समस्या विशेषतः तरुण आणि किशोरवयीन मुलांमध्ये दिसून येत आहे. वजन कमी करण्यासाठी लोक व्यायामापासून ते आहारापर्यंत अनेक पद्धती अवलंबतात, परंतु अलिकडेच एका नवीन रिसर्चमध्ये एक अशी गोष्ट समोर आली आहे, जी तुमच्या आहारातून काढून टाकल्यास तुम्ही ४ किलो वजन कमी करू शकता.
ओबेसिटी सायन्स अँड प्रॅक्टिस जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्चमधून असं दिसून आलं आहे की, अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड हे वजन वाढण्याचं सर्वात मोठं कारण आहे. हा रिसर्च अमेरिकेच्या डाएटवर आधारित आहे, परंतु जगभरातील लठ्ठपणाची वाढती समस्या लक्षात घेता याबद्दल माहिती देण्यात आली आहे. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या आहारातून अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड काढून टाकलं तर तो सहजपणे ४ किलो वजन कमी करू शकतो.
अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड म्हणजे काय?
संशोधकांच्या मते, अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड म्हणजे असे पदार्थ जे नैसर्गिकरित्या मिळणाऱ्या अन्नांपेक्षा खूप वेगळे असतात. त्यामध्ये पौष्टिकतेचे प्रमाण कमी असते आणि त्यात केमिकल्स, चव वाढवणारे घटक, प्रिजर्व्हेटिव्स आणि इतर कृत्रिम घटक असतात. हे पदार्थ इतक्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून जातात की ते घरी तयार करणं शक्य नसतं.
अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडची उदाहरण
- पॅक केलेले ब्रेड आणि बेकरी प्रोडक्ट
- फ्रोजन मील्स (रेडी-टू-ईट फूड)
- कँडी, चॉकलेट आणि मिठाई
- सॉफ्ट ड्रिंक्स आणि सोडा
- केक, कुकीज आणि स्नॅक्स
वजन कमी करण्यासाठी काय करावं?
जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुमच्या आहारातून अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड काढून टाकण्याचा किंवा ते कमी करण्याचा प्रयत्न करा. त्याऐवजी, ताजी फळं आणि भाज्या, घरी शिजवलेलं अन्न आणि प्रोटीनयुक्त पदार्थ खा. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की जर एखाद्या व्यक्तीने असं केलं तर वजन कमी होतं आणि त्याचं आरोग्य देखील चांगलं राहतं.