Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन कमी करा, मस्त खाऊन-पिऊन! दही खा, ताक प्या, बदामही खा आणि..

वजन कमी करा, मस्त खाऊन-पिऊन! दही खा, ताक प्या, बदामही खा आणि..

वजन कमी करण्यासाठी तोंडाला कुलूप लावून बसण्याची, अवघड किचकट डाएटिंगच्या मागे धावण्याची गरज नाही. वजन काही न खाल्ल्यानं नाहीतर दही, ताक, भोपळा, लिंबू, बदाम या पाच पदार्थांचं मुद्दाम सेवन केल्यास सहज कमी होतं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 03:59 PM2021-06-11T15:59:01+5:302021-06-11T16:26:19+5:30

वजन कमी करण्यासाठी तोंडाला कुलूप लावून बसण्याची, अवघड किचकट डाएटिंगच्या मागे धावण्याची गरज नाही. वजन काही न खाल्ल्यानं नाहीतर दही, ताक, भोपळा, लिंबू, बदाम या पाच पदार्थांचं मुद्दाम सेवन केल्यास सहज कमी होतं.

Lose weight, eat and drink well! Eat yogurt, drink buttermilk, eat almonds and .. | वजन कमी करा, मस्त खाऊन-पिऊन! दही खा, ताक प्या, बदामही खा आणि..

वजन कमी करा, मस्त खाऊन-पिऊन! दही खा, ताक प्या, बदामही खा आणि..

Highlightsदही खाल्ल्यानंतर बराच वेळ पोट भरल्यासारखं राहातं त्यामुळे जास्त खाण्याची सवय कमी होते.  शरीरयष्टी सुडौल ठेवण्यास ताक मदत करतं.वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करणारी भोपळ्यासारखी दुसरी भाजी नाही.

वजन कमी करण्यासाठी कठोर डाएटिंगचे पर्याय निवडण्याचा मार्ग अनेकजणी स्वीकारतात. पण डाएटिंगची पथ्यं नियमित पाळणं शक्य नसल्यानं डाएटिंग मधेच सोडलं जातं. वजन कमी करण्याचं लक्ष्य काही पूर्ण होत नाही. घाम गाळून व्यायाम करण्यातही अनेक अडचणी मग वजन कमी होणार कसं? कोणत्या डाएटिंगचा पर्याय लागू पडणार? त्याचं उत्तर सोपं आहे. वजन कमी करण्यासाठी तोंडाला कुलूप लावून बसण्याची, अवघड किचकट डाएटिंगच्या मागे धावण्याची गरज नाही. वजन काही न खाल्ल्यानं नाहीतर काही विशिष्ट गोष्टींचं मुद्दाम सेवन केल्यास सहज कमी होतं. वजन कमी करण्यास मदत करणारे ते विशिष्ट पदार्थ कोणते?

दही
उष्ण दिवसात दही खाणं हे आरोग्यास लाभदायी असतं. दही शरीराचं पोषण करतं, दही खाल्ल्यानं शरीरात उष्णता वाढत नाही आणि दह्याच्या सेवनानं वजनही घटतं. दही खाल्ल्यानंतर बराच वेळ पोट भरल्यासारखं राहातं त्यामुळे जास्त खाण्याची सवय् कमी होते. दह्यात कॅल्शिअम, ब२ , ब १२ ही जीवनसत्तं, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम यासारखे पौष्टिक घटक असतात. दही खाल्ल्यानं पोट जड जड वाटत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तज्ज्ञ रोजच्या आहारात दह्याचा समावेश करण्यास सांगतात.

ताक
शरीरयष्टी सुडौल ठेवण्यास ताक मदत करतं. जिरे, हिंग, मिरे या मसाल्यांच्या पदार्थांचा वापर करुन ताक पिणं फायदेशीर मानलं जातं. किंवा जेवताना एक वाटी ताक घेणं ही देखील चांगली सवय मानली जाते. ताक पोटातील उपयूक्त जीवाणू वाढवण्यास मदत करतं . तसेच ताकातील कर्बोदकं आणि लॅक्टोज यामुळे शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढते.

भोपळा
भोपळ्याला अनेकजण नाक मूरडतात. पण वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करणारी भोपळ्यासारखी दूसरी भाजी नाही. ही वेलवर्गीय भाजी पचनास अतिशय हलकी असते. भोपळ्यात विविध प्रकारची प्रथिनं, जीवनसत्त्वं आणि क्षारही असतात. भोपळ्यात अ, क जीवनसत्त्वं, कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि झिंक ही पोषणमूल्यं असतात.

लिंबू
लिंबू पाणी कोणत्याही ॠतूत उपकारक असतं. यामूळे शरीरास ऊर्जा मिळते शिवाय शरीरास आरोग्यास फायदेशीर आणि आवश्यक ओलसरपणा निर्माण होतो. ही बाब वजन कमी करण्यास उपयुक्त मानली जाते. लिंबात थियामिन, नियासिन, रिबोफ्लोविन, ब ६ हे जीवनसत्त्वं असतात. हे घटक शरीराचं पोषण करण्यासाठी आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

बदाम
बदामात पाच ग्रॅम प्रथिनं असतात. हे प्रथिनं रात्रभर स्नायूंची झालेली झीज भरुन काढतात. बदामामधील तंतूमय घटक भुकेवर नियंत्रण ठेवतं. शरीरावरची चरबी कमी करणारं सूपरफूड म्हणून बदामाला ओळखलं जातं. शरीरातील अतिरिक्त चरबी घटवण्याचं काम बदाम करतं. बदामात इ जीवनसत्त्वं, तंतूमय घटक, ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड, ओमेगा ६ फॅटी अ‍ॅसिड आणि प्रथिअनं असतात. बदाम भिजवून किंवा तसेच खाल्ल्यास शरीरास बदामाचे फायदे मिळतातच.

Read in English

Web Title: Lose weight, eat and drink well! Eat yogurt, drink buttermilk, eat almonds and ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न