Weight Loss Diet : वजन वाढलेले लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधत असतात. कुणी चालायला किंवा धावायला जातात तर कुणी जिममध्ये जातात. काही असेही लोक असतात जे आहारात काही खास गोष्टींचा समावेश करून लठ्ठपणा कमी करण्यावर भर देतात. अशाच लोकांसाठी आम्ही एका खास भाजीची माहिती देणार आहोत. ही खास भाजी कमळाची काकडी म्हणजे कमळाचं मूळ. कमळाची काकडी, मूळ यांचा वापर भाजी आणि स्नॅक्स म्हणूनही केला जातो. खासकरून हिवाळ्यात कमळाच्या काकडीचा लोक आनंद घेतात. याचे आरोग्याला काय काय फायदे मिळतात हे आम्ही सांगणार आहोत.
लठ्ठपणा होतो कमी
कमळाच्या काकडीचा डाएटमध्ये समावेश करणारे लोक लठ्ठपणाचे शिकार होत नाहीत. याचं कारण आहे यातील फायबर आणि मेटाबॉलिज्म बूस्ट करण्याची क्षमता. ज्या लोकांचं मेटाबॉलिज्म फास्ट असतं, त्यांच्यात फॅट वाढण्याचा धोका फारच कमी असतो. त्यामुळे तुम्ही काहीतरी नवीन म्हणून आणि वजन कमी करण्यासाठी या भाजीचा आहारात समावेश करू शकता.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की, कमळाच्या काकडीमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्सचं भरपूर प्रमाण असतं. त्यामुळे याचा आहारात समावेश करावा. याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. याने वातावरणातील बदलांमुळे होणाऱ्या आजारांपासून आणि डायबिटीसपासून बचाव होतो.
डायजेशन चांगलं होतं
कमळाच्या काकडीमध्ये फायबर देखील भरपूर प्रमाणात असतं. हे फायबर आपली डायजेशन सिस्टीम साफ ठेवण्यास आणि त्याची क्रिया अधिक चांगली करण्यास फायदेशीर ठरतं. जेव्हा डायजेशन सिस्टीम साफ होते तेव्हा मेटाबॉलिज्म आपोआप मजबूत होतं. याने आपल्याला एनर्जेटिक वाटतं.
व्हिटामिन्सचा खजिना
कमळाच्या काकडीमध्ये व्हिटामिन बी आणि व्हिटामिन सी सुद्धा भरपूर असतं. यात पोटॅशिअम आणि आयर्नही भरपूर प्रमाणात असतं. याने आपली त्वचा आणि हाडे हेल्दी राहण्यास मदत मिळते. पोटॅशिअम आपल्या शरीरात सोडिअमचं प्रमाण रेग्युलेट करून ब्लड प्रेशरला मॅनेज करण्याचं काम करतं. याने शरीरातील रक्तप्रवाह योग्य राहतो. तसेच तुम्हाला हाय बीपीची समस्याही होत नाही.
तणाव होतो कमी
कमळाची काकडी खाल्ल्याने आपला स्ट्रेस कमी करण्यास मदत मिळते. एक्सपर्ट सांगतात की, कमळाच्या मूळांमध्ये व्हिटामिन बी कॉम्प्लेक्स असतं जे एक पॅरीडॉक्सीन कंपाऊंड असतं आणि यानं मेंदू न्यूरल रिसेप्टर्ससोबत संपर्क करतं. यानं न्यूरल रिसेप्टर्स कमी होतात. ज्या लोकांना सतत डोकेदुखीची समस्या राहते किंवा जे नेहमी चिडचिड करतात असा लोकांनी कमळाची काकडी नियमितपणे खावी.