Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > लो कार्ब्ज डाएटमुळे वजन खरंच लवकर कमी होतं का? तज्ज्ञ सांगतात..

लो कार्ब्ज डाएटमुळे वजन खरंच लवकर कमी होतं का? तज्ज्ञ सांगतात..

Weight loss Tips: वजन कमी करायचंय? मग लो कार्ब्स डाएट (Low carbs Diet) सुरू करा. कार्बाेहायड्रेट्सचा इनटेक कमी करा.. असं सांगितलं जातं.. कार्ब्समुळे नेमका वजनावर परिणाम होतो का? कसा होतो किंवा होत नाही? या सगळ्याबाबतची ही सविस्तर माहिती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2022 03:58 PM2022-03-12T15:58:42+5:302022-03-12T16:00:48+5:30

Weight loss Tips: वजन कमी करायचंय? मग लो कार्ब्स डाएट (Low carbs Diet) सुरू करा. कार्बाेहायड्रेट्सचा इनटेक कमी करा.. असं सांगितलं जातं.. कार्ब्समुळे नेमका वजनावर परिणाम होतो का? कसा होतो किंवा होत नाही? या सगळ्याबाबतची ही सविस्तर माहिती...

Low carbs diet is really helpful for weight loss? What expert says.... | लो कार्ब्ज डाएटमुळे वजन खरंच लवकर कमी होतं का? तज्ज्ञ सांगतात..

लो कार्ब्ज डाएटमुळे वजन खरंच लवकर कमी होतं का? तज्ज्ञ सांगतात..

Highlightsकार्बोहायड्रेट्स हे शरीराला अतिशय आवश्यक असे मायक्रोन्युट्रीयंट्स आहेत. त्यामुळे जर लो कार्ब्स डाएट करणार असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. स्वत:च्या मनाने कोणतेही प्रयोग करू नका.

लो कार्ब्स डाएटमुळे वजन तर कमी होतंच पण त्यासोबतच लो कार्ब्स डाएट (low carbs diet) हृदयाच्या आरोग्यासाठीही चांगलं असतं, असं सांगितलं जातं. त्यामुळे वेटलॉससाठी जे लोक प्रयत्न करत आहेत, त्यापैकी अनेक लोकांचा लो कार्ब्स डाएट घेऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न असतो. जे लोक लो कार्ब्स डाएटवर असतात, त्या लोकांना इतरांच्या तुलनेत अनेक मर्यादा पाळाव्या लागतात. कारण बहुतांश पदार्थात कार्ब्स असतेच. असे अनेक पदार्थ आहारातून वगळल्या गेल्याने मग प्रोटीन्स, खनिजे मिळविण्यासाठी अनेक प्रकारच्या सप्लिमेंट लो कार्ब्स डाएटमध्ये समाविष्ट करून घ्याव्या लागतात. अन्यथा अशा प्रकारचे डाएट करून अशक्तपणा येण्याची शक्यता खूप जास्त असते.

 

लो कार्ब्स डाएट म्हणजे काय (What is low )
- लो कार्ब्स डाएट प्रकारात व्हेरी लाे कार्ब्स आणि लो कार्ब्स असे देान प्रकार आहेत. 
- यापैकी व्हेरी लाे कार्ब्स प्रकारात तुम्ही दिवसभरात आहारातून जी काही एनर्जी मिळवता, त्याच्या १० टक्के एनर्जी ही कार्बोहायड्रेट्समधून मिळत असते.
- लो कार्ब्स डाएट प्रकारात तुमच्या एकूण एनर्जीच्या ४५ टक्क्यांपेक्षा कमी एनर्जी कार्बोहायड्रेट्समधून मिळते.
- तर रेग्युलर डाएटमध्ये कार्बोहायड्रेट्समधून मिळणारी एनर्जी ही ४५ ते ६५ टक्क्यांपर्यंत असते. 

 

- shethepeople यांनी दिलेल्या वृत्तानुसार The Cochrane यांनी यासंदर्भात एक सर्व्हेक्षण केले होते. यामध्ये एकूण ७ हजार ओव्हरवेट असणाऱ्या लोकांचा अभ्यास करण्यात आला. यापैकी लो कार्ब्सवर असणाऱ्या लोकांचे वजन बॅलेन्स डाएटवर असणाऱ्या लोकांपेक्षा सरासरी केवळ १ किलोने कमी असल्याचे लक्षात आले. ज्याप्रमाणे वजनात फार तफावत नव्हती, त्याप्रमाणेच ब्लड शुगर लेव्हर, कोलेस्टरॉल यातही फार फरक नसल्याचं लक्षात आलं. 
- कार्बोहायड्रेट्स हे शरीराला अतिशय आवश्यक असे मायक्रोन्युट्रीयंट्स आहेत. त्यामुळे जर लो कार्ब्स डाएट करणार असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. स्वत:च्या मनाने कोणतेही प्रयोग करू नका.
- कारण शरीर बांधणीसाठी, स्नायुंना ताकद देण्यासाठी कार्बोहायड्रेट्स अतिशय आवश्यक असतात.


 

Web Title: Low carbs diet is really helpful for weight loss? What expert says....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.