Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन कमी करणं झालं गोड, फक्त गुळात एक सुकामेवा शिजवून खा, झरझर घटेल वजन

वजन कमी करणं झालं गोड, फक्त गुळात एक सुकामेवा शिजवून खा, झरझर घटेल वजन

Low-fat Makhana Kheer for those on a diet : व्यायाम-डाएट फॉलो करूनही वजन कमी होत नसेल तर, एकदा गुळात एक सुकामेवा शिजवून खा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2024 03:44 PM2024-01-07T15:44:30+5:302024-01-07T15:45:30+5:30

Low-fat Makhana Kheer for those on a diet : व्यायाम-डाएट फॉलो करूनही वजन कमी होत नसेल तर, एकदा गुळात एक सुकामेवा शिजवून खा...

Low-fat Makhana Kheer for those on a diet | वजन कमी करणं झालं गोड, फक्त गुळात एक सुकामेवा शिजवून खा, झरझर घटेल वजन

वजन कमी करणं झालं गोड, फक्त गुळात एक सुकामेवा शिजवून खा, झरझर घटेल वजन

फक्त हिवाळ्यातच नाही तर इतरही ऋतूत गुळ खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. गुळ खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हिवाळ्यात गुळ खाल्ल्याने शरीर आतून उबदार राहते. शिवाय रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होते. ज्यामुळे हिवाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांपासून सुटका तर होतेच, यासह शरीर सुदृढ राहते. मुख्य म्हणजे साखरेऐवजी गुळ खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते.

गुळ खाल्ल्याने चयापचय क्रिया मजबूत राहते. ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी घटते. पण गुळासोबत कोणता सुकामेवा खाल्ल्याने आरोग्याला फायदा होतो? गुळात कोणता सुकामेवा शिजवून खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते?(Low-fat Makhana Kheer for those on a diet).

वजन कमी करताना चहा पिणं किती योग्य? चहा पिऊनही वजन कमी होऊ शकते? तज्ज्ञ सांगतात

यासंदर्भात, सोनल वेटेने आपल्या न्यूट्रीबिट इन्स्टाग्राम अकाऊंटवर माहिती दिली आहे. त्यांच्या मते, 'मखाणा खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. याशिवाय त्यात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे हाडं मजूबत होतात. तसंच यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.'

मखाणा खाण्याचे फायदे

मखाणामध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे भूक नियंत्रित राहण्यास मदत होते. शिवाय गुळात लोह, कॅल्शियम आणि पोटॅशियम असते. ज्यामुळे भूक तर नियंत्रित राहतेस, शिवाय वजन कमी करण्यास मदत मिळते. जर आपल्याला मखाणा आवडत नसेल तर, आपण गुळ घालून गाजराचा हलवा, खीर, चटणी किंवा कोशिंबीरीत गुळ घालून खाऊ शकता. आपण साखरेऐवजी गुळाचा वापर करू शकता.

गुळ-मखाणाचा हलवा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य

मखाणा

गुळ

तूप

सूर्यफुलाचं तेल वापरलं तर वाढलेलं वजन सरसर कमी होतं? तज्ज्ञ सांगतात, तेलाचा इफेक्ट

पाणी

कृती

सर्वप्रथम, एका कढईत एक कप मखाणा घालून भाजून घ्या. भाजलेले मखाणे एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर कढईत २ चमचे तूप घालून गरम करा. तूप विरघळल्यानंतर त्यात एक वाटी किसलेला गुळ आणि पाणी घालून चमच्याने सतत ढवळत राहा. मिश्रणाला उकळी आल्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवा, आणि त्यात भाजलेले मखाणे घालून मिक्स करा. अशाप्रकारे आपलं वेट लॉस हलवा खाण्यासाठी रेडी. 

Web Title: Low-fat Makhana Kheer for those on a diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.