Join us  

ओटीपोटाचा भाग खूपच वाढला, लटकतोय? पोट सपाट दिसण्यासाठी रोज करा १ सोपा व्यायाम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2023 4:33 PM

Lower Belly fat workout : कपड्यांमधून ते पोट लटकताना दिसते आणि त्यामुळे अनेकदा आपल्या राहण्यावर बंधने येतात.

पोटावरची चरबी वाढणे ही समस्या हल्ली पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये दिसते. वाढलेलं पोट लपवण्यासाठी मग अनेक उपाय केले जातात. पण हे पोट लपवण्यापेक्षा ते वाढूच नये यासाठी काळजी घ्यायला हवी. एकदा ढेरीचा घेर वाढत गेला की तो काही केल्या कमी होत नाही. अनेकदा तर ८ ते १० तासांचे बैठे काम, व्यायामाला नसलेला वेळ आणि जंक फूडचे अतिसेवन यामुळे पोटाचा घेर वाढत जातो. कपड्यांमधून ते पोट लटकताना दिसते आणि त्यामुळे अनेकदा आपल्या राहण्यावर आणि फॅशनवरही बंधने येतात(Lower Belly fat workout). 

पोट किंवा एकूणच लठ्ठपणा वाढला की आरोग्याच्या इतर तक्रारीही डोकं वर काढतात. पण हे पोट वाढू नये किंवा वाढले असेल तर कमी व्हावे यासाठी नियमित काही गोष्टी केल्यास त्याचा नक्कीच चांगला उपयोग होतो. आहारावर नियंत्रण आणि व्यायाम हे २ सर्वात सोपे आणि महत्त्वाचे उपाय असून प्रसिद्ध फिटनेसतज्ज्ञ नेहा वाढलेले ओटीपोट कमी करण्यासाठीचे काही सोपे व्यायाम सांगतात, ते कोणते पाहूया..

(Image : Google)

कोणता व्यायाम करायचा? 

दोन्ही पायांत अंतर घेऊन उभं राहायचं. त्यानंतर दोन्ही हात वरच्या दिशेला स्ट्रेच करायचे. मग गुडघ्यात अगदी हलकं वाकून कंबरेतून पुढच्या बाजूला खाली वाकायचे. त्यानंतर पुन्हा वर येऊन उजव्या पायाच्या बाजूला कंबरेतून खाली वाकायचे. परत वर यायचे आणि डाव्या बाजूला खाली वाकायचे. असे प्रत्येक बाजूला किमान ३० वेळा रोज करायचे. महिनाभर सलग हा व्यायाम केल्यानंतर पोटाचा वाढलेला घेर कमी होण्यास मदत होते. यामध्ये पोटाच्या स्नायूंचा चांगला व्यायाम होतो आणि चरबी घटण्यास मदत होते. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सव्यायामफिटनेस टिप्स