Join us  

पोट-मांड्याचा आकार वाढलाय? डॉ. श्रीराम नेने सांगतात 'वेटलॉस'चा खास फॉम्यूला, भराभर वजन घटेल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2024 11:24 AM

Madhuri Dixit Husband Dr Shriram Nene On Weight Loss : नेहमी पॉझिटिव्ह राहा, डोक्यात नकारात्मक विचार येणार नाही याची काळजी घ्या.

खाणं खूपच कमी तरी वजन वाढत, पोट कमी होत नाही अशी तक्रार अनेकांची असते. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय  करतात पण त्याचा फारसा उपयोग होत नाही. जीमला गेलो म्हणजे वजन कमी झालं असं अजिबात होत नाही, वजन कमी करण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. (Madhuri Dixit Husband Dr Shriram Nene On Weight Loss Tips Dieting And Nutrition How to Stay Heathy)

अभिनेत्री माधुरी दीक्षितचे  पती डॉ. श्रीराम नेने सोशल मीडियावर नेहमीच एक्टिव्ह असतात. डॉ. नेने  सोशल मीडियावर डाएटशी संबंधित माहिती शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी डॉ. नेने यांनी पत्नीसोबत एक व्हिडिओ बनवला होता.  ज्यात त्यांना माधुरी दीक्षितने विचार होतं की वजन कसे कमी करावे?

वजन कमी करण्यासाठी डॉ. श्रीराम नेने काय सल्ला देतात

डॉ. नेने यांच्या म्हणण्यानुसार वजन कमी करण्यासाठी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि न्युट्रिशनवर लक्ष देणं फार महत्वाचे आहे. गरजेपेक्षा कमी खाल्ल्यास हळूहळू वजन कमी होण्यास मदत होईल. डाएट सगळ्यात महत्वाचे आहे वर्कआऊट आणि इतर गोष्टी सर्वात नंतर येतात.  (Quick Weight Loss Tips) ओव्हरवेट असलेल्यांनी नोट्स तयार करायला हव्यात. ज्यात  त्यांचे सध्याचे वजन  किती  आहे, वजन कमी करण्यात काय काय समस्या येत आहेत. तुम्ही काय फिजिकल एक्टिव्हीज करत आहात ते लिहावं लागेल. म्हणजे जेव्हाही तुम्ही एक्सपर्ट्सना भेटाल तेव्हा त्यांच्याशी यावर चर्चा कराल.

त्यानंतर आपल्या संपूर्ण शरीराचे मेजरमेंट घ्यावे. ज्यामध्ये पोट, मांड्या, छाती, कंबर, मान याची साईज मोजावी लागेल. जेणेकरून  येणाऱ्या काळात डाएट आणि इतर एक्टिव्हीटजकडे लक्ष देता येईल. तुम्ही काय खाता याचा थेट परिणाम तुमच्या वजनावर होतो. वजन कमी करण्यात ८० टक्के डाएट महत्वाचे असते.

प्रोटीनसाठी महागड्या गोेष्टी परवडत नाहीत? फक्त १० रुपयांत खा ३ प्रोटीन पदार्थ- हाडं होतील बळकट

नेहमी तुमचा कॅलरी इन्टेक, कॅलरी बर्नचं कॅल्युलेशन ठेवा.  हा वजन कमी करण्याचा बेसिक उपाय आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला स्ट्रीक डाएट करण्याची काही गरज नाही.  कारण तुम्ही हे  जास्त वेळ फॉलो करू शकणार नाही आणि मानसिक ताणही  येणार नाही.

मानसिक आरोग्याचा वजनाशी संबंध

नेहमी पॉझिटिव्ह राहा, डोक्यात नकारात्मक विचार येणार नाही याची काळजी घ्या. डाएटप्रमाणेच तुमचं माईंडही वजन कमी करण्यास मदत करते. कारण जर तुम्ही ताण-तणावात असाल तर ओव्हर इटींग होऊ शकते. ज्यामुळे वजन कमी करण्यास अडथळे येतात. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी