Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पोट सुटलंय-वजन घटत नाही? डॉ. श्रीराम नेने सांगतात वजन कमी करण्यासाठी ५ सोप्या टिप्स

पोट सुटलंय-वजन घटत नाही? डॉ. श्रीराम नेने सांगतात वजन कमी करण्यासाठी ५ सोप्या टिप्स

Madhuri Dixit Husband Dr Shriram Nene Talk About Weight Loss : फिटनेसचा अर्थ असा नाही की फक्त चांगलं दिसणं असं होत नाही. फिटनेस म्हणजे तुम्ही सुंदर दिसायला हवं.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 10:52 AM2024-02-05T10:52:29+5:302024-02-05T13:38:15+5:30

Madhuri Dixit Husband Dr Shriram Nene Talk About Weight Loss : फिटनेसचा अर्थ असा नाही की फक्त चांगलं दिसणं असं होत नाही. फिटनेस म्हणजे तुम्ही सुंदर दिसायला हवं.

Madhuri Dixit Husband Dr Shriram Nene Talk About Weight Fat Loss Obesity Dieting Fat to fit | पोट सुटलंय-वजन घटत नाही? डॉ. श्रीराम नेने सांगतात वजन कमी करण्यासाठी ५ सोप्या टिप्स

पोट सुटलंय-वजन घटत नाही? डॉ. श्रीराम नेने सांगतात वजन कमी करण्यासाठी ५ सोप्या टिप्स

आपलं वजन नियंत्रणात असावं आणि आपण फिट दिसावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण त्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी  उपयोग होत नाही असं अनेकदा दिसून येतं. (Health Tips) माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून लोकांना फिट राहण्यसाठी प्रेरणा देतात. त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत स्नॅक्स, मिल हेल्दी बनवण्यासाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत.  (Madhuri Dixit Husband Dr Shriram Nene Talk About Weight Fat Loss Obesity Dieting Fat to fit)

फक्त चांगलं दिसलो म्हणजे फिट आहोत असं नाही (Dr Shriram Nene Shares a Fitness Tips)

डॉ सांगतात की, ''फिटनेसचा अर्थ की फक्त चांगलं दिसणं असं होत नाही. फिटनेस म्हणजे तुम्ही फिट राहाला हवं.   जेणेकरून पुढे काही प्रोब्लेम होणार नाही. वजन कमी करण्यासाठी मार्केटमध्ये बरेच डाएट प्रकार  उपलब्ध आहेत. पण जर हे डाएट तुम्ही लॉन्ग टर्मसाठी फॉलो करणार नसाल सुरूवातच करू नका.

कार्ब्स  खाणं पूर्ण बंद करू नका (Don't Stop Eating Carbs)

काहीजण वजन कमी करण्यासाठी आहारातील कार्ब्सचा समावेश पूर्णपणे वगळतात. ज्यामुळे तुम्हाला सुस्ती येणं, उत्साही न वाटणं अशा समस्या उद्भवू शकतात. वजन कमी करण्यासाठी अन्न पूर्ण न सोडता कॅलरीज काऊंटकडे लक्ष द्या. नेहमी शॉर्ट टर्म गोल्स सेट करा. ३० दिवसांत १० किलो कमी करण्याच्या विचारात असाल तर चुकीच्या पद्धतीने जास्त वजन कमी करू नका. आपल्या भूकेपेक्षा २०० ते ४०० कॅलरीज कमी खायल हव्यात. कॅलरी डेफिसिटमध्ये राहा. हाय प्रोटीन्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. 

ज्यूस पिण्यापेक्षा फळं खाण्यास अधिक महत्व द्या (Fruits Are More healthier Than Fruit Juice)

लोकांना फळं खाण्याऐवजी ज्यूस प्यायला खूप आवडतं. पण डॉ. नेने यांच्यामते ज्यूसच्या तुलनेत फळांमध्ये जास्तीत जास्त फायबर्स असतात.  जे आरोग्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे हेल्दी ठरतात.  ज्यूस पिण्याऐवजी फळांचा आपल्या आहारात समावेश करा. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहील आणि वजनही नियंत्रणात राहील.

हळू-हळू खा, जास्त वेगाने जेवणं टाळा (Slowly Eating)

अनेकांना घाईघाईत जेवण्याची सवय अस असते हीच सवय वजन वाढण्याचं कारण ठरू शकते.  यामुळे अन्न पचाण्याचाया प्रकियेत अडथळे येतात आणि खाल्लेल्या अन्नचं व्यवस्थित पचन न होता फॅट्समध्ये रूपांतर होतं. ज्यामुळे लठ्ठ्पणा वाढतो. हे टाळण्यासाठी अन्न चावून खा. 

सॉस, क्रिमचा वापर करा

अन्न चवदार टेस्टी बनावं यासाठी तुम्ही सॉस किंवा केमिकल्सयुक्त मसाल्यांचा वापर करू शकता.  मसाले आणि हेल्दी मिल्स धणे पावडर, हळद आणि जीऱ्याचे सेवन करा. 

खाण्यात ज्वारी, ब्राऊन राईस या पदार्थांचे सेवन करा. मील्स हेल्दी बनवण्यासाठी तुम्ही आपल्या आाहारात मैद्याचा समावेश करता.  जे तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकते. 

बदाम-पनीर रोज खाणं परवडत नाही? १० रूपयांत चारपट जास्त प्रोटीन देतात २ पदार्थ; ताकद येईल

पोषक तत्वांनी परिपूर्ण अशा पदार्थांचा आहारात समावेश

मील अधिक हेल्दी बनवण्यासाठी डाएटमध्ये पोषक तत्वांचा समावेश करा. प्रोटीन्सयुक्त पदार्थांचे भरपूर सेवन करा. फळं, भाज्या आपल्या डाएटचा एक भाग बनवा. ज्यामुळे शरीरात  दीर्घकाळ एनर्जी टिकून राहील.

स्वत:ला हायड्रेट ठेवा

डॉ. नेने यांच्यामते निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्यायला हवं. अशात लोक हायड्रेट राहण्यासाठी सोडा किंवा कार्बोनेट ड्रिंक्सचा आहारात समावेश करा  ज्यामुळे शरीराचे नुकसान होऊ शकते. 

Web Title: Madhuri Dixit Husband Dr Shriram Nene Talk About Weight Fat Loss Obesity Dieting Fat to fit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.