Join us  

तरुण दिसण्यासाठी प्या १ कप ‘जादूई’ चहा, ढीगभर उपाय कशाला एका उपायानं दिसा तरुण, वजनही घटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2022 4:12 PM

वजन कमी करायचं, त्वचा सुंदर आणि तरुण ठेवायची, रोगप्रतिकारशक्ती वाढवून आजारांचा धोका टाळायचा असे विविध उद्देश एक कप जास्वंदीचा चहा (hibiscus tea) नियमित प्यायल्यानं सहज साध्य होतात.  एक कप जास्वंदीचा चहाने आरोग्य आणि सौंदर्य (benefits of hibiscus tea) या दोन्ही गोष्टी साध्य होतात. 

ठळक मुद्देवजन कमी करण्यासाठी जास्वंदीचा चहा उपयुक्त असतो.जास्वंदीचा चहा प्यायल्यानं मूड सुधारतो. त्वचा आणि केसांचं आरोग्य जपण्यासाठी जास्वंदीचा चहा नियमित प्यावा.

वाढत्या वयासोबत सौंदर्य जपणं  (beauty care) आणि आरोग्याची काळजी घेणं  (health care) अशी दुहेरी कसरत बायकांना करावी लागते. त्यासाठी विविध उपाय करावे लागतात. त्वचा निरोगी ठेवायची एक उपाय, स्लिम ट्रीम दिसायचं दुसरा उपाय, चेहेऱ्यावर सुरुकुत्या दिसू नये म्हणून तिसरा उपाय.. अशी उपायांची यादी वाढतच जाते. नव्याचे नऊ दिवस म्हणून सर्व उपाय करुनही बघितले जातात. पण नंतर वेळेची कमतरता, कामांची  घाई यामुळे उपायांमध्ये सातत्य राहात नाही आणि त्यामुळे अपेक्षित परिणामही दिसत नाही. सौंदर्य आणि आरोग्यविषयक सर्व अपेक्षा पूर्ण करणारा एखादाच उपाय असावा असं वाटत राहातं. असा उपाय आहारतज्ज्ञ  शीयम मल्होत्रा यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमधून सांगितला आहे. जास्वंदीच्या फुलाचा चहा (hibiscus tea)  पिणं  हा तो उपाय. जास्वंदीच्या फुलाचा चहा पिण्याचे विविध फायदे (benefits of hibiscus tea)  आणि ती करण्याची पध्दत (how to make hibiscus tea)  शीयम यांनी सांगितली आहे. 

Image: Google

जास्वंदीचा चहा का प्यावा?

1. जास्वंदीच्या फुलाचा चहा प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. जास्वंदीच्या फुलामध्ये पोषक घटक असतात. फ्लेवोनाॅइड्स आणि खनिजं असतात.  हे घटक शरीरातील चरबी आणि कर्बोदकं कमी करतात  त्यामुळे वजन कमी होतं. जास्वंदीच्या फुलात ॲण्टिऑक्सिडण्ट्स जास्त प्रमाणात असल्यानं चयापचय सुधारतं. चयापचय सुधारल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. जास्वंदीच्या फुलातील गुणधर्म मूत्रवर्धक असल्यानं शरीरातील अनावश्यक पाण्याचं वजन कमी होतं. 

2. जास्वंदीच्या चहामधील ॲण्टिऑक्सिडण्ट्समुळे आरोग्याचं आणि त्वचेचं मुक्त मुलकांपासून संरक्षण होतं.  यामुळे मुक्तमुलकांपासून होणाऱ्या आजारांचा धोका कमी होतो. यावर झालेला अभ्यास सांगतो की जास्वंदीच्या फुलांच्या अर्कामुळे ॲण्टिऑक्सिडण्ट्स, विकर यामध्ये वाढ होते आणि त्यामुळे  मूक्त मुलकांचा धोका 92 टक्क्यांनी कमी होतो. 

3. हदयाच्या आरोग्यासाठी जास्वंदीचा चहा फायदेशीर ठरतो. जास्वंदीमधील गुणधर्म वाढलेला रक्तदाब कमी करतात. रक्तदाब नियंत्रित ठेवतात. जास्वंदीच्या फुलाचा चहा प्यायल्यानं हदयासंबंधी आजारांचा धोका कमी होतो. 

Image: Google

4. जास्वंदीच्या फुलामध्ये नैराश्यविरोधी गुणधर्म असतात. या फुलामधील फ्लेवोनाॅइडस मेंदू शांत करण्यास फायदेशीर असतात. यामुळे नैराश्याची लक्षणं कमी होतात आणि मूड सुधारतो. 

5.जास्वंदीच्या फुलात  अ आणि क ही महत्वाची जीवनसत्वं असतात. जास्वंदीचा चहा नियमित प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. या फुलात जिवाणुविरोधी आणि दाहविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका कमी होतो. 

6. अ आणि क जीवनसत्वासोबतच जास्वंदीच्या फुलात अमिनो ॲसिड भरपूर असतात. त्याचा फायदा केस आणि त्वचा निरोगी राहाण्यासाठी होतो. जास्वंदीच्या फुलातील अमिनो ॲसिडमुळे केस गळणं थांबतं, डोक्यातल्या कोंड्याची समस्या दूर होते. केस अकाली पांढरे होण्याचा धोका टळतो. जास्वंदीच्या फुलातील ॲण्टिऑक्सिडण्ट्समुळे सूर्याच्या अति नील किरणांमुळे, प्रदूषित घटकांमुळे होणारं त्वचेचं नुकसान रोखलं जातं. चेहेऱ्यावर सुरकुत्या पडत नाही. त्वचा तरुण राहाते.

Image: Google

जास्वंदीच्या फुलाचा चहा कसा करावा?

जास्वंदीच्या फुलाचा चहा करण्यासाठी 2 कप पाणी, 2 जास्वंदीची फुलं,  दालचिनीचा एक तुकडा आणि आल्याचा एक तुकडा,  लिंबाचा रस आणि मध घ्यावं. आधी भांड्यात पाणी घेऊन ते उकळण्यास ठेवावं. पाणी उकळतानाच त्यात जास्वंदीची फुलं, दालचिनी आणि घालावं. पाणी चांगलं उकळून कमी झालं की हे पाणी गाळून घ्यावं. यात थोडं लिंबू आणि मध घालून हा जास्वंदीचा चहा प्यावा.

टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजनाब्यूटी टिप्स