पाठदुखी, कंबरदुखी असा त्रास नसलेली महिला कदाचितच एखादी सापडेल. पहिलं बाळांतपण (lowerback pain in women after delivery) झालं की बहुतांश जणीच्या मागे पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास सुरू होतो. अनेक जणींना तर पाळी येण्याच्या आठवडाभर आधी आणि पाळीदरम्यान खूप कंबर दुखू (backpain before and during periods) लागते. दर महिन्याला हा त्रास डोके वर काढतो. हिवाळ्यात तर हा त्रास जास्तच वाढतो. त्यामुळेच तर हिवाळ्यात असा त्रास सुरू झाला तर निसर्गानेच याच्यावर एक मस्त उपाय सांगितला आहे. तिळ आणि गूळ खाण्याचा...
संक्रांतीचा (festival of makar sankrant) सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. संक्रांत आले की घरोघरी तिळ- गुळाचे लाडू, वड्या असे काही काही सुरू होते. संक्रांतीच्या काळात खूप जास्त महत्त्व मिळणारे तिळ मात्र एरवी वर्षभर उपेक्षितच राहतात. पाठदुखी आणि कंबरदुखी टाळायची असेल, तर वर्षभर किंवा निदान हिवाळ्याचे चार महिने तरी तिळ खाल्ले पाहिजेत. रोज एक टेबलस्पून तीळ जर वेगवेगळ्या पदार्थांच्या माध्यमातून आपल्या पोटात गेले तर हे काही फायदे निश्चितच मिळतात.
तिळ खाण्याचे हे फायदे
benefits of eating til or sesame in winter
- तिळातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक हाडांसाठी पोषक असतात. थंडीच्या दिवसात तीळ खाण्याची सवय ठेवल्यास पाठदुखी, कंबरदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
- वरील गुणधर्मांमुळे तीळ जसे हाडांसाठी पोषक (sesame is beneficial for bones) आहेत, तसेच ते दातांसाठीही पोषक ठरतात. त्यामुळे लहान मुलांनाही नियमितपणे तीळ खाण्यास द्यावेत. दात मजबूत होण्यास मदत होते.
- तिळामध्ये सेसमीन नावाचे ॲण्टीऑक्सिडंट (anti oxidants) भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे तीळ नियमितपणे खाल्ल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो. तसेच हे ॲण्टीऑक्सिडंट त्वचा मृदू आणि मुलायम ठेवण्यासाठीही उपयुक्त असते. त्यामुळे हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी तीळ खाणे हा एक उत्तम उपाय आहे.
- हिवाळ्यात कोरड्या खोकल्याचा (dry cough) त्रास अनेक जणांना होतो. यावरही भाजलेले तीळ खाणे हा एक उत्तम उपाय आहे.
- तोंड आले असल्यास तिळाच्या तेलात थोडे काळे मीठ घालून ते जखमेवर लावावे. यामुळे लवकर आराम पडतो. त्या जागेवर लावल्याने छाले लवकर बरे होण्यास मदत मिळते.
- रोगप्रतिकारक शक्ती (sesame for immunity booster) वाढविण्यासाठी दररोज सकाळी एक टी स्पून तीळ खावेत. काळे तीळ खाल्ल्यास ते आरोग्यासाठी खूप जास्त पोषक ठरतात.
- मासिक पाळीत ज्या महिलांना खूप जास्त रक्तस्त्राव होतो, त्यांच्यासाठीही तिळाचे नियमित सेवन उपयुक्त ठरते.