Join us  

स्वयंपाक करताना मारा स्मार्ट सिक्स, करा ६ गोष्टी- घरात कुणाचं वजन वाढणारच नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2023 6:56 PM

6 Cooking Tricks That Will Help You Lose Weight : आपल्या वाढत्या वजनामुळे काळजी वाटत असेल, वर्कआउटसाठी वेळ नाही? मग स्वयंपाक करतानाच बदला काही गोष्ट...

सध्या आपल्यापैकी बरेचजण वजन वाढण्याच्या समस्येने त्रस्त असल्याचे दिसून येत. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आपण अनेकदा बरेच प्रयत्न करतो. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण अनेक प्रकारचे डाएट फॉलो करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या अ‍ॅक्टिव्हिटीज करतो. अनेकजण तर जिम लावतात, आणि जिममध्ये जाऊन तासंतास व्यायाम करतात. आपण एवढेच करून थांबत नाही तर काहीवेळा आपण वेगवेगळ्या प्रकारची औषध, गोळ्या आर्टिफिशीयल मेडिसिन्स घेतो. वजन कमी करण्यात आहार आणि व्यायामाची सर्वात मोठी भूमिका असते. सध्याची बदलती जीवनशैली आणि बिझी लाइफस्टाइल यामुळे काहीवेळा आपल्याला व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही. अशावेळी वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहार हा एकमेव पर्याय उरतो. 

वजन कमी करण्यासाठी आपण सर्वप्रथम व्यायामासोबत आपल्या आहाराकडे जास्त लक्ष देतो. वजन कमी करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत आहार हा सर्वात महत्वाचा भाग ठरतो. खरतर असं म्हणायला हरकत नाही की, वजन कमी करण्याचा प्रवास हा स्वयंपाकघरातून सुरू होतो. ज्यामध्ये पहिली पायरी म्हणजे स्वयंपाक करण्याची योग्य पद्धत होय. वजन कमी करताना तुम्ही अन्न कसे शिजवता हे देखील खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा अन्न योग्य प्रकारे शिजवले जाते तेव्हा त्याचे पोषण अबाधित राहते आणि यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी अन्नपदार्थ नक्की कोणत्या पद्धतीने शिजवावेत याकडे तितकेच लक्ष देणे देखील गरजेचे असते(Make Your Weight Loss Journey Effective With These 6 Cooking Techniques). 

वजन कमी करण्यासाठी अन्न शिजवण्याची योग्य पद्धत :- 

१. स्वयंपाकासाठी तेलाच्या वापराकडे लक्ष देणे :- वजन कमी करण्यासाठी, सर्वप्रथम स्वयंपाक करताना योग्य प्रमाणात तेलाच्या वापराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. भाजीसाठी पुरेसे तेल वापरावे जेणेकरून भाजी तव्याला चिकटणार नाही. ज्यासाठी आपण स्प्रे ऑइल स्पिरिटचा देखील वापर करु शकता. 

कोण म्हणतं वजन कमीच होत नाही? ४ साधे-सोपे उपाय-वजन कमी होणारच....

२. नेमके कोणते तेल वापरावे :- बहुतेक घरांमध्ये अन्नपदार्थ शिजवण्यासाठी रिफाइंड व्हेजिटेबल तेलाचा वापर केला जातो. रिफाइंड व्हेजिटेबल तेलाचा वापर जास्त केल्यास शरीरात जळजळ होऊ शकते, यामुळे लठ्ठपणा आणि इतर अनेक घातक रोगांच्या समस्या उद्भवू शकतात. अन्नपदार्थ किंवा जेवण बनवण्यासाठी रिफाइंड व्हेजिटेबल ऑईलचा वापर करण्याऐवजी ऑलिव्ह ऑईल, नारळाच्या तेलाचा वापर करावा. ऑलिव्ह ऑईल, नारळाच्या तेलाचा वापर करणे हे आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर असते. 

३. मिठाचा योग्य प्रमाणात वापर करावा :- जेवणाची चव वाढवण्यासाठी आपणही अन्नपदार्थात चमचाभर मीठ टाकत असाल तर ही सवय पूर्णपणे सोडा. हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. मीठासोबत आपण दालचिनी, जायफळ, तुळस यांसारख्या पदार्थांनी जेवणाची चव वाढवू शकता. तसेच अन्नपदार्थ बनून तयार झाल्यानंतर ते खाताना त्यात मिठाचे प्रमाण कमी वाटले म्हणून वरून मीठ भुरभुरवून घालण्याची सवय मोडा. 

वजन कमी करण्याचा ५० - ३५ - १५ फॉर्म्युला, ऋजुता दिवेकर सांगतात लठ्ठपणा कमी करण्याची खास ट्रिक...

४. भाज्या वाफवून खाव्यात :- भाज्या उकळण्याऐवजी वाफवून घ्या, यामुळे त्यांचे पोषण टिकून राहते आणि वजनही नियंत्रणात राहते.

५. भाज्या खाण्याविषयी :- ज्या भाज्या सोलल्याशिवाय खाणे शक्य आहे, त्या भाज्या तशाच सालीसकट खाव्यात. अनेक भाज्यांच्या सालींमध्ये पोषक, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर देखील असतात. त्यामुळे हे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासही मदत करतात.   

रोज किती चमचे साखर खाणं योग्य? साखर खाणं पूर्णच बंद करुन टाकलं तर तब्येत सुधारते, तज्ज्ञ सांगतात...

६. साखरेचा वापर टाळावा :- सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वयंपाक करताना पांढर्‍या साखरेचा वापर कमी करावा. साखरेचा वापर करण्याऐवजी अन्नपदार्थांमध्ये गोडवा येण्यासाठी गुळाचा वापर करावा. गुळामध्ये देखील केमिकलयुक्त गूळ वापरण्याऐवजी सेंद्रिय गूळ वापरण्यावर जास्त भर द्यावा.

 

टॅग्स :वेट लॉस टिप्स