Join us

मखाना की पॉपकॉर्न-वजन कमी करण्यासाठी काय खावं? पाहा कशानं लवकर वजन कमी होतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 21:38 IST

Makhana Or Popcorn Which Is Best For Weight Loss : हेल्दी स्नॅक्ससाठी लोक मखाने किंवा पॉपकॉर्न खाणं पसंत करतात.

संध्याकाळच्यावेळी हलकी भूक लागते आणि सतत काही ना काही खाण्याची इच्छा होते. अशा स्थितीत आपल्याकडे काही पर्याय नसतो. जे लोक हेल्दी डाएट करतात जे चिप्स किंवा फास्ट फूड खाणं टाळतात. याव्यतिरिक्त काही लोक  वजन कमी करण्यासाठी हेल्दी ऑपश्न शोधण्याच्या प्रयत्नात असतात. (Makhana Or Popcorn Which Is Best For Health And Weight Loss) हेल्दी स्नॅक्ससाठी लोक मखाने किंवा पॉपकॉर्न खाणं पसंत करतात. हे दोन्ही पर्याय पोषणानं परीपूर्ण असतात. वजन कमी करण्यासाठी पॉपकॉर्न किंवा मखाने यापैकी कोणताही पदार्थ तुम्ही खाऊ शकता.

मखाने खाण्याचे फायदे

डायटिशियन नंदिनी सांगतात की, ''मखान्यांमध्ये फायबर्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, प्रोटीन्स यांसारखी महत्वपूर्ण पोषक तत्व असतात. हेल्दी स्नॅक्सच्या स्वरूपात तुम्ही याचे सेवन करू शकता. यात कमीत कमी कॅलरीज असतात. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर कोणत्याही स्वरूपात  मखान्यांचे सेवन करू शकता.

आहारतज्ज्ञ गुंजन सचदेवा यांच्यामते पॉपकॉर्न एक हेल्दी आणि स्वादीष्ट आहार आहे. पॉपकॉर्नमध्ये एंटी ऑक्सिडेंट्स, व्हिटामीन्स आणि खनिजं असतात, ज्यामुळे तब्येतीला बरेच फायदे मिळतात. पॉपकॉर्नमध्ये मखान्यांच्या तुलनेत अधिक कॅलरीज असतात.''

मखाना किंवा पॉपकॉर्न दोन्ही तब्येतीसाठी उत्तम ठरतात. मखान्यांमध्ये फायबर्स मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी हेल्दी स्नॅक्सच्या स्वरूपात तुम्ही याचे सेवन करू शकता. यात पॉपकॉर्नच्या तुलनेत अधिकाधिक कॅलरीज असतात.

डार्क सर्कल्समुळे चेहरा खराब झालाय? 2 घरगुती उपाय करा, चमकेल चेहरा-सुंदर दिसाल

मखान्यांचा तुम्ही वेट लॉस जर्नीत वेगवेगळ्या स्वरूपात समावेश करू शकता. मखाना चाट, भाजलेले  मखाने आणि रोस्टेड मखान्यांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. यातून तुम्हाला भरपूर प्रमाणात फायबर्स मिळतील. मखान्यांना तुम्ही आपल्या आहाराचा भाग बनवू इच्छित असाल तर मखाने खाताना अधिक प्रमाणात बटरचा वापर करू नका, हलकं भाजून घ्या आणि मीठ सुद्धा कमी प्रमाणात घाला.

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य