ऋतू कोणताही असो, शरीराला हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे (Skin Care Tips). शरीर हायड्रेट ठेवल्याने आरोग्याच्या निगडीत त्रास दूर राहतात, शिवाय स्किनही चमकते. पाण्याव्यतिरीक्त काही कलाकार ज्यूसवर भर देतात (Beauty Tips). बॉलीवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत ही पन्नाशी गाठत असतानाही ती आजही तितकीच बॉल्ड आणि ब्यूटीफुल दिसते (Mallika Sherawat).
पण तिच्या सौंदर्यामागचं रहस्य काय? जर आपल्याला मल्लिका शेरावतसारखी ग्लोइंग स्किन हवी असेल तर, अँटी-ऑक्सिडंटने समृद्ध ग्रीन ज्यूस प्या. पन्नाशी गाठत असताना मल्लिका अजूनही पंचविशीतली दिसते. ग्रीन ज्यूस नक्की कसा बनावयाचा? पाहूयात(Mallika Sherawat reveals her ‘favourite drink’ to stay fit).
ग्रीन ज्यूस कसा बनवायचा?
ग्रीन ज्यूस बनवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, ग्रीन सफरचंद, काकडी, लिंबू, या भाज्या मिक्स करून ज्यूस तयार करा. या फळं या भाज्यांमधून मिळणारे पौष्टीक घटक शरीराला फायदेशीर आणि स्किनसाठी उपयुक्त ठरते.
वजन कमी करायचं म्हणून साखर बंद करुन गुळ किंवा मध खाता? आहारतज्ज्ञ सांगतात, फायद्याचं नेमकं काय..
ग्रीन ज्यूस पिण्याचे फायदे
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
ग्रीन ज्यूस प्यायल्याने शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता भरून निघते. या रसामध्ये असलेल्या हिरव्या भाज्या आणि लिंबाचा रस व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत आहे. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आणि बॅक्टेरिया व विषाणूंशी लढण्याची शरीराची क्षमता वाढते.
वजन कमी करण्यास मदत
ग्रीन ज्यूस प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होते. हिरव्या फळ आणि भाज्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. ज्यामुळे वेट लॉससाठी मदत होते.
वाढीच्या वयात मुलं फिट व्हावी असं वाटत असेल तर खाऊ घाला ५ पदार्थ, आजीपणजीच्या काळातला सोपा उपाय
शरीर हायड्रेट राहील
पावसाळ्यात अनेकांच्या शरीरात पाण्याची कमतरता भासते. अशा स्थितीत नियमित ग्रीन ज्यूस प्या. यामुळे शरीर हायड्रेट राहील. हा रस प्यायल्याने शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होऊ शकते, आणि थकवाही दूर होऊ शकते.