Join us  

कुंद पावसाळी हवेत प्यायला हवं बिटाचं सूप; मीरा राजपूत सांगतेय बिटाच्या सुपाचे डिटॉक्स फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2022 5:28 PM

बाॅडी डिटाॅक्ससाठी (body detox) मीरा राजपूत (Meera Rajput) बिटाचं सूप प्यावं असं सांगतेय. चविष्ट बिटाचं सूप (beetroot soup) पावसाळ्यात बाॅडी डिटाॅक्स करुन आरोग्य जपण्यासाठी (beetroot soup for body detox in monsoon) उत्तम आहे असं आहार तज्ज्ञही म्हणतात. 

ठळक मुद्देबिटाचं सेवन केल्यानं पावसाळ्यातले अपचनाचे विकार टाळले जातात.रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बीट आणि बिटाचं सूप फायदेशीर आहे. 

मीरा राजपूत (Meera Rajput)  आपल्या फिटनेसबाबत खूप जागरुक असते, पण म्हणून ती खाण्यापिण्याची मजा करत नाही असं नाही. उलट ती जिथे जाईल तिथल्या पदार्थांचा मनमुराद आस्वाद घेते. त्याबद्दलच्या पोस्ट समाज माध्यमात टाकून आपला आनंद इतरंसोबत वाटूनही घेते. नुकतीच मीरा राजपूत तिच्या कुटुंबासोबत युरोप फिरुन आली. तिथे तिने पिझ्झा, कपकेक, क्रोइसेन अशा अनेक पदार्थांचा आस्वाद घेतल्याचं तिच्या समाज माध्यमांवरील पोस्टवरुन कळतं. पण मुंबईला घरी परतल्यानंतर आता डिटाॅक्स (body detox)  करण्याची वेळ आली आहे असं सांगून मीरा राजपूतनं एक फोटो स्टोरी शेअर केली. यात बाॅडी डिटाॅक्ससाठी मीरा राजपूत बिटाचं सूप (beetroot soup)  प्यावं असं सांगतेय. चविष्ट बिटाचं सूप पावसाळ्यात बाॅडी डिटाॅक्स करुन (beetroot soup for body detox in monsoon)  आरोग्य जपण्यासाठी उत्तम आहे.   मीरा राजपूतनं बिटाच्या सूपचा फोटो शेअर केल्यानंतर बिटाच्या सूपचा आरोग्यास नेमका काय फायदा होतो यावर चर्चा सुरु आहे.  

Image: Google

बिटाचं सूप का प्यावं?बिटातील पौष्टिक घटकांमुळे बिटाचं सूप आरोग्यदायी होतं. बिटामध्ये फायबर, जीवनसत्वं, फोलिक ॲसिड, ॲण्टिऑक्सिडण्ट्स, पोटॅशियम यासारखे पोषक घटक असतात. पावसाळ्यात बिटाचं सेवन करणं आवश्यक असल्याचं आरोग्य तज्ज्ञ म्हणतात. बिटामुळे अपचन होत नाही. शरीराचं आतून पोषण होतं. बिटातील पोषक घटकांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. महत्वाचं म्हणजे बीट आहारात असल्यास शरीरातील अपायकारक घटक बाहेर पडण्यास मदत होते. बाॅडी डिटाॅक्ससाठी बीटाचं सूप हा चविष्ट पर्याय आहे. 

Image: Google

बिटाचं सूप कसं करणार?

बिटाचं सूप करण्यासाठी बिटासोबतच थोडा भोपळा, कांदा, टमाटा आणि बटाटा घ्यावा.  या सर्व भाज्या मऊ शिजवून घ्याव्यात. भाज्या गार झाल्या की मिक्सरमधून वाटाव्यात. वाटलेलं मिश्रण गाळून घ्यावं. गाळून घेतलेल्या मिश्रणात चवीपुरती थोडी साखर, मीठ, आणि मिरपूड घालावी. या सूपमध्ये थोडं क्रीम किंवा ताजी साय आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. बिटाचं सूप चवीला उत्तम लागतं आणि आरोग्यास फायदेशीर असतं. त्यामुळे आरोग्याचा विचार करता पावसाळ्यात वरचेवर बिटाचं सूप प्यावं असा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. सेलिब्रेटींच्या समाज माध्यमावरील पोस्ट केवळ मनोरंजनासाठीच नसतात. त्यातून आपल्या फायद्याच्या अनेक गोष्टी मिळतात हेच मीरा राजपूतच्या बिटाच्या सूपच्या पोस्टवरुन समजतं. 

टॅग्स :आहार योजनाअन्नपाककृतीहेल्थ टिप्स