Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्नी मेलानियाच्या मदतीनं कमी केलं १३ किलो वजन, पाहा कसं?

डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्नी मेलानियाच्या मदतीनं कमी केलं १३ किलो वजन, पाहा कसं?

Melaina Trump Helped Donald Trump To Lose Weight : मेलानिया एक हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करतात आणि आपल्या पतीलाही त्यांनी वजन कमी करण्यासाठी प्रेरणा दिली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 15:52 IST2024-12-16T15:39:45+5:302024-12-16T15:52:14+5:30

Melaina Trump Helped Donald Trump To Lose Weight : मेलानिया एक हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करतात आणि आपल्या पतीलाही त्यांनी वजन कमी करण्यासाठी प्रेरणा दिली.

Melaina Trump Helped Donald Trump To Lose Weight Of Appox 13 KGs Know Diet Plan | डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्नी मेलानियाच्या मदतीनं कमी केलं १३ किलो वजन, पाहा कसं?

डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्नी मेलानियाच्या मदतीनं कमी केलं १३ किलो वजन, पाहा कसं?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांनी आपली पत्नी मेलानियाच्या मदतीनं जवळपास १३ किलो वजन कमी केलं आहे (Melaina Trump Helped Donald Trump To Lose Weight). ते आपला फिटनेस आणि वेट लॉससाठी बरेच चर्चेत आहेत. वजन कमी करण्यामागे त्यांनी लाईफस्टाईल आणि  योग्य डाएटचे योगदान असल्याचं सांगितलं आहे. मेलानिया एक हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करतात आणि आपल्या पतीलाही त्यांनी वजन कमी करण्यासाठी प्रेरणा दिली. (Melaina Trump Helped Donald Trump To Lose Weight Of Appox 13 KGs Know Diet Plan)

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया यांनी त्यांच्या पतीचे डाएट नियमित मॉनिटर करायला सुरूवात केली. हेल्दी इटींग हॅबिट्स डेव्हलप करण्यासही त्यांची मदत केली. डोनाल्ड ट्रंप यांनी वजन कमी करण्याच्या प्रवासाचे वेगवेगळे पैलू सांगितले.

डोनाल्ड ट्रम्प यांचा डाएट प्लॅन

डोनाल्ड ट्रंप यांनी आपल्या वेट लॉस जर्नीमध्ये डाएट हे प्रमुख असल्याचं सांगितले आहे. आधी ते फास्ट फूड आणि शुगरी ड्रिंक्सचे जास्त सेवन करत असतं. वजन कमी करण्यासाठी त्यांनी अनहेल्दी सवयी सोडल्या आणि हेल्दी डाएटचा आधार घेतला (Ref). ट्रम्प यांनी आपल्या आहारातील प्रोटीन पोर्शन वाढवले. चिकन आणि अंड्याचे सेवन  केले.

वजन कमी करण्यासाठी त्यांनी आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या, ताजी फळं यांचा समावेश केला. यात फायबर्स आणि व्हिटामीन्सचे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे मेटाबॉलिझ्म फास्ट होतो. ट्रंम्प यांनी सोडा आणि साखरयुक्त ड्रिंक्सचं पूर्णपणे सोडलं आधी त्यांच्या आहारात हे पदार्थ खूप असायचे. ट्रंम्प यांनी कॅलरीज इंटेक कमी करण्यावर भर दिला आणि लो कॅलरीजयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केला.

डाएटसोबतच वजन कमी करण्यासाठी ट्रम्प यांनी फिजिकल एक्टिव्हीजचा आधार घेतला. ट्रंप यांच्या फिजिकल एक्टिव्हीटीजमध्ये रेग्युलर वॉकचा समावेश आहे. जे रोज ३० मिनिटं चालतात.योगा आणि स्ट्रेचिंगसुद्धा करतात. स्ट्रेस मॅनेजमेंट आणि रिलॅक्सेशन टेक्निकचा आधार घेतात.

मेलानिया ट्रम्प एक हेल्थ कॉन्शियस व्यक्ती आहे. त्या नेहमी संतुलित आहार आणि फिटनेसवर लक्ष देतात. त्यांनी  ट्रम्प यांच्या वेट लॉस जर्नीमध्ये त्यांची मदत केली. हेल्दी लाईफस्टाईलचे महत्व समजावून सांगितले. तेव्हा त्यांनी अन्हेल्दी लाईफस्टाईल सोडून त्यांनी हेल्दी लाईफस्टाईलवर लक्ष दिले.

Web Title: Melaina Trump Helped Donald Trump To Lose Weight Of Appox 13 KGs Know Diet Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.