आरोग्यासाठी मेथीचे पिवळे दाणे बरेच फायदेशीर ठरतात. मेथीचा वापर स्वंयपाकघरात अनेक कामांसाठी केला जातो.(Methi Water Benefits) मेथीच्या दाण्यांमध्ये फायबर्स, व्हिटामीन्स, खनिज, आयर्न, मॅन्गनीज आणि मॅग्नेशियमचे चांगले प्रमाण असते. मेथीचे पाणी बनवून पिण्यासाठी एक चमचा मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवून द्या आणि सकाळी हलकं गरम करून गाळून या पाण्याचे सेवन करा. मेथीचे पाणी प्यायल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात आणि आरोग्याशी संबंधित समस्याही उद्भवत नाहीत. (Benefits of Drinking Fenugreek Seeds Water Daily in Winter)
१) मेथीचे पाणी पिण्याचे फायदे काय आहेत? (5 Effective Benefits Of Drinking Fenugreek Seeds Water)
हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार यात ३ ग्रॅम फायबर्स, ३ ग्रॅम प्रोटीन्स आणि ६ ग्रॅम फायबर्स असतात. मेथीच्या पाण्याने मेटाबॉलिझ्म वाढवण्यास मदत होते. याशिवाय टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन्सची पातळीही चांगली राहते. अनेक वर्षांपासून मेथीचा औषधांच्या स्वरूपात वापर केला जात आहे. मेथीच्या पाण्याच्या सेवनाने भूकही नियंत्रणात राहते.
२) पचनाच्या समस्या कमी होतात
पचनासंबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी मेथीचे पाणी हा उत्तम पर्याय आहे. मेथीचे पाणी पचायला उत्तम असते यामुळे शरीराला बरेच फायदे मिळतात. हे पाणी प्याल्याने पोटदुखी, पोटात गॅस तयार होणं, एसिडिटी यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत. यात फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात ते पोटासाठी उत्तम ठरतात. आतडे साफ राहण्यासाठी आणि पचनाच्या समस्या टाळण्यासाठी तुम्ही मेथीच्या पाण्याचे सेवन करू शकता. मेथीचे पाणी शरीराला बरेच फायदे देते. मेथीच्या पाण्याचे रोज सेवन केल्याने पोटाचे आरोग्यही चांगले राहते.
2) बॅड कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहतं
हाय कोलेस्टेरॉल ही एक गंभीर समस्या आहे. मेथीच्या पाण्याचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. मेथीचे पाणी घाणेरडं कोलेस्टेरॉल वाढू देत नाही आणि हृदयाचे आरोग्यही चांगले ठेवते.
3) वजन कमी होते
रोज मेथीच्या दाण्यांचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. हे पाणी प्यायल्याने भुकेवर नियंत्रण ठेवता येते. सतत भक लागत नाही. ज्यामुळे तुम्ही कमीत कमी प्रमाणात खाता आणि फूड इंटेक कमी होतो. फॅट बर्न करण्यासही मेथीचे पाणी फायदेशीर ठरते. रात्री कपभर पाण्यात मेथी भिजवून ठेवली आणि सकाळी याचे सेवन केले तर पोटाची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
4) त्वचा चांगली राहते
मेथीचे पाणी त्वचा सुंदर बनववण्यास मदत करते. त्वचेला उजळ बनवण्यासाठी तुम्ही मेथीच्या पाण्याचे सेवन करू शकता. मेथीचे पाणी त्वचा डिटॉक्स करते. मेथीचे पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते आणि टॉक्सिन्स बाहेर निघण्यास मदत होते. चेहऱ्यावरही ग्लो दिसून येतो.