Drink to Reduce Belly Fat : पोटावर चरबी वाढणं ही आज एक मोठी समस्या झाली आहे. खासकरून महिला पोटावरील वाढलेल्या चरबीमुळं जास्त चिंतेत असतात. पोटावर चरबी वाढण्याची कारणं वेगवेगळी असतात. पोट कमी करण्यासाठी वेगवेगळ्या डाएट आणि एक्सरसाईज केल्या जातात. पण तरीही काही केल्या पोटावरील चरबी कमी होत नाही. शेवटी थकून या गोष्टी करणंही सोडतात. बेली फॅट म्हणजेच पोटावरील चरबी कमी करण्यासाठी योग्य उपाय करण्याची गरज असते. अनेकांना हे माहीत नसतं की, काही नॅचरल उपाय करूनही पोट स्लीम करता येऊ शकतं. असाच एक नॅचरल उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
खास पानाचं पाणी करेल चरबी कमी
पोटावरील चरबी नॅचरल पद्धतीनं कमी करण्यासाठी पदीन्याचं पाणी तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकतं. पदीन्याच्या पानांमुळं वेगवेगळ्या पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच आरोग्याला अनेक फायदेही मिळतात. जसे की, पचन सुधारतं, मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि बॉडी डिटॉक्सही होते. या पानांमध्ये अनेक अॅंटी-ऑक्सिडेंट गुण असतात जे शरीरातून विषारी तत्व बाहेर काढतात. ज्यामुळे वजन कमी करण्याचा मार्ग सोपा होतो.
कसा मिळतो पदीन्याचा फायदा?
- पदीन्याच्या पानामुळं मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यास मदत मिळते. ज्यामुळे शरीरातील कॅलरी वेगानं बर्न होतात. अशात चरबीही कमी होऊ लागते आणि याचा परिणाम वजन कमी होऊ लागतं.
- पचनक्रिया जर कमजोर असेल तर यामुळे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात अडथळा निर्माण होतो. अशात पदीन्याच्या पाण्यामुळं पचन चांगलं होतं, बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि अॅसिडिटीही कमी होते. त्यामुळे पोट हलकं होतं.
- वजन कमी करत असताना बॉडी डिटॉक्सही तेवढंच महत्वाचं आहे. कारण शरीरात जमा झालेले विषारी तत्व बाहेर पडले नाही तर ते पोट फुगण्याचं कारण बनतात. पदीन्याच्या पाण्यानं लिव्हर डिटॉक्स होतं. त्यामुळे विषारी तत्व शरीरातून लगेच बाहेर पडतात.
- पदीन्याच्या पानांच्या मदतीनं भूक कंट्रोल होते. त्यामुळे अनावश्यक किंवा जास्त खाण्याची इच्छा मरून जाते. याचा परिणाम असा की, वजन कमी करण्यास मदत मिळते. तसेच पदीन्याच्या पानांमध्ये कॅलरी कमी असतात. याचाही फायदा मिळतो.
कसं तयार कराल पदीन्याचं पाणी?
आधी एक ग्लास पाणी हलकं गरम करा आणि त्यात काही पदीन्याची पानं टाका. हे पाणी 10 ते 15 मिनिटं उकडवा. नंतर गॅस बंद करून पाणी गाळून ग्लासमध्ये टाका. हवं तर यात तुम्ही थोडा लिंबाचा रस आणि काळं मिठही टाकू शकता. रोज सकाळी उपाशीपोटी हे पाणी प्यायचं आहे. झोपण्याआधी हे पाणी प्याल तर पचन चांगलं होईल आणि वजन कमी करण्यास मदत मिळेल.